पाठ २ – (आ) योगी सर्वकाळ सुखदाता
Time - 60 Minutes
Marks - 20
1. All the questions are compulsory.
2. Read the question paper carefully.
3. Marks are included against each question.
प्र १. खालील कविता वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.
जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलियांसी ।
जीवन जैसे कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ।।
जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।
उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ।।
उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणें तृषितें होती ।
योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाही ।।
उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां ।
योगियांचे गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रियां ।।
मेघमुखें अध:पतन । उदकाचें देखोनि जाण ।
अध:पातें निवती जन । अन्नदान सकळांसी ।।
तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें ।
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।।
१. आकृती पूर्ण करा. (२ अंक)
२. पाण्याची मधुरता कोणाला संतुष्ट करते? (१ अंक)
३. खालील चौकटी पूर्ण करा. (१ अंक)
स्वत:ला मिळणारा आनंद ____
४. ‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. (२ अंक)
५. खालील कवितेतून एक शब्द द्या – (१ अंक)
एक पक्षी. हा चंद्रकिरणे पिऊन जगतो अशी कल्पना आहे
६. योग्यांचे गोडपण कोणाला संतुष्ट करते? (१ अंक)
७. कोणाच्या अध: पाताने लोक समाधानी होतात? (१ अंक)
८. कवितेतील समानार्थी शब्द शोधा (१ अंक)
जीभ
ढग
प्र २. खालील ओळींचे रसग्रहण करा : (५ अंक)
तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें ।
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ।।
प्र ३. पुढील मुद्द्यांवरून गोष्ट तायर करा, शिर्षक द्या व तात्पर्य लिहा : (५ अंक)
एक राजा – त्याची प्रजा आळशी होती. त्यासाठी राजाची युक्ती – रस्त्यात मोठा दगड ठेवतो – त्याखाली सोन्याची नाणी असलेली पिशवी – अनेक लोक जाता – पण दगड उचलत नाही – एक गरीब माणूस उचलतो – लोकांना ते कळते – ते उद्योगी बनतात – तात्पर्य.