Maharashtra Board Textbook Solutions for Standard Ten

पाठ २ – संतवाणी
(आ) योगी सर्वकाळ सुखदाता

While presenting a comparison between a Yogi and water, Sant Eknath says:

 

Just as a Chakor bird longs for drinking moonlight, or just as younglings of female birds need the shelter of her wings, and just as water gives life to all living beings, similarly, the tenderness of a Yogi’s (ascetic’s) mind is craved by all.

 

While water washes away only the superficial stains or dirt, a yogi purifies the minds of all, inside and out. When water is drunk, it gives satisfaction to the heart only once, but Yogi gives extreme contentment forever.

 

A thirsty person quenches his thirst by drinking water, and he gets momentary happiness. But Yogi bestows spiritual bliss; he gives unending inner joy. There is no deterioration in happiness conferred by Yogi. It does not have any perversity. It is everlasting. The sweetness of water satiates and comforts only the tongue. But the sweetness gained from a Yogi soothes and comforts all of the sense organs.

 

The water from the clouds showers down on the earth. When this water is soaked up by the soil, food grains grow. Naturally, people rejoice at the sight of rain falling from the clouds. They feel happy and content.

 

Likewise, when a yogic personality descends on earth, that is, when he is born in this world, people around him are charmed by listening to his divinely sweet words. Their minds get elated when they sing to his glory. The yogi person uplifts people and the entire society by showering them with his spiritual revelation.

जेवीं – ज्याप्रमाणे. 

चकोर – एक पक्षी. हा चंद्रकिरणे पिऊन जगतो अशी कल्पना आहे. 

पांखोवा – पक्षिणीचे पंख. 

जीवन – पाणी. 

क्षाळणे – धुणे. 

सबाह्य – आतून व बाहेरून. 

उदक – पाणी. 

तृषित – तहानलेला. 

निवविणे – संतुष्ट करणे, शांत करणे. 

निजज्ञान – आत्मज्ञान.

अग्निमाजि पडे बाळू । 

माता धांवें कनवाळू ॥१॥

तैसा धांवे माझिया काजा। 

अंकिला मी दास तुझा ॥२॥

 

अर्थ : वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक संत नामदेव महाराज अगदी मनापासून आर्ततेने परमेश्वराचा (विठ्ठलाचा धावा करतात. त्यासाठी ते अतिशय समर्पक दृष्टान्त देतात. ते म्हणतात की, ज्याप्रमाणे नजरचुकीने अग्नित सापडलेल्या बाळाला वाचवण्यासाठी त्याची आई व्याकूळ होऊन, काळजीने त्याच्याजवळ धावून जाते. त्याला मायेने, प्रेमाने उचलून घेते. त्याचप्रमाणे हे प्रभू, विठ्ठला, मी पूर्णपणे तुझा अंकित आहे. मी तुझा दास, सेवक आहे. आईप्रमाणे तुही माझ्या अडचणीत, माझ्या कार्यात धावत ये.

 

Translation in English:

Sant Namdev Maharaj, the great preacher of the Warkari sect, prays to the Lord (Vitthal) with all his heart. He gives a very fitting vision for this. He says that just as a mother, distraught to save a baby accidentally caught in the fire, rushes to him with concern, picks him up with love and love. Similarly, O Lord, Vitthal, I am completely Your Ankita. I am Your servant, Your servant. Like a mother, You come running to my problems, to my work.

 

 

सवेंचि झेंपावें पक्षिणी ।

पिलीं पडतांचि धरणीं ॥३॥

 

अर्थ : विठ्ठलाची आळवणी करताना संत नामदेव महाराज म्हणतात, झाडावरील घरट्यात असणारे पक्ष्याचे लहान पिल्लू घरट्यातून बाहेर येऊन उडण्याच्या प्रयत्नात खाली जमिनीवर पडताच त्याची आई ती पक्षिणी आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी त्याच्या दिशेने तत्परतेने झेप घेते. त्याला पुन्हा घरट्यात नेण्यासाठी धडपडते. त्याचप्रमाणे हे परमेश्वरा, तुझ्या या सेवकासाठी तू असाच धावून ये.

 

Translation in English:

Sant Namdev Maharaj while praising Vitthal says, when a baby bird in a nest on a tree comes out of the nest and falls down to the ground in an attempt to fly, its mother bird immediately jumps towards it to save her baby. Struggles to get him back to the nest. In the same way, O Lord, do you come running for this servant of yours.

 

 

भुकेलें वत्सरावें । 

धेनु हुंबरत धांवे ॥४॥

 

अर्थ : संत नामदेव महाराज अगदी मनापासून विठ्ठलाचा धावा करतात. ते म्हणतात, भूकेने व्याकूळ झालेले वासरू गोठ्यात ओरडत असते. त्याची ती अवस्था सहन न होऊन गाय मोठ्याने हंबरत आपल्या वासराच्या ओढीने त्याच्याजवळ धावत येते. त्याचप्रमाणे हे विठ्ठला तूही माझ्यासाठी धावून ये.

 

Translation in English:

Sant Namdev Maharaj prays for Vitthal with all his heart. They say, the hungry calf cries in the manger. Unable to bear his condition, the cow comes running towards him with a loud hum along with her calf. Similarly, O Vitthal, you also run for me.

 

 

वणवा लागलासे वनीं ।

पाडस चिंतीत हरणी ॥५॥

 

अर्थ : संत नामदेव श्री विठ्ठलाची मनापासून विनवणी करतात. अगदी व्याकूळ होऊन हरिणीचे उदाहरण ते देतात. ते म्हणतात की, जंगलात वणवा पसरलेला आहे आणि त्यात हरिणीचे पाडस अडकलेले आहे. अशावेळी त्याची आई म्हणजेच हरिणी आपल्या पाडसाला वाचवण्यासाठी खूप चिंतीत होते. त्या पाडसासारखीच मा- झी अवस्था झाली आहे. म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.

 

Translation in English:

Sant Namdev earnestly pleads with Shri Vitthal. They give the example of a deer, who is very disturbed. They say that there is a wildfire in the forest and the fallow of deer is stuck in it. At that time his mother i.e. deer was very anxious to save her fallow. I have become like that fallow. So you run for me.

 

 

नामा म्हणे मेघा जैसा । 

विनवितो चातक तैसा ॥६॥

 

अर्थ : चातक पक्षी पावसाचा पहिला थेंब पिऊन जगतो. तेच त्याच्यासाठी जीवन असते असे मानले जाते. हाच दृष्टान्त देऊन संत नामदेव महाराज म्हणतात की, ज्या प्रमाणे चातक पक्षी आकाशात जमलेल्या काळ्या काळ्या, पाण्याने भरलेल्या ढगांना पाणी बरसवण्यासाठी विनवणी करतो. त्याचप्रमाणे हे विठ्ठला, मी तुला विनवितो आहे.

 

Translation in English:

The Chatak bird lives by drinking the first drop of rain. That is what life is supposed to be for him. Sant Namdev Maharaj, giving the same vision, says that just as the Chatak bird begs the black, water-filled clouds gathered in the sky to shower them with water. Similarly, O Vitthal, I beseech you.

कृती

(१) खालील चौकटी पूर्ण करा.

(अ) अभंगात वर्णिलेला चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी
उत्तर: चकोर

 

(आ) पिलांना सुरक्षितता देणारे
उत्तर: पक्षिणीचे पंख

 

(इ) स्वत:ला मिळणारा आनंद
उत्तर: स्वानंदतृप्ती

 

(ई) व्यक्तीला सदैव सुख देणारा
उत्तर: योगी

(२) खालील आकृती पूर्ण करा.

IMG 20230706 142640 पाठ २ – संतवाणी (आ) योगी सर्वकाळ सुखदाता

उत्तर:

IMG 20230706 142955 पाठ २ – संतवाणी (आ) योगी सर्वकाळ सुखदाता

(३) खालील तक्ता पूर्ण करा.

योगीपुरुष आणि जीवन (पाणी) यांच्यातील फरक स्पष्ट करा.

योगी पुरुष जीवन (पाणी)

उत्तर:

योगी पुरुष जीवन (पाणी)
(१) सबाह्य निर्मळ करतो.
(१) वरवरचा मळ धुते.
(२) स्वानंदतृप्ती देतो.
(२) तहान शमवणारे क्षणाचे सुख देते.
(३) सर्व इंद्रियांना शांत करतो.
(३) फक्त जिभेला तृप्त करते.
(४) आत्मज्ञानाने उद्धार करतो.
(४) फक्त अन्नदान करते.

(४) खालील शब्दांसाठी कवितेतील समानार्थी शब्द शोधा.

(अ) जीभ –
उत्तर: रसना

 

(आ) पाणी –
उत्तर: उदक, जल

 

(इ) गोडपणा –
उत्तर: मधुरता

 

(ई) ढग –
उत्तर: मेघ

(५) काव्यसौंदर्य.

(अ) खालील ओळींचे रसग्रहण करा.

तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें ।

जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्‌धरी ।।

उत्तर: 

आशयसौंदर्य : संत एकनाथ महाराजांचा ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ हा अभंग योगी पुरुषाचे महत्त्व सांगणारा आहे. यामध्ये पाणी व योगी पुरुष याची तुलना केली आहे. पाण्याच्या सेवाभावापेक्षा योगी पुरुषाचा सेवाभाव हा श्रेष्ठ दर्जाचा आहे हे पटवून देताना संत एकनाथांनी योगी पुरुषाची वैशिष्ट्ये कथन केली आहेत.

 

काव्यसौंदर्य : प्रस्तुत ओवीमध्ये योगी पुरुषाची महती गाताना संत एकनाथ म्हणतात-पाण्याने ओथंबलेला ढग खाली जमिनीवर बरसतो आणि त्यामुळे निर्माण झालेल्या अन्नधान्यांनी माणसे समाधानी होतात, परंतु योगी या इहलोकात मानवरूपात जन्म घेतो. त्याच्या आत्मज्ञानाच्या श्रवणाने व बोलण्याने जनमानसाचा उद्धार होतो.

 

भाषिक वैशिष्ट्ये : या ओवीतील पाणी व योगी पुरुष यांच्या तुलनेतून लौकिक व अलौकिकाची सांगड सुंदर रितीने घातली गेली आहे. पाणी फक्त लौकिक पोटाची भूक शमवते; परंतु योगी पुरुषाचे आत्मज्ञान लोकांचे मानस उजळवते, हा सूचित अर्थ सहजपणे ओघवत्या शब्दकळेत संत एकनाथांनी साधला आहे. यातून योग्याची साधना किती श्रेष्ठ असते, हे पटवून दिले आहे.

आशयसौंदर्य : Sant Eknath Maharaj’s ‘Yogi Sarvakal Sukhdata’ tells the importance of unbroken Yogi Purusha. In this, water and yogi are compared. Saint Eknath has narrated the characteristics of a yogi while convincing that the service of a yogi is superior to the service of water.

 

काव्यसौंदर्य : In the given lines, while singing the merits of Yogi Purusha, Saint Eknath says- A cloud filled with water falls on the ground below and people are satisfied with the food produced by it, but a Yogi takes birth in this world as a human being. By hearing and speaking of his self-knowledge, people are saved.

 

भाषिक वैशिष्ट्ये : The combination of mundane and supernatural has been put in a beautiful manner by the comparison of Pani and Yogi Purush in these lines. Water only satiates the hunger of the proverbial stomach; But the self-knowledge of the Yogi Purusha enlightens the psyche of the people, this implied meaning has been achieved by Saint Eknath in easy-to-understand words. This has proved how superior the sadhana of the right one is.

(आ) ‘योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. 

उत्तर: संत एकनाथ महाराजांनी योगी पुरुष व पाणी यांची प्रस्तुत अभंगात तुलना केली आहे आणि योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व ठसवले आहे.

 

योगी पुरुष पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे सांगताना ते म्हणतात पाणी हे वरवरचा मळ धुवून टाकते; परंतु योगी सर्व लोकांचे मन आतून- बाहेरून निर्मळ करतो. पाणी एकावेळची तहान भागवते; परंतु योगी पुरुष हा सर्वांसाठी सर्व काळांमध्ये सुख देणारा सज्जन आहे. पाण्याचे सुख तात्पुरते आहे. पण योग्याने दिलेल्या सुखात विकृती नाही. योगी पुरुष सर्वांना अक्षय परमानंद देतो. पाण्याची गोडी फक्त जिभेपुरती मर्यादित असते. परंतु योग्याच्या आत्मज्ञानाची गोडी सर्व लोकांच्या सर्व इंद्रियांना शांत करते. पाण्याने माणसाची पोटाची भूक भागते; परंतु योगी पुरुष श्रवणकीर्तनाने माणसांच्या मनाचे पोषण करतो.

 

अशा प्रकारे ‘योगी पुरुष हा पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे’ हे संत एकनाथांनी अनेक उदाहरणांनी पटवून दिले आहे.

Saint Eknath Maharaj has compared Yogi Purusha and water in the present Abhanga and emphasized the superiority of Yogi Purusha.

 

In saying that Yogi Purusha is superior to water, he says that water washes away the superficial faeces; But a yogi purifies the mind of all people from inside and outside. Water quenches one’s thirst; But the Yogi Purusha is the gentleman who gives happiness to all in all ages. The pleasure of water is temporary. But there is no perversity in happiness given by the right. Yogi Purusha gives eternal bliss to all. The taste of water is limited only to the tongue. But the sweetness of Self-enlightenment of the Right calms all the senses of all people. Water satisfies the hunger of man’s stomach; But the Yogi Purusha nourishes the minds of men with Sravanakirtana.

 

In this way, Saint Eknath has proved with many examples that ‘Yogi Purusha is better than water’.

(इ) योगी पुरुष आणि पाणी हे दोघेही सामाजिक कार्य करतात, हे स्पष्ट करा.

उत्तर: योगी पुरुष आणि पाणी हे दोन्हीही जनकल्याणासाठीच झटतात. दोघेही जनतेची सेवाच करतात.

 

पाणी हे मानवाला जीवनदायी आहे. प्राणिसृष्टी व वनस्पतिसृष्टी पाण्यामुळे जिवंत राहते. पाणी माणसाची तहान तर भागवतेच; परंतु पोटाची भूकही शमवते. पाण्यामुळे धरतीवर अन्नधान्य पिकते. पशुपक्ष्यांना पाण्यामुळे चारा मिळतो. पाण्यामुळे साऱ्या निसर्गात चैतन्य संचारते. सारी सृष्टी तरारून उठते. अशा प्रकारे पाणी हे मानवासाठी सामाजिक कार्य करते.

 

योगी पुरुष हा या मृत्युलोकात जन्म घेतो. तप:साधनेने आत्मज्ञान प्राप्त करतो. त्या आत्मज्ञानाची शिदोरी तो लोकांमध्ये श्रवणकीर्तनाने वाटतो. सर्वांना तो नेहमी सर्वकाळ सुख देतो. इंद्रियांचे ताप हरण करून त्यांना अक्षय आनंदाची ठेव अर्पण करतो. योगी पुरुषाच्या आत्मज्ञानाने माणसांची मने निःस्वार्थी व निर्मळ होतात. अशा प्रकारे योगी पुरुषही सामाजिक कार्य करतो.

Yogi Purusha and Water both strive for public welfare. Both serve the public.

 

Water is vital to human beings. Animals and plants survive because of water. Water only quenches a person’s thirst; But it also suppresses appetite. Food grows on the soil due to water. Animals and birds get fodder from water. Water gives life to all nature. The whole creation arises from the sun. Thus water serves a social function for humans.

 

Yogi Purusha is born in this world of death. Through penance one attains self-knowledge. He feels that self-realization in people by listening to it. He always gives eternal happiness to all. By quenching the heat of the senses, Akshay offers them a deposit of inexhaustible bliss. With self-knowledge of Yogi Purusha, people’s minds become selfless and pure. Thus the Yogi Purusha also does social work.