पाठ २ – (अ) अंकिला मी दास तुझा

Time - 60 Minutes

Marks - 20

1. All the questions are compulsory.
2. Read the question paper carefully.
3. Marks are included against each question.

प्र १. खालील कविता वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.

 

अग्निमाजि पडे बाळू । 

माता धांवें कनवाळू ।।१।।

 

तैसा धांवें माझिया काजा । 

अंकिला मी दास तुझा ।।२।।

 

सवेंचि झेंपावें पक्षिणी । 

पिलीं पडतांचि धरणीं ।।३।।

 

भुकेलें वत्सरावें । 

धेनु हुंबरत धांवे ।।४।।

 

वणवा लागलासे वनीं । 

पाडस चिंतीत हरणी ।।५।।

 

नामा म्हणे मेघा जैसा । 

विनवितो चातक तैसा ।।६।।



१. आकृती पूर्ण करा. (२ अंक)

IMG 20230706 141925 Chapter Test

२. कोण ते लिहा. (१ अंक)

मेघाला विनवणी करणारा

३. पाठाच्या आधारे दिलेल्या कृती केव्हा घडतात ते लिहा. (१ अंक)

धरणीवर पक्षिणी झेपावते ____

४. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दांत सांगा. (२ अंक)

५. बाळाला वाचवण्यासाठी कोण धावून येते? (१ अंक)

६. भुकेल्या वासराला पाहून कोण हंबरत धावून येते? (१ अंक)

७. चातक पक्षी कोणाची विनवणी करतो? (१ अंक)

८. खाली दिलेल्या अर्थाच्या ओवी अभंगातून शोधून लिहा. (१ अंक)

नामदेव महाराज म्हणतात की, आकाशातील ढगांना पाहून चातक पक्षी त्याची स्वतःची तहान भागवण्यासाठी विनवणी करतो.

 

प्र २. खालील ओळींचे रसग्रहण करा : (५ अंक)

‘सवेंचि झेंपावें पक्षिणी । पिलीं पडतांचि धरणीं ।।

भुकेलें वत्सरावें । धेनु हुंबरत धांवे ।।’

 

प्र ३. तुमच्या मित्राला निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळाल त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र लिहा. (५ अंक)