Maharashtra Board Textbook Solutions for Standard Ten

पाठ १५ – खरा नागरिक

‘Khara Nagrik’ is written by Suhas Bartakke. He has beautifully expressed how school subjects are not simply to be studied but are also meant for their application to daily activities. He spreads this message through a character named Niranjan.

पंचनामा – पंचांनी तयार केलेला वस्तुस्थितीदर्शक अहवाल. 

उपद्व्याप करणे – नको त्या गोष्टी करणे. 

आर्जव करणे – विनंती करणे. 

तथ्य असणे – सत्यता असणे.

कृती

(१) आकृती पूर्ण करा.

(अ)

IMG 20231029 172020 पाठ १५ – खरा नागरिक

उत्तर: 

IMG 20231029 173112 पाठ १५ – खरा नागरिक

(आ)

IMG 20231029 172041 पाठ १५ – खरा नागरिक

उत्तर: 

IMG 20231029 173254 पाठ १५ – खरा नागरिक

(२) खालील घटनांचे परिणाम लिहा.

IMG 20231029 172058 पाठ १५ – खरा नागरिक

उत्तर: 

IMG 20231029 174314 पाठ १५ – खरा नागरिक

(३) निरंजनची दिनचर्या लिहा.

IMG 20231029 172108 पाठ १५ – खरा नागरिक

उत्तर: 

    • भल्या पहाटे उठून गोठ्यातली सारी कामे आटोपणे.
    • अभ्यासाला बसणे.
    • दुपारी पाहुणा म्हणून एका थोरमोठ्यांच्या घरी जेवायला जाणे.
    • शाळेत जाणे.
    • संध्याकाळी मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहणे.

(४) खालील शब्दांना पाठात आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. 

(१) अप्रामाणिक ×

उत्तर: प्रामाणिक

 

(२) बेसावध ×

उत्तर: सावध

 

(३) हळूहळू ×

उत्तर: चटकन, भरभर

 

(४) पास ×

उत्तर: नापास

(५) निरंजनचे खालील गुण दर्शवणारी कृती किंवा विचार व्यक्त करणारी वाक्ये शोधा.

(अ) स्वप्नाळू –

उत्तर: कोकण गाडी बद्दल वाटले की ही कोकण गाडी किती छान दिसते; पण दिसते न दिसते लगेच बोगद्यात शिरते काय मजा येत असेल नाही गाडीतून जायला ? आपण ही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला.

 

(आ) तार्किक विचार करणारा –

उत्तर: त्याचं लक्ष डाव्या बाजूस रूळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडाकडे गेले. हे छिद्र कसलं ? रोज नसतं असं प्रवाशांनी भरलेली १० ची गाडी येईल तर भयंकर ९.५० अपघात होईल. हा त्याने तर्कपूर्ण विचार केला.

 

(इ) संवेदनशील –

उत्तर: भीषण अपघात टळण्याची बातमी वर्तमानपत्रात फोटोसह छापून आली होती. घरी मोठमोठी माणसे आली होती. खुद्द जिल्हाधिकारी आले. शाळेचे मुख्याध्यापक आणि भडसावळे गुरूजीही आले. निरंजनने धावत येऊन गुरूजींचे पाय धारले. रडत रडत तो म्हणाला, गुरूजी, मी नापास होणार माझा कालचा नागरिकशास्त्राचा पेपर बुडाला.

(६) स्वमत.

(अ) ‘निरंजनच खरा नागरिक’ हे तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.

उत्तर: निरंजन कष्टाळू व प्रामाणिक मुलगा होता. घरची, गोठ्यातली कामे करून अभ्यासातही हुशार होता. नागरिकशास्त्राच्या पेपरच्या दिवशी सकाळपासून अभ्यास करून तो वाराने जेवायला म्हणून देशमुखांकडे जात होता; पण पुलावर त्याने अघटितच पाहिले. कुणीतरी पुलाचे काँक्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवले होते. घातपात करण्याचा कट त्याच्या लक्षात आला. तो सावध झाला. गाडी येण्यापूर्वीच त्याने स्टेशनाकडे धाव घेतली. प्रसंग व धोका समजावून सांगितला. पंचनामा करण्यासाठी अधिकारी हजर झाले. संभाव्य धोका निरंजनामुळे टळला. केवळ पुस्तकी ज्ञान मिळवून गुण मिळवणे एवढेच मर्यादित ध्येय न ठेवता स्वार्थ बाजूस सारून त्याने सर्वांचा जीव वाचविला. खऱ्या नागरिकाचे कर्तव्य त्याने निभावले होते.

Niranjan was a hardworking and honest boy. He was also smart in studies by doing household and farm work. On the day of the civics paper, he had studied all morning and was on his way to Deshmukh’s for dinner; But he saw nothing happened on the bridge. Someone had broken the concrete of the bridge and made the train tracks crazy. He noticed the assassination plot. He became cautious. He rushed to the station before the train arrived. Explained the incident and danger. Officials appeared to conduct Panchnama. A possible danger was averted by Niranjana. He saved everyone’s life by moving towards selfishness without having a limited goal of getting marks only by acquiring book knowledge. He had fulfilled the duty of a true citizen.

(आ) तुम्हांला अभिप्रेत असलेली आदर्श विद्यार्थ्याची गुणवैशिष्ट्ये लिहा.

उत्तर: विद्यार्थी अनेक गुणांनी आदर्श विद्यार्थी म्हणवला जातो. सर्वप्रथम अभ्यास, नीटनेटके अक्षर लेखन कौशल्य अंगी असले पाहिजे. शिस्त, समयपालन नम्रपणा याला प्राधान्य देणेही तितकेच गरजेचे आहे. अंगच्या गुणांमध्ये अभिमानी न होता विनयशील व मोठ्यांचा आदर राखणारा विद्यार्थी खरा आदर्श विद्यार्थी असतो. समयसूचकता, धारिष्ट्य दुसऱ्यांना मदत हे गुण जीवनात फार महत्त्वाचे असतात. अशा गुणांनी युक्त विद्यार्थी सर्वप्रिय होतो.

A student is called an ideal student by many qualities. First of all study, neat letter writing skills should be mastered. It is equally important to prioritize discipline, punctuality and humility. A student who is humble and respects his elders without being proud of his physical qualities is a true ideal student. Punctuality, wisdom and helping others are very important qualities in life. A student with such qualities becomes popular.

(इ) तुम्हांला निरंजनशी मैत्री करायला आवडण्याची वा न आवडण्याची कारणे स्पष्ट करा.

उत्तर: निरंजनला आईवडिल नाहीत. त्याच्या मनातील हा सल काढून टाकण्यासाठी त्याला चांगल्या मित्राची गरज आहे. म्हणून मला निरंजनचा मित्र व्हायला आवडेल. त्याची आर्थिक परिस्थितीही कमकुवत असल्यामुळे जेवणाच्या व शिक्षणाच्या खर्चासाठी मी त्याला काही मदत करू शकतो याचबरोबर निरंजन हा निस्वार्थी, प्रसंगावधान असलेला, हुशार, मेहनती मुलगा आहे. त्यामुळे या सर्वगुणसंपन्न निरंजनशी मैत्री करायला मला आवडेल.

Niranjan has no parents. He needs a good friend to remove this veil from his mind. So I would like to be Niranjan’s friend. As his financial situation is also weak, I can help him with food and education expenses and Niranjan is a selfless, resourceful, intelligent, hardworking boy. So I would like to be friends with this all-rounder Niranjan.

खालील तक्ता पूर्ण करा.

IMG 20231029 172121 पाठ १५ – खरा नागरिक

उत्तर: 

IMG 20231029 175113 पाठ १५ – खरा नागरिक