Maharashtra Board Textbook Solutions for Standard Ten

पाठ १ – तू बुद्धी दे

The poet invokes God, O God, give me wisdom. Show me light. Give new inspiration. Give confidence and faith. Let me be passionate about everything that is true and beautiful in the world.

 

I request that you become the companion of those who are destitute, have no shelter, and are orphans. As the guide to those who are not able to find the virtuous way to life, those who are stranded, take them on the right path. Always be with those who worship you, and comfort them. Stand up for them.

 

Let me have the ability to empathize with the weak and poor, and let the emotion of understanding the pain and sorrow of the sufferers be lit up within me all the time. Stimulate the blood flowing in my veins to destroy evil minds. Give my words immense power and bestow true meaning on my life.

 

Bless me to always be on the path of conscience and goodness and to have the company of righteous people. No matter how many calamities occur, do not discourage me from being virtuous, and my ethics should always remain intact in any situation. Let my mind be strong, and my wings have all the strength to soar into the sky.

नवचेतना – नवचैतन्य. 

सर्वथा - सदैव, सर्व अर्थांनी. 

आजन्म – जन्मभर. 

सारथी – मार्ग, रस्ता, दिशा दाखवणारा.

रंध्र – छिद्र. 

रुधिर – रक्त. 

खल – दुष्ट. 

नीती – सदाचाराचे नियम.

तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे 

जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

 

अर्थ : नित्य पठणीय अशी ही प्रार्थना आहे. कवी सांगतात की, हे ईश्वरा, तू आम्हाला बुद्धी दे. तू नवविचारांचे तेज दे. आपल्यामध्ये नवचेतना जागवण्यास विश्वास दे. या धरतीवर जे सत्य सुंदर आहे. जे अजरामर आहे, जे सर्व ठिकाणी भरून राहिलेले आहे त्या सर्वांचा ध्यास माझ्या मनात जीवनभर राहू दे. म्हणजेच जे सदैव सत्य, सुंदर आहे त्याचे माझ्याकडून व्यवस्थित पालन व्हावे. तसेच त्याचप्रका रच्या नवनिर्मितीचा ध्यास म्हणजे उत्कट इच्छा आजन्म माझ्या मनात राहू दे.

 

Translation in English:

This is a prayer to be recited regularly. The poet says, O God, give us wisdom. You give the brilliance of new ideas. Trust to awaken a new consciousness within you. The truth that is beautiful on this earth. Let the obsession of all that is eternal, that is filled in all places remain in my mind throughout my life. That is, what is always true and beautiful should be properly followed by me. Also let the passion for the same kind of innovation remain in my heart forever.

 

 

हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती,

सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी

साधना करिती तुझी जे नित्य तव सहवास दे 

 

अर्थ : ज्यांचा कोणी पालनकर्ता नाही, ज्यांचा सांभाळ करणारे असे कोणी नाही, ज्यांना माया देणारे आभाळ नाही त्यांचा तू सोबती सखा बन. त्यांना आश्रय देण्याचे काम तू कर. त्यांना मायेची सावली देण्याचे काम कर. जे जीवनाच्या वाटेवर प्रवास करताना भरकटलेले आहेत, ज्यांना जीवनाच्या सार्थकतेची वाट सापडत नाही त्यांचा तू सारथी बनून मार्ग दाखवण्याचे काम कर. तुझी जे साधना करतात, नित्य तुझी जे प्रार्थना करतात. त्यांना तू सतत तुझा सहवास दे. म्हणजेच तू नेहमीच त्यांच्या सोबत राहा.

 

Translation in English:

Be thou the companion of those who have no guardian, who have no guardian, who have no loving sky. Do the job of sheltering them. Work to give them the shadow of Maya. Those who are lost while traveling on the path of life, those who do not find the meaning of life, you become the charioteer and work to show the way. Those who worship you, who pray to you constantly. Give them your company constantly. That means you always stay with them.

 

 

जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना

तेवत्या राहो सदा रंध्रातुनी संवेदना

धमन्यातल्या रुधिरास या खल भेदण्याची आस दे

सामर्थ्य या शब्दांस आणि अर्थ या जगण्यास दे

 

अर्थ : या जगात जे दुर्बल आहेत, त्यांचे दुःख आणि वेदना जाणून घेण्यासाठी माझ्या शरीरातील रंध्रारंधात सतत संवेदना तेवत ठेवण्याचे काम तू कर. माझ्या मधील संवेदना सतत जागृत ठेवण्याचे काम तू कर. दुःखितांचे दुःख दूर करण्याची आस माझ्या शरीरातील प्रत्येक धमन्यातून वाहणाऱ्या रक्तात असू दे. ही शब्दरूपी काव्य सुमने मी तुझ्यापुढे ठेवतो. त्या सर्व शब्दांस आणि माझ्या संपूर्ण जगण्यास एक प्रकारचा अर्थ तू दे. जेणेकरून माझा जन्म दुर्बलांचे दुःख दूर करण्यासाठी उपयोगी पडेल.

 

Translation in English:

Do the work of constantly burning the senses in the pores of my body to know the pain and suffering of those who are weak in this world. Do the work of keeping my senses constantly awake. May the hope of relieving the suffering of the afflicted be in the blood flowing through every artery of my body. I present before you this verbal poem. You give some kind of meaning to all those words and to my whole life. So that my birth will be useful in relieving the suffering of the weak.

 

 

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती

नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती

पंखास या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे

 

अर्थ : मला सतत चांगला मार्ग आणि चांगली बुद्धी लाभू दे. सतत चांगल्या, सज्जन माणसांची संगत मिळू दे. माझ्या जीवनात कितीही संकटे आली तरी मी माझ्या कर्तव्यापासून कधी दूर होणार नाही, अशी माझी नितीमत्ता राहू दे. माझे आचरण कधीही भ्रष्ट होऊ नये. जीवनरूपी वाटेवरून प्रवास पार करण्यासाठी या पंखांना तू बळ दे. कायम सत्याची कास धरून संवेदनशीलता जपण्यासाठी तसेच आकाशात झेपावण्यासाठी बळ दे. म्हणजेच सतत सौंदर्यांचा ध्यास माझ्या मनात राहू दे आणि तो ध्यास पूर्ण करण्यासाठी नवे आकाश म्हणजेच आकाशाएवढ्या नव्या संध्या तू निर्माण कर, की ज्यामध्ये मी माझे कर्तृत्व दाखवू शकेन.

 

Translation in English:

May I always have a good path and good wisdom. May you always have the company of good, gentle people. Let my resolve remain that no matter how many troubles may come in my life, I will never deviate from my duty. May my conduct never be corrupted. Give strength to these wings to cross the path of life. That is, let the desire for beauty remain in my mind continuously and to fulfill that desire, create a new sky i.e. a new evening equal to the sky, in which I can show my achievements.