पाठ १७ – पाणपोई
The poem describes how the earthen water pots (panpoi) quench the thirst of travellers exhausted due to scorching heat of the sun. The poet feels grateful and gives blessings to the person who thought of the idea of setting up such water service.
अंगाची लाही लाही होणे – उन्हामुळे अंगाची आग होणे
दग्ध ऊन – भाजणारे ऊन
पाणपोई – वाटसरूंना, रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांना पाणी पिण्यासाठी केलेली सोय
रखरखते ऊन – खूप कडक ऊन
ग्लानी येणे – चक्कर येणे, धुंदी येणे
रंक – गरीब
राव – श्रीमंत
तृप्त होणे – समाधानी होणे
स्वाध्याय
प्र. १. एका-दोन वाक्यांत उत्तरे लिहा.
(अ) अंगाची लाही लाही कशामुळे होते?
उत्तर: उन्हामुळे घामेजून अंगाची लाही लाही होते.
(आ) अवखळ वारा सुटल्यावर काय होते?
उत्तर: अवखळ वारा सुटल्यावर धुळीबरोबर पालापाचोळा अंबरात उंच जातो.
(इ) थकलेल्या वाटसरूला ग्लानी का येते?
उत्तर: उन्हामुळे थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते.
(ई) पाणपोईवर पाणी पिण्यास काेण कोण येतात?
उत्तर: रंक असो वा राव पाणपोईवर पाणी पिण्यासाठी सारेजण येतात.
(उ) ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद का देतात?
उत्तर: भरपेट पाणी पिऊन मनाला तृप्त वाटते म्हणून ज्यांनी पाणपोई थाटली त्याला आशीर्वाद देतात.
प्र. २. उष्णगरम, थंडगार, पालापाचोळा या शब्दांतील दोन्ही शब्द एकाच अर्थाचे आहेत, असे शब्द शोधा व लिहा.
उत्तर:
(अ) भाजीपाला
(आ) गंमतजंमत
(इ) सरमिसळ
(ई) पाऊसपाणी
(उ) जवळपास
(ऊ) कामधंदा
प्र. ३. घामेजणे, लाही लाही होणे, उष्णगरम झळाई, रखरखते ऊन, तहान लागणे या शब्दसमूहांचा वापर करून पाच-सहा वाक्ये लिहा.
उत्तर:
(१) घामेजणे – उन्हामुळे आपले अंग घामेजते.
(२) लाही लाही होणे – उन्हामुळे घामेजून अंगाची लाही लाही होते.
(३) उष्णगरम झळाई – उन्हाळ्यात दुपारच्या वेळी रस्त्यावरून जाताना उन्हाच्या उष्णगरम झळाई लागत होत्या.
(४) रखरखते ऊन – दुपारी दोन वाजता रखरखते ऊन होते.
(५) तहान लागण – तासभर चालल्यामुळे संजूला तहान लागली.
प्र. ४. रखरख, गरगर यांसारखे अक्षरांची पुनरावृत्ती होणारे शब्द शोधा व लिहा.
उत्तर:
(१) लाहीलाही
(२) पालापाचोळा
(३) गरागरा
(४) सारखी सारखी
(५) थंडगार
(६) रखरखत्या
प्र. ५. पाणपोई हा पाण्याशी संबंधित शब्द आहे. तसेच खालील शब्द वाचा व समजून घ्या.
पाणबुड्या, पाणलोट, पाणवठा, पाणथळ, पाणकोंबडा, पाणघोडा, पाणवनस्पती.
प्र. ६. ऊन या शब्दाला विशेषणे लावलेली आहेत. ती वाचा व समजून घ्या.
प्र. ७. खालील विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) गार ×
उत्तर: गरम
(आ) रंक ×
उत्तर: राव
(इ) ऊन ×
उत्तर: पाऊस, सावली
(ई) तृप्त ×
उत्तर: अतृप्त
(उ) दुवा ×
उत्तर: बददुवा
(ऊ) सज्जन ×
उत्तर: दुर्जन
प्र. ८. तुम्हांला खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली, तर तुमच्या मनात कोणते विचार येतील ते लिहा.
उत्तर: खूप तहान लागली असताना अचानक पाणपोई दिसली तर मी मनोमन प्रथम देवाचे आभार मानेन. पाणपोईवरील थंडगार पाणी पिऊन झाल्यावर पाणपोईची सोय करणाऱ्यांना धन्यवाद दद्यावेत असे विचार माझ्या मनात येतील.
प्र. ९. चालून चालून थकलेल्या वाटसरूला थंडगार पाणी मिळाल्यावर त्याला काय वाटत असेल, कल्पना करा व लिहा.
उत्तर: चालून चालून थकलेल्या वाटसरूला ग्लानी येते. अशा वेळी जर त्याला थंडगार पाणी मिळाले तर ते त्याला अमृताहून गोड लागते. त्याला त्या पाण्याच्या घोटाचे महत्त्व कळते. पाणी पिऊन तो तृप्त होतो, आणि ज्याने त्याच्यासाठी थंडगार पाण्याची सोय केली त्याला धन्यवाद देतो, आशीर्वाद देतो.
प्र. १०. तुमच्या गावातील एखाद्या पाणपोईवर जा. पाणपोई कोणी काढली, ती काढण्यामागचा उद्देश, त्याची निगा कशी राखतात, पाणी कसे भरले जाते याची माहिती घ्या. ही एक मोठी समाजसेवा कशी आहे, याबद्दल सात-आठ ओळी लिहा.
उत्तर: आमच्या गावातील बसस्थानकाजवळील मोठ्या झाडाखाली पाणपोईची सोय केली आहे. गावातील लोकांनी सहकारातून, वर्गणी काढून पाणपोई सुरू केली. झाडाखाली सकाळीच सात-आठ रांजणे पिण्याचे पाणी भरून ठेवलेली असतात. दूरदूरच्या गावांहून बसने आलेले प्रवासी, शाळेत जाणारी मुले, वाटसरू पाणपोईवर पाणी पिऊन तृप्त होतात. लोकांच्या सहभागातून सुरू केलेल्या पाणपोईचे सर्वजण कौतुक करतात, आशीर्वाद देतात. अशा प्रकारे पाणपोई काढून आमचा गाव मोठी समाजसेवा करत आहे.
विचार करून सांगा!
प्र. १. पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा.
उत्तर: पाराची वाडी या गावातील मुलांनी खेळाच्या सामानासाठी जमवलेल्या पैशांत पाणपोई उभारायचे ठरवले. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. तहानलेल्या वाटसरूंची तहान भागवण्यासाठी शकीलच्या घराजवळील झाडाखाली पाण्याचे माठ ठेवून त्यांनी थकल्याभागल्या वाटसरूंसाठी विसाव्याचे ठिकाणच तयार केले. गावातील मोठ्या माणसांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. मुलांनी केवळ पाणपोई उभारण्यातच उत्साह दाखवला नाही, तर रोज माठांत पाणी भरण्याची, त्यांच्या स्वच्छतेची व पाण्याच्या काटकसरीचीही जबाबदारी घेतली.
प्र. २. आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो, तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का? तुमचे मत सांगा.
उत्तर: आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो तेव्हा नक्कीच घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे. कारण एखादा उपक्रम, प्रयोग करताना वापरल्या जाणाऱ्या साधनांमुळे निष्काळजीपणामुळे दुष्परिणाम किंवा एखादा अपघात होऊ शकतो त्यामुळे आपल्या जीवाला धोका पोहोचू शकतो. म्हणून एखादा मोठा उपक्रम करायचा असेल तर तो घरातील मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली करावा. ज्यामुळे आपल्याला मदतच होईल. काही नवीन कल्पना आपल्याला मिळतील आणि पुढे होणारे नुकसान टाळता येईल.
प्र. ३. अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असे तुम्हांला वाटते? ते उपक्रम थोडक्यात सांगा.
उत्तर:
(१) प्रौढ व्यक्तींना त्यांच्या कामामधून वेळ काढायला लावून त्यांना लिहिता-वाचता यावे यासाठी प्रौढ साक्षरता वर्ग घ्यावेत.
(२) वाचनालय गावांमध्ये वाचनकट्टा सुरू करावा. शाळेतील विद्याथ्र्यांना शालेय पुस्तकांव्यतिरिक्त वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच गावातील स्त्री-पुरुषांनाही चांगल्या पुस्तकांचे, रोजच्या वर्तमानपत्राचे वाचन करता यावे यासाठी छोटा वाचन कट्टा सुरू करावा कारण छोट्या खेडेगावांमध्ये रोजचे वर्तमानपत्रसुद्धा लोकांपर्यंत पोहोचत नाही.
(३) आरोग्य शिविर दर महिन्याला गावागावांमध्ये आरोग्य शिबिराचे आयोजन करावे. कारण वैदयकीय उपचारांसाठी गावातील लोकांना तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते जे वाहतुकीअभावी शक्य नसते आणि खर्चीक असते.
प्र. ४. ‘पाणी’ या विषयावरची घोषवाक्ये तयार करून त्याच्या पाट्या तयार करा.
उत्तर:
प्र. ५. ‘पाणी हेच जीवन’ यावर आधारित दहा ओळी लिहा.
उत्तर: पाणी हेच जीवन आहे. पृथ्वीतलावरील सर्व सजीवांचे जीवन हे पाण्यावरच अवलंबून आहे. म्हणूनच पाण्याचा योग्य वापर करून आपण आपले व इतरांचेही जीवन वाचवले पाहिजे. पाणी वाचविणे व ते प्रदूषित होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
पृथ्वीवर पाण्याचे प्रमाण ७१% असूनही त्यातील पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण फक्त ३% आहे. त्यामुळेच पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने पाण्याचा अपव्यय टाळला तर पाण्याची नक्कीच बचत आपण करू शकतो.
विहीर, कूपनलिका, तलाव, नदी, ओहे यातून आपणास पिण्यायोग्य पाणी मिळत असते. भूगर्भातील व जमिनीवरील हे पाण्याचे स्रोत मानवाने आपल्या कृतींमुळे प्रदूषित केले आहेत. प्रदूषित पाण्यामुळे सर्व सजीवांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.
पाण्याचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. उपलब्ध पाण्याचा आज आपण जपून वापर केला तर पाणीटंचाईचा सामना आपल्याला करावा लागणार नाही. ‘पाणी वाचवा, जीवन वाचवा’ हे सूत्र सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे. पाण्याची बचत करणे ही काळाची गरज आहे. पाणी हे निसर्गाचे अनमोल रत्न आहे. त्यास वाचवण्याचा प्रयत्न करणे हे प्रत्येकाचे काम आहे. पाणी वाचवणे आवश्यक आहे याबाबत जाणीव व जागृती फक्त २२ मार्च या जागतिक जलदिनापुरतीच मर्यादित नाही. प्रत्येकाचा सहभाग जलसमृद्धीसाठी आवश्यक आहे. कारण पाणी हेच जीवन आहे.
प्र. ६. तुम्ही एखादा उपक्रम केला असेल, तर त्याबाबतची माहिती मित्राला पत्राने कळवा.
उत्तर:
१६ जून २०१९
प्रिय मित्र मिथिल,
सप्रेम नमस्कार,
मुद्दाम तुला पत्र लिहित आहे. अरे सुट्टीत तू काय केलेस? मी सुट्टीत खूप धमाल केली. शाळेला मे महिन्याची सुट्टी पडल्यावर आम्ही मामाच्या गावी कोकणात गेलो. आई-बाबांबरोबर मावशी-काका, मावस भावंडे असे बरेच जण असल्यामुळे प्रवासात तर आम्ही धमालच केली. गाणी काय, अंताक्षरी काय काही विचारू नकोस, दोन्ही बाजूला हिरवीगार झार्ड, उंच उंच डोंगर असा सुंदर निसर्ग पाहायला खूप मजा वाटत होती. प्रवासाचा आनंद घेत घेत आम्ही रत्नागिरी स्टेशनवर उतरलो.
रत्नागिरी स्टेशनवरून एस.टी ने आम्ही मामाच्या गावी गेलो. गाव खूप सुंदर होते. सगळीकडे आंब्यांच्या नारळाच्या काजूच्या बागा, कौलारू मोठी घरं, प्रत्येक घरापुढे मोठे अंगण, घराच्या सभोवताली केळीची, जास्वंदाची झाडे, वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं. मामाचं घर तर खूप मोठं आणि घरात माणसेही भरपूर. मग काय नुसती धमाल!
सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटाने लवकरच जाग यायची. आजी चुलीवरचा गरम गरम चहा द्यायची. मग मामाबरोबर गोठ्यात जायचं, गुरं सोडायची. गुरांच्या पाठीवरून मायेने हात फिरवायचा. विहोरीवर जाऊन अंघोळ करायची.
मामाबरोबर आंब्यांच्या बागेत जायचो. मामा झाडावरून अलगद आंबे काढायचा आणि पिकलेले आंबे आम्हांला दयायचा. आम्ही सगळे त्या आंब्यांचा फडशा पाडायचो. फणसाचे गरे खायचो. कधी कधी शेतात जायचो. मामेभावंडांसोबत आम्ही रानात जायची करवंदांच्या जाळीवरून करवंद काढून खायचो.
आम्ही भावंडे भरपूर खेळायचो. दुपारच्या वेळेस सापशिडी, पत्ते असे बैठे खेळ खेळायचो. मळ्यात क्रिकेट खेळायचो. नारळाच्या झाडावर चढून मामा शहाळी काढून दयायचा. पोटभर नारळपाणी प्यायचो. कोकम सरबत प्यायचो. मामीबरोबर आठवडा बाजारात जायची. आजीच्या हातचे घावणे – नारळाचे दूध, फणसाची भाजी, खीर असे वेगवेगळे पदार्थ खायची मजा वेगळीच. भरपूर खाणे, खेळणे, मस्त फिरणे यात सुट्टी कधी संपली हे कळले देखील नाही.
काका-काकूंना माझा नमस्कार सांग. तू सुट्टीत काय केलेस हे पत्राने मला कळव.
तुझा मित्र,
सार्थक
खालील उतारा वाचा. त्या उताऱ्यात पूर्णविराम (.) स्वल्पविराम (,) प्रश्नचिन्ह (?) उद्गारचिन्ह (!) आणि एकेरी अवतरणचिन्ह (‘-’) घाला व उतारा पुन्हा लिहा.
एका छोट्याशा गावात एक सधन शेतकरी राहत होता शेतात काम करणाऱ्या दोन बैलजोड्या त्याच्याकडे होत्या तसेच दोन म्हशीही होत्या आणि एक चांगली धष्टपुष्ट आणि पुष्कळ दूध देणारी कपिला नावाची गायही होती त्यामुळे त्याच्या घरी भरपूर दूधदुभते असे ते दूध तो साऱ्या गावात विके
एकदा अशीच सारी गुरे नीट बांधून तो शेतकरी घरात जाऊन झोपला पण सकाळी उठून पाहतो तो त्याची गाय तिथे नव्हती. अगदी कासावीस झाला तो पांढरा आणि तपकिरी रंग असलेली ती गाय त्याची खूप लाडकी होती. लाेक मुद्दाम गाईचे दूध तूप दही नेत असत आता लाेकांना काय सांगणार काय करावे शेवटी तो शेजारच्या गावी दुसरी गाय विकत आणण्यासाठी गेला बाजार गुरांनी भरून गेला होता निरनिराळ्या रंगांच्या धिप्पाड मध्यम आणि बऱ्यापैकी दूध देणाऱ्या अशा अनेक गाई त्याने पाहिल्या गाई बघत तो असाच पुढे जात असताना एका गाईजवळ येऊन तो थांबला अन काय आश्चर्य कपिलेने त्याच्याकडे पाहिले त्याचे ही डोळे चमकले अरे ही तर आपली गाय कपिला नक्कीच या माणसाने त्या दिवशी माझी गाय चोरून नेली असावी आपल्या गाईच्या पाठीवर त्याने प्रेमाने थाप मारली कपिलेने त्याला ओळखले तिने आनंदाने कान व शिंगे हालवली
खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा.
एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डाव म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला…
उत्तर:
एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डाव म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला. चिखलात रुतलेला दगड काढण्याचा प्रयत्न उजवा हात करू लागला. पण दगड मोठा असल्याने एकट्या उजव्या हाताला तो बाहेर काढणे जमतच नव्हते. ते पाहून डावा हात हसला व म्हणाला, “बघ, मला माहीत होते तुला जमणारच नाही” असे म्हणून नंतर डावा हात पुढे आला. तो सुद्धा चिखलात रुतलेला दगड काढू लागला. पण त्यालाही ते शक्य झाले नाही. हे सर्व पाहत असणारे डोके दोन्ही हातांना म्हणाले, “तुम्ही दोघांनी स्वतंत्र प्रयत्न करून पाहिलात तर दगड काढू शकला नाहीत. आता दोघांनी मिळून तो दगड बाहेर काढून पहा बरे निघतोय का ?” डोक्याचे हे म्हणणे ऐकल्यावर उजव्या आणि डाव्या दोन्ही हातांनी तो दगड काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा दगड बाहेर काढण्यात ते सफल झाले आणि दोघेही खजिल झाले. डोके म्हणाले, आपण या शरीराचे सर्वजण सेवक आहोत. सर्वच अवयव महत्त्वाचे आहेत. कोणीही श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नाही. सर्व अवयवांनी एकमेकांच्या साहाय्याने काम करणे अतिशय महत्त्वाचे आहे. आणि तसे ते केले तरच कोणतेही काम पूर्ण होऊ शकते.
इयत्ता पाचवीमध्ये तुमचा शब्दसंग्रह तुम्ही तयार केला आहे. शब्दसंग्रह किंवा शब्दकोश कसा पाहावा हे आपण पाहूया.
‘अ’ गट
गोरा, गंमत, गुलाब, गवत, गौतमी, गाणे, गैबत, गेनबा, गीता, गिरणी, गूळ
‘ब’ गट
गवत, गाणे, गिरणी, गीता, गुलाब, गूळ, गेनबा, गैबत, गोरा, गौतमी, गंमत
वर दिलेले ‘अ’ गटातील व ‘ब’ गटातील शब्द वाचा. ‘अ’ गटातील शब्द हे बाराखडीतील स्वरचिन्हानुसार दिलेले नाहीत. मात्र ‘ब’ गटातील शब्द हे बाराखडीतील स्वरचिन्हानुसार दिलेले आहेत.
पाठ्यपुस्तकातील पाठ २ आणि पाठ ३ मधील शब्दार्थ शब्दकोशाप्रमाणे खालील चौकटीत दिले आहेत.
‘अ’ गट
एकदा काय झालं, आपल्या शरीराचे दोन हात, उजवा आणि डावा एक दिवस चक्क भांडायला लागले. उजवा हात म्हणाला, ‘‘आजपासून मी आराम करणार!’’ मग डावा म्हणाला, ‘‘का, काय झालं? तू का आराम करणार?’’ ‘‘मी मोठा आहे, तुझ्यापेक्षा माझा मान जास्त आहे.’’ उजवा हसून म्हणाला, ‘‘वा!वा! म्हणे मी मोठा आहे. अरे, जा मी तुला मोठा मानतच नाही. अरे माझ्याशिवाय पान हालत नाही माहीत आहे का तुला?’’ उजवा हात म्हणाला. दोन्ही हातांचे बराचवेळ भांडण चालले होते. इतकावेळ शांत बसलेले डोके मग रागाने म्हणाले, ‘‘अरे थांबा हे काय चाललंय? तुमच्या दोघांत चांगले काम कोण करतो हेच मी पाहणार आहे.’’ ‘‘हो! हो! पाहाच!’’ उजवा हात म्हणाला. ‘‘ मी पण तयार आहे.’’ डाव म्हणाला. दोन्ही हात तयार झाले. ‘‘चला तर मग, तो पाहा त्या तिथे एक दगड चिखलात रुतून बसलाय. बघू त्याला कोण बाहेर काढतंय.’’ डोक्याने असे म्हणताच उजवा म्हणाला, ‘‘मी काढणार! माझा पहिला नंबर.’’ तेव्हा डावा म्हणाला, ‘‘जा जा! तुझी किती ताकद आहे.’’ डावा असे म्हणताच मोठ्या ऐटीत उजवा निघाला…
‘ब’ गट
(१) आमराई – आंब्याच्या झाडांची बाग.
(२) ऐन दुपारी – भर दुपारी.
(३) कडकडून भेटणे – प्रेमाने मिठी मारणे.
(४) खचणे – खाली खाली येणे, ढासळणे.
(५) गहिवरून येणे – मन भरून येणे.
(६) गिल्ला करणे – गोंधळ करणे.
(७) चडफड – राग.
(८) तल्लीन होणे-दंग होणे, गुंग होण.
(९) धमाल-मजा
(१०) पाडाचा आंबा-अर्धवट पिकलेला आंबा.
(११) बिलगणे-प्रेमाने जवळ येणे.
(१२) भणाण वारा – वाऱ्याचा भयभीत करणारा आवाज.
(१३) लुकलुकणे – चमकणे.
आले का लक्षात?
‘क, ख ….. ज्ञ’ या अक्षरांच्या क्रमानुसार व स्वरचिन्हानुसार वरील शब्द लिहिले आहेत.
शब्दकोश पाहताना याच पद्धतीने पाहा. पाठ्यपुस्तकातील किंवा पाठ्येतर साहित्यातील शब्दांचे अर्थ पाहताना या पद्धतीने शब्दकोश पाहा. पाठ्यपुस्तकातील इतर पाठांमध्ये आलेले शब्दार्थ पाहा व शब्दकोशाप्रमाणे लिहून अधिकचा सराव करा.