पाठ ८ – शब्दांचे घर
हळवे – कोमल
मेळ – एकत्र असणे
धुसफुस – जळफळणे
भान – लक्ष, ध्यान
झिरपणे – पाझरणे
Words are one of the most precious gift ever received by mankind. Beautiful words make our lives rich and meaningful. This enlightening poem describes where and what role these words play in our lives.
स्वाध्याय
प्र. १. कोण ते लिहा.
(अ) शब्दांच्या घरात राहणारे-
उत्तर: स्वर
(आ) घरात एकोप्याने खेळणारे-
उत्तर: गाणे
(इ) अवतीभवती झिरपणारे-
उत्तर: काना – मात्रा – वेलांटी
प्र. २. कवितेच्या खालील ओळी पूर्ण करा.
(१) घरात होता, _____
_____ अक्षर-खेळ.
उत्तर: घरात होता, काना मात्रा वेलांटीचा मेळ
एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ.
(२) एखादयाची _____
_____ भान.
उत्तर: एखाद्याची धुसफुससुद्धा हवीहवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखाचे भान
(३) कानोकानी _____
_____ कवितेचाही लळा.
उत्तर: कानोकानी कुजबुजताना अंकुर मनकोवळा वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा.
चर्चा करा मांगा.
शब्दांमुळे, भाषेमुळे दैनंदिन व्यवहारात कोणते फायदे होतात, या विषयावर मित्रांशी चर्चा करा.
उत्तर: भाषेमुळे एकमेकांशी संवाद साधला जातो. भाषेमुळे आपण अनेक जणांशी मैत्री करू शकतो. भाषेमुळे विचार करण्याची क्षमता वाढते. समूहात रहाण्यासाठी भाषेचा उपयोग होतो.. आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना, अनुभव आपल्याला भाषेमुळे व्यक्त करता येतात. भाषेमुळे आपण आपल्या मनातील आनंद, द्वेष दुसऱ्यापर्यंत सहजपणे पोहोचवू शकतो. भाषेमुळे आपला शब्दसंग्रह वाढतो. ज्ञान वाढते. भाषेमुळे व्यवहारातील कामे सुलभ होण्यास मदत होते. भाषेमुळे आपण बोलणे, वाचणे, लिहिणे व आकलन करणे ही कौशल्ये विकसित करू शकतो.
वाचा.
(अ) खालील शब्दांपासून अर्थपूर्ण शब्द बनवा.
उदा., लांटीवे-वेलांटी
(१) सफुधुस
उत्तर: धुसफुस
(२) रकुअं
उत्तर: अंकुर
(३) कानीनोका
उत्तर: कानोकानी
(आ) खालील शब्दांना कवितेत आलेली विशेषणे लिहा.
(१) ____ घर.
उत्तर: सुंदर
(२) ____ स्वर.
उत्तर: हळवे
(३) ____ अंकुर.
उत्तर: मनकोवळा
(४) ____ वाट.
उत्तर: मोकळी
(इ) खालील शब्दसाखळी पूर्ण करा.
उदा., सुनीता → तारा → राघवेंद्र → द्रव → वजन → नमन → ____
उत्तर: सुनीता → तारा → राघवेंद्र → द्रव → वजन → नमन → नजर → रचना → नाच → चमचा → चाफा
प्रकल्प : ‘शब्द’ या विषयावर आधारित सुविचार मिळवा. त्यांचा संग्रह करा. त्याची सुंदर चिकटवही बनवा.
उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.
खेळ खेळूया.
खालील चौकटी वाचा. त्याप्रमाणे उरलेल्या चौकटी पूर्ण करा.
(अ)
(आ)
उत्तर:
शब्दकोडे सोडवूया.
खालील चौकोनातील अक्षरांमध्ये शब्दयोगी अव्यये लपलेली आहेत. उभ्या आडव्या, तिरप्या पद्धतीने अक्षरे घेऊन शब्दयोगी अव्यये बनवा व दिलेल्या जागेत लिहा.
उत्तर:
(१) नंतर
(२) नजीक
(३) समोर
(४) वर
(५) प्रमाणे
(६) साठी
(७) सकट
(८) खाली
(९) पुढे
(१०) सह
(११) मागे
विरामचिन्हांचा वापर करून परिच्छेद सुवाच्य अक्षरांत पुन्हा लिहा.
मुलांनो शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात तुमची काळजी घेणारे तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत कोण बरे आहेत हे मित्र असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल आपल्याला फळे फुले सावली देणारे वृक्ष आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नदया श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे.
उत्तर: मुलांनो, शाळेत तुम्हांला अनेक मित्र असतात. तुमची काळजी घेणारे, तुमचे आरोग्य जपणारे असे अनेक मित्र तुमच्या सभोवती आहेत. कोण बरे आहेत हे मित्र? असा प्रश्न तुम्हांला निश्चितच पडेल, आपल्याला फळे, फुले सावली देणारे वृक्षः आपल्याला पिण्यासाठी पाणी देणाऱ्या नदया, श्वसनासाठी ऑक्सिजन देणारी हवा, आपण ज्यावर निवांतपणे राहतो अशी जमीन अर्थातच आपल्या सभोवतालचा निसर्ग हाच आपला खरा मित्र आहे.