पाठ ७ – आजारी पडण्याचा प्रयोग
पडसे – सर्दी
हेवा वाटणे – असूया वाटणे
ऐट – तोरा
मनात विचार चमकणे – मनात विचार येणे
नाखुशी – नाराजी
Sick people are rather lucky because they get to relish fruits, sweets, and other tasty treats. Everyone in the house has a good time when they fall sick or feel like a young boy. Therefore, he pretends to be ill and goes to the doctor. This humorous lesson describes how he was fooled.
स्वाध्याय
प्र. १. केव्हा ते लिहा.
(अ) पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे, असे वाटू लागले.
उत्तर: पाठातील मुलाच्या घरातील आजारी माणसे संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषधे, शिरा हे पदार्थ ‘औषध’ म्हणून घेत असत. हा मुलगा कधीही आजारी पडत नसे म्हणून या पदार्थाना हात लावायची त्याला सक्त मनाई असे. तेव्हा ही औषधे आपणंही बरोबरीने घ्यावीत व त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले.
(आ) मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले.
उत्तर: घरातील सर्व मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती पण मुलाच्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते, तेव्हा मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले.
(इ) मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.
उत्तर: डॉक्टरांनी मुलाला तपासले. इकडे, तिकडे, पालथे वळायला सांगितले. गळ्यातली नळी छातीवर लावली, जीभ बघितली, तेव्हा मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले.
(ई) डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली.
उत्तर: “तुझी तब्येत ठणठणीत आहे, तेव्हा औषध काही नाही. पळ घरी जा.” असे डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली.
प्र. २. आकृत्या पूर्ण करा.
(अ)
उत्तर:
(आ)
उत्तर:
प्र. ३. खालील तक्ता पूर्ण करा.
उत्तर:
प्र. ४. तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल, ते लिहा.
उत्तर: घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास मी त्यांच्या सेवेसाठी सदैव हजर असेन. त्यांना औषधे, खाणे-पिणे वेळच्या वेळी देईन. त्यांना वर्तमानपत्र किंवा आवडीची पुस्तके वाचून दाखवेन. त्यांच्याशी गप्पा मारेन, त्यांचे मनोरंजन होईल याकडे लक्ष देईन.
चर्चा करा मांगा.
पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेले आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.
(१) इतिश्री
उत्तर: शेवट
वाक्य : पसायदानाने कार्यक्रमाची इतिश्री झाली.
(२) छत्तीसचा आकडा
उत्तर: वैर, विरोध
वाक्य : साप आणि मुंगूस यांचा नेहमी छत्तीसचा आकडा असतो.
(३) जमदग्नीचा अवतार
उत्तर: अतिशय रागीट मनुष्य
वाक्य : आमचे काका म्हणजे जमदग्नीचा अवतार.
(४) चोरावर मोर
उत्तर: वरचढ होणे
वाक्य : नवीन आलेला संजय सर्व कलाकारांमध्ये चोरावर मोर ठरला.
(५) लंकेची पार्वती
उत्तर: अंगावर दागिने नसलेली स्त्री.
वाक्य : सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतकऱ्याची पत्नी लंकेची पार्वती झाली.
(६) कळीचा नारद
उत्तर: भांडणे लावणारा
वाक्य : विजय वर्गात नेहमी कळीच्या नारदाची भूमिका करतो.
(७) घागरगडचा सुभेदार
उत्तर: पाणक्या (जमिनीतील पाण्याचा साठा शोधणारा)
वाक्य : सदूभाऊ संपूर्ण जिल्ह्यात घागरगडचा सुभेदार म्हणून ओळखले जातात.
(८) उंटावरचा शहाणा
उत्तर: मूर्खपणाचा सल्ला देणारा
वाक्य : पावसाळ्यात घराचे छप्पर गळू लागले म्हणून एका उंटावरच्या शहाण्याने नवीन घर बांधण्याचा सल्ला दिला.
(९) गळ्यातला ताईत
उत्तर: अतिशय प्रिय
वाक्य : शाळेत सर्व स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक पटकविणारा गौरांग शिक्षकांच्या गळ्यातला ताईत झाला आहे.
वाचा.
(अ) खालील शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा.
(अ) डॉक्टर –
उत्तर: वैदय
(आ) ऑपरेशन –
उत्तर: शस्त्रक्रिया
(इ) मेडिसीन –
उत्तर: औषध
(ई) पेशंट –
उत्तर: रुग्ण
(आ) ‘गुलगुलीत बिछाना’ याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनांतील शब्दांच्या जोड्या जुळवा.
उत्तर:
(१) टवटवीत फूल
(२) चमचमीत जेवण
(३) ठणठणीत आरोग्य
(४) बटबटीत डोळे
(५) मिळमिळीत भाजी
(६) गुळगुळीत दगड
(इ) खाली दिलेल्या चौकोनातील चित्रासंबंधी काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा उपयोग करून वाक्ये तयार करा.
उत्तर:
(१) हॉस्पिटलमध्ये (इस्पितळात) औषधांचा भरपूर साठा होता.
(२) सरकारी डॉक्टरांच्या औषधांवर आजीचा खूप विश्वास.
(३) बाबांनी औषधांच्या नवीन बाटल्या आणल्या.
(४) हळद आणि मध हे खोकल्यावर रामबाण औषध.
(५) डॉक्टरांचे कपाट औषधांनी भरलेले होते.
(६) औषधांना आजकाल खूप मागणी असते.
(७) जुन्या औषधांतून प्राण्यांना विषबाधा झाली.
(८) काकूला आयुर्वेदिक औषधांपासून चांगला आराम पडला.
(ई) कंसात दिलेल्या वाक्प्रचारांचा उपयोग करून खालील वाक्ये पूर्ण करा.
(सुचेनासे होणे, सक्त मनाई असणे, फुशारकी मारणे, ठणठणीत असणे)
(अ) सुलेमानचाचा रोज सकाळी फिरायला जातात, त्यामुळे त्यांची तब्येत _____
उत्तर: ठणठणीत असते.
(आ) ध्वनिक्षेपकाच्या आवाजामुळे घरात आजोबांना काही _____
उत्तर: सुचेनासे झाले.
(इ) जॉन आज शाळेत नवीन कंपास घेऊन आला होता. वर्गातील सर्व मुलांना दाखवत तो खूप _____ होता.
उत्तर: फुशारकी मारत
(ई) तो रस्ता खासगी असल्यामुळे आपले वाहन तेथून नेण्याला _____
उत्तर: सक्त मनाई आहे.
उपक्रम : मराठी भाषेत विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची व त्यांच्या साहित्याची शिक्षक, पालक यांच्या मदतीने यादी करा. विनोदी गोष्टी वाचा व वर्गात सांगा.
उत्तर: विद्यार्थांनी हे स्वतः करावे.
सारे हसूया.
संजू : मोहन, हे बोटावर आकडे का लिहिलेस ?
मोहन : अरे माझी आजी म्हणते, “नुसत्या बोटावर आकडेमोड करता आली पाहिजे.”
अजय : थंडी वाजते तेव्हा तू काय करतोस ?
विजय : मी मेणबत्तीजवळ बसतो.
अजय : आणि खूप थंडी वाजली तर ?
विजय : मेणबत्ती पेटवतो.
संदेश तयार करूया.
दवाखाना वा दवाखान्याच्या परिसरात अनेक पाट्या असतात. त्या वाचा, त्यावरील मजकूर खालील रिकाम्या पायांवर लिहा.
उत्तर:
आपण समजून घेऊया.
वरील अधोरेखित शब्द स्वतंत्र नाहीत. वर, बाहेर. पेक्षा हे शब्द अनुक्रमे टेबल, घरटे, विनया या शब्दांना जोडून आले आहेत, म्हणून ती शब्दयोगी अव्यये आहेत. आता, पूर्वी, नंतर, पर्यंत, आत, मागे, शिवाय हीदेखील शब्दयोगी अव्यये आहेत.
जेव्हा शब्दयोगी अव्यये नाम किवा सर्वनाम यांना जोडून येतात, तेव्हा नामाच्या किंवा सर्वनामाच्या मूळ रूपात बदल होतो. अशा शब्दांना सामान्यरूप म्हणतात. उदा., शाळा-शाळेत फाटक- फाटकात, रस्ता- रस्त्याला, मुले-मुलांना.
लक्षात ठेवा : शब्दयोगी अव्यय व क्रियाविशेषण अव्यय यांत फरक आहे.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा.
(अ) आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.
उत्तर: समोर
(आ) मुलांनी फुगेवाल्याभोवती गर्दी केली.
उत्तर: भोवती
(इ) आमचा कुत्रा मला नेहमी मित्राप्रमाणे भासतो.
उत्तर: प्रमाणे
(ई) देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?
उत्तर: कडे
शब्दकोडे सोडवूया.
१. नदीचे पाणी कशामुळे प्रदूषित होते?
उत्तर: शहराच्या सांडपाण्यामुळे, रासायनिक खतांचा वापर केलेल्या शेत जमिनीतून झिरपणाऱ्या पाण्यातील किंवा कारखान्याच्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये पाण्यात मिसळल्याने आणि माणसांच्या वाईट सवयींमुळे नदीचे पाणी प्रदूषित होते.
२. नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, म्हणून काय उपाय करता येतील?
उत्तर: जलपर्णी उगवल्याने पाणी प्रदूषित होते.
३. जलपण उगवल्याने पाण्यावर कोणता परिणाम होतो?
उत्तर: नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून पुढील उपाय करता येतील.
(अ) प्रक्रिया करूनच नदीत सांडपाणी सोडले पाहिजे.
(ब) नदीत निर्माल्य, कचरा टाकू नये.
(क) माणसाने आपल्या वाईट सवयी सोडून दिल्या पाहिजेत उदा. नदीकाठी कपडे-गुरे धुणे, शौचास बसणे, नदीत आंघोळ करणे.
(ड) नदीतील गाळ उपसला पाहिजे.
४. नदीमध्ये जलपर्णी होऊ नये, यासाठी काय करायला हवे, असे तुम्हांला वाटते?
उत्तर: नदीत सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यातील नायट्रोजन व फॉस्फरस या द्रव्यांवर प्रक्रिया केली पाहिजे. नायट्रोजन व फॉस्फरस ही द्रव्ये असलेले पाणी नदीत सोडू नये.
आम्ही जाहिरात वाचतो.
वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(१) ही जाहिरात कशासंदर्भात आहे?
उत्तर: ही जाहिरात पुस्तक प्रदर्शनासंदर्भात आहे.
(२) कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे?
उत्तर: १५ ते २० ऑक्टोबर २०२२
(३) पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये सांगा
उत्तर: पुस्तक प्रदर्शनाची वैशिष्ट्ये
(i) छोट्यांसाठी व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालन
(ii) नामवंत साहित्यिकांची पुस्तके
(iii) विविध विषयांवरील पुस्तके
(iv) मुलांसाठी आवडत्या गोष्टींची, प्रयोगांची कोड्यांची आणि कृतींची पुस्तके
(v) सायंकाळी ७ ते ८ या वेळेत नामवंत साहित्यिक आपल्या भेटीला व प्रत्यक्ष वार्तालाप करण्याची संधी.
(४) प्रदर्शन कोठे भरणार आहे?
उत्तर: शारदा विद्यालयाचे सभागृह येथे प्रदर्शन भरणार आहे.
(५) शंभर रुपयांच्या खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे?
उत्तर: शंभर रुपयांच्या खरेदीवर वीस रुपयांची सवलत मिळणार आहे.
(६) पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी करा से लिहा.
उत्तर: आम्ही पुस्तक प्रदर्शनात गोष्टींची, प्रयोगांची कोड्यांची, कृतींची पुस्तके खरेदी करू.
ओळखा पाहू!
(१) हात आहेत पण हलवत नाही.
उत्तर: खुर्ची
(२) पाय आहेत पण चालत नाही.
उत्तर: टेबल
(३) दात आहेत; पण चावत नाही.
उत्तर: कंगवा
(४) नाक आहे; पण श्वास घेत नाही.
उत्तर: सुई
(५) केस आहेत पण कधी विंचरत नाही.
उत्तर: ब्रश