पाठ १४ – संतवाणी
सुविचार
- संकटांना घाबरून न जाता जो जीवन यशस्वी करतो तोच खरा पराक्रमी होय.
- मैत्री ही नात्यापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे.
- नम्रता हा सर्व सद्गुणांचा पाया होय.
आम्ही कथा लिहितो
विद्यार्थ्यांनो, तुम्हांला गोष्ट ऐकायला, वाचायला, सांगायला आवडते ना? तुम्हांला गोष्ट लिहायलाही नक्कीच आवडेल. आज तुम्ही गोष्ट लिहिणार आहात. त्याचे नीट आकलन करून घ्या. कोणता प्रसंग आहे, कोण बोलत आहे, कोणाशी बोलत आहे, त्यांच्यात काेणता संवाद चालला असेल? या सगळ्यांची कल्पना करा. त्या त्या प्रसंगामधील पात्रांचा संवाद तुमच्या वहीत लिहा. अगदी तुम्हांला पाहिजे तसा. तुम्हांला कोणते शब्द वापरावे लागतील? वाक्य रचना कशी करावी लागेल? कोणता काळ वापरावा लागेल? या सर्वांचा मनाशी विचार करा. गोष्ट लिहून झाल्यावर, त्या संदर्भात शिक्षकांशी, मित्रांशी किंवा आईबाबांशी चर्चा करा. कथा लिहून झाल्यावर त्यास योग्य शीर्षक द्या.
उत्तर: एकदा जंगलात भटकता भटकता एक हरिण जंगलातून बाहेर आले. जंगलाच्या बाहेरून जाणारी एक प्रवासी रेल्वे त्याला दिसली. हे सापासारखे लांब काय बरं पळत आहे असा विचार करता करता हरिणही त्या प्रवासी रेल्वेबरोबर धावू लागले.
पुढे एका स्टेशनवर प्रवासी रेल्वे थांबलो. हरिण मात्र पुढे धावतच राहिले. मागे वळून पाहते तर काय रेल्वे थांबलेली. हरणाला वाटले, ती प्रवासी रेल्वे दमली म्हणून थांबली व आपणच जिंकलो. ते हरिण विजयी झाल्याच्या थाटात जंगलात परतले. इतर सर्व प्राण्यांबरोबर ते फुशारक्या मारू लागले. घडलेला सर्व प्रसंग त्याने इतरांना सांगितला. ‘आपण रेल्वेला हरवले. केवढे मोठे काम केले. आपणच सर्वात चपळ अशा आविर्भावात ते फिरू लागले.
कोल्हा हुशार होता. त्याला शंका आली. तो हरणाला म्हणाला, “तू जिंकल्याचे कुणीही पाहिले नाही. चल पुन्हा धावून दाखव.” ते दोघेजण पुन्हा जंगलाबाहेर आले. हरिण मोठ्या दिमाखातच येणाऱ्या एका रेल्वेबरोबर धावू लागले. कोल्हासुद्धा त्या दोघांच्या मागे धावायला लागला.
हरणाच्या दुर्दैवाने तो रेल्वेगाडी मालगाडी होती. त्यामुळे ती कुठेही न थांबता पुढे पुढे वेगाने निघून गेली. बिचारे हरिण मात्र तिच्यामागे धावून धावून दमले आणि मटकन खाली बसले. त्याच्यात पुढे धावण्याचे त्राणच उरले नव्हते. त्याने कोल्हयाकडे आपण शर्यत हरल्याचे कबूल केले व म्हणाले, “खरोखरच तंत्रज्ञानाचा वापर करून मानवाने आपल्यापेक्षा वेगवान वस्तू बनवली आहे”.
शीर्षक : गर्वाचे घर खाली