पाठ १३ – अदलाबदल
व्रात्य – खोडकर
पारा चढणे – खूप राग येणे
चीत करणे – हरवणे
Amrut and Esab are very close friends. On the day of Holl, Esab’s new shirt pocket gets ripped in a fight with some mischievous children, so Amrut offers him his new shirt. This gesture of sharing shows the close bond between the two friends.
स्वाध्याय
प्र. १. खालील आकृती पूर्ण करा.
उत्तर:
प्र. २. खाली दिलेल्या वाक्यांचा योग्य घटनाक्रम लिहा.
(अ) एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली.
(आ) अमृत व इसाबने शींची अदलाबदल केली.
(इ) गावातली काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती.
(ई) अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले.
(उ) हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तिथे जमल्या.
उत्तर:
(१) गावातील काही मुले निंबाच्या झाडाखाली जमली होती.
(२) एका व्रात्य मुलाला एक खोडकर कल्पना सुचली.
(३) अमृत व इसाबने शटांची अदलाबदल केली.
(४) हसनभाई काय सांगत आहेत ते ऐकायला शेजारपाजारच्या बायकाही तेथे जमल्या.
(५) अमृत व इसाबच्या परस्परांवरील प्रेमाची गोष्ट ऐकून सर्वजण हेलावून गेले.
प्र. ३. पुढील वाक्यांत कंसातील योग्य वाक्प्रचार लिहा.
(अ) घरी आलेल्या पाहुण्यांना बाबांनी राहण्यासाठी _____. (गळ घातली, भुरळ घातली.)
उत्तर: गळ घातली
(आ) बाळू नवीन छत्री कोठेतरी विसरून आला. हे पाहून आईचा _____. (पारा चढला, कौतुक वाटले.)
उत्तर: पारा चढला
(इ) रस्त्यावर भांडणाऱ्या कुत्र्यांच्या आवाजाने नीताच्या _____. (पोटात कावळे ओरडले, पोटात गोळा आला.)
उत्तर: पोटात गोळा आला.
(ई) त्याची करुण कहाणी ऐकून सर्वांची मने _____ (हेलावून गेली, हबकून गेली.)
उत्तर: हेलावून गेली
खेळूया शब्दांशी
(अ) खाली दिलेल्या ‘अ’ व ‘ब’ गटातील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा.
उत्तर:
(१) नवा – शर्ट
(२) सुई – दोरा
(३) होळी – सण
(४) कुस्ती – खेळ
(आ) खालील शब्दांतील अचूक शब्द लिहा.
(अ) व्रात्य, वात्र्य, वार्त्य, वार्त्य
उत्तर: व्रात्य
(आ) कप्लना, कल्पना, कलपना, कल्प्ना
उत्तर: कल्पना
(इ) गोष्ट, गोश्ट, गोशट, गोष्ट
उत्तर: गोष्ट
(इ) खालील आकृतीत ‘वान’ हा प्रत्यय लावून तयार झालेले शब्द दिले आहेत. हे शब्द अभ्यासा. ‘करी’ हा प्रत्यय लावून तयार होणारे शब्द पुढील रिकाम्या आकृतीसमोर लिहा.
उत्तर:
लिहिते होऊया.
‘माझा आवडता मित्र/मैत्रीण’ या विषयावर थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर: अमान हा माझा सर्वात आवडता मित्र आहे. तो माझ्याच वर्गात शिकतो. आम्ही एकाच सोसायटीत राहतो. त्यामुळे जवळजवळ दिवसभर आम्ही एकत्रच असतो. एकत्र विविध खेळ खेळतो. अमान अभ्यासातही हुशार आहे. गणित हा त्याचा आवडता विषय त्यात तो पैकीच्या पैकी गुण मिळवतो. कोडी सोडवण्याचीही त्याला आवड आहे. तो नेहमी सर्वांना मदत करतो. अभ्यासात कुणाला काही शंका असेल तर तो तो पटकन दूर करतो. शिक्षकांचाही तो आवडता विद्यार्थी आहे. त्याने कुठे काही वाचले, नवीन गोष्ट पाहिली की त्याविषयी तो मला माहिती सांगतो आणि मीही त्याला सांगतो. प्रत्येक गोष्ट करताना आम्ही एकमेकांना सांगून करतो. अशी आमची अतूट मैत्री आहे.
सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत तुम्ही कोणकोणते खेळ खेळता?
उत्तर: सुट्टीच्या दिवशी मी मित्रांबरोबर क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, लगोरी इत्यादी मैदानी खेळ खेळतो. तर दुपारच्या वेळी घरात बसून कॅरम, बुद्धिबळ इत्यादी बैठे खेळ खेळतो.
तुमचा आवडता मित्र/मैत्रीण यांमधील तुम्हांला कोणते गुण सर्वांत जास्त आवडतात?
उत्तर: माझ्या मित्राचे दुसऱ्याला मदत करणे, कोणती गोष्ट चांगली व कोणती गोष्ट वाईट हे सांगून वेळीच आपल्या मित्राला सावध करणे हे दोन गुण सर्वात जास्त आवडतात.
विचार करा. सांगा.
खालील प्रसंगी तुम्ही काय कराल?
(१) तुमच्या मित्राने / मैत्रिणीने आज डबा आणला नाही.
उत्तर: माझ्या मित्राने / मैत्रिणीने आज डबा आणला नाही तर मी त्याला माझ्या डब्यातील पोळी भाजी देईन.
(२) शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला.
उत्तर: शाळेत पिण्याच्या पाण्याचा नळ कोणीतरी विनाकारण सुरू ठेवला तर आम्ही तो बंद करू आणि वाहणारे पाणी वाचवू.
(३) वर्गातील एका विदयार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व ते तुम्ही पाहिले.
उत्तर: वर्गातील एका विद्यार्थ्याने वर्गात कचरा केला आहे व तो आम्ही पाहिला तर त्या विदयार्थ्याला कचरा न करण्याविषयी समजावू आणि त्याला कचरा एकत्र करून कचरापेटीत टाकायला सांगू, त्याने आमचे म्हणणे ऐकले नाही तर आम्ही स्वतः कचरा कचरापेटीत टाकू आणि वर्ग स्वच्छ ठेवू.
(४) सहलीत तुमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहीत आहे.
उत्तर: सहलीत आमचा मित्र किल्ल्याच्या भिंतीवर नावे लिहित आहे तर आम्ही त्याला किल्ल्यांचे महत्त्व सांगून भिंतीवर नावे लिहिण्याची कृती करू नकोस असे समजावून सांगू.
खेळ खेळूया.
खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा समानार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.
(१) मस्तक
(२) कचरा
(३) रात्र
(४) पाणी
(५) जनता
(६) मुलगी
उत्तर:
खाली काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांचा विरुद्धार्थी शब्द भरून कोडे पूर्ण करा.
(१) उद्योगी ×
(२) गरम ×
(३) मोठा ×
(४) जुने ×
(५) होकार ×
(६) हसणे ×
उत्तर:
आपण समजून घेऊया.
खालील शब्द वाचा.
किडा, मेहुणा, पादुका, बाहुली, महिना, पहिली, सगुणा, तालुका, भिडु, पिसू, मनुका. वरील शब्दांतील शेवटच्या दोन अक्षरांचे निरीक्षण करा. काय जाणवते ?
या शब्दांतील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, वेलांटी, उकार असे कोणते ना कोणते तरी एक चिन्ह आहे आणि शेवटून दुसऱ्या अक्षरांतील इकार किंवा उकार ऱ्हस्व आहेत.
लक्षात ठेवा : मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ स्वरान्त असेल, तर त्या आधीच्या अक्षरातील (उपान्त्य अक्षरातील) इकार व उकार -हस्व लिहितात. तत्सम शब्दांतील उपान्त्य अक्षरे दीर्घ असतील, तर ती संस्कृतमधील मूळ शब्दांप्रमाणेच दीर्घ लिहावी.
उदा., क्रीडा, परीक्षा, लीला, संगीता, पूर्व, भीती.