Maharashtra Board Textbook Solutions for Standard Seven

पाठ १२ – रोजनिशी

आस – इच्छा, अपेक्षा

ऊर – हृदय

पर्वा न करणे – काळजी न करणे

This lesson is a write-up of 3 days written by Vaishnavi in her diary. She pens down the details of how the Children’s Day was celebrated on 14th November in her school. She also writes about the fun she had in the village and on the farm on 15th November as well as her birthday celebration on 16th November.

स्‍वाध्याय

प्र. १. खालील प्रश्नांची तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.

(अ) वैष्णवीच्या शाळेत ‘बालदिन’ कसा साजरा झाला?

उत्तर: वैष्णवीच्या शाळेत बालदिनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. विदयार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमप्रसंगी आलेल्या पाहुण्यांनी बालदिनानिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना खाऊ देण्यात आला.

 

(आ) शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी कोणकोणती पिके व फळझाडे पाहिली?

उत्तर: शिवारामध्ये गेल्यावर मुलांनी ज्वारी, तुरी, भुईमूग आणि कपाशी ही पिके तर पेरू, सीताफळ, आवळा, चिंच, बोर ही फळझाडे पाहिली.

 

(इ) वैष्णवीचा वाढदिवस कशाप्रकारे साजरा झाला?

उत्तर: वैष्णवीच्या रोजनिशीतील १६ नोव्हेंबर या दिवसाचे पान मला सर्वात जास्त आवडले. या दिवशी मित्रमैत्रिणींबरोबर वर्थडे पार्टी करण्यापेक्षा वैष्णवीने तिचा वाढदिवस आदिवासी दुर्गम भागातील वसतिगृहातील मुलांबरोबर साजरा केला.

प्र. २. का ते लिहा.

(अ) वैष्णवीच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हांला सर्वांत जास्त आवडले?

उत्तर: वैष्णवीच्या रोजनिशीतील १६ नोव्हेंबरला लिहिलेले पान मला विशेष आवडले, कारण वैष्णवीने वाढदिवसाला इतर मुलांप्रमाणे केक आणि इतर गोष्टींचा हट्ट धरला नाही, तर तो दिवस तिने आई-बाबांसोबत आदिवासी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील मुलांसोबत घालवणे पसंत केले. तिने त्या मुलांना खाऊचे वाटप केले. शिक्षणासाठी आई-वडिलांपासून दूर राहणाऱ्या त्या मुलांकडून वैष्णवीने शिकण्याची नवी उमेद घेतली.

 

(आ) वैष्णवीला गहिवरून आले.

उत्तर: वसतिगृहातील आदिवासी दुर्गम भागातील मुलंमुली शिक्षणासाठी आईवडिलांपासून दूर राहतात हे पाहून वैष्णवीला गहिवरून आले.

विचार करा. सांगा.

रोजनिशी का लिहावी? रोजनिशी लिहिल्याने काय फायदा होईल, असे तुम्हांला वाटते?

उत्तर: रोजनिशी म्हणजे रोजच्या घडामोडींची नोंद ठेवणे. रोजनिशी लिहावी कारण आपल्याला आपल्या कामांचा त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे योग्य क्रम ठरवता येतो. लहान मोठ्या गोष्टींची नोंद ठेवल्याने कोणत्याही गोष्टीची गरज लागली तर त्याचा फायदा होतो. रोजनिशी लिहिल्याने स्वतःशी संवाद साधता येतो. दिवसभरात आपण ज्या गोष्टी करतो त्यातून अनेक गोष्टी शिकता येतात. स्वतःला समजून घेता येते. दिवसभरात आपल्याला भेटलेल्या व्यक्तींनाही समजून घेण्यास मदत होते. आपली आकलनशक्ती व स्मरणशक्ती वाढते. लिखाणामध्ये सुधारणा होऊन भाषेवर प्रभुत्व प्राप्त होते. आपण केलेल्या चुका सुधारण्याची संधी मिळते. रोजनिशी आपला चांगला मित्र/मैत्रीण होऊन आपण एकटे आहोत असे वाटत नाही. मनावरील ताण चिंता कमी होतात. आपल्यातील सकारात्मकता वाढून अडचणींवर मात करण्याचे बळ मिळते. एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कृती करण्याचा आपण विचार करू लागतो त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. असे रोजनिशी लिहिण्याचे अनेक फायदे आहेत. रोजनिशी लिहिणे ही एक चांगली सवय आहे.

खेळ खेळूया.

खालील कंसात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा.

(अति तेथे माती, आगीतून उठून फुफाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली)

 

(अ) फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो.

उत्तर: गर्वाचे घर खाली.

 

(आ) एखादयाकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं, की त्याला सोडून दयायचं.

उत्तर: कामापुरता मामा.

 

(इ) सगळीकडे परिस्थिती समान असणे.

उत्तर: पळसाला पाने तीनच

 

(ई) थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे.

उत्तर: थेंबे थेंबे तळे साचे

 

(उ) एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे.

उत्तर: आगीतून उठून फुफाट्यात पडणे

 

(ऊ) कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो.

उत्तर: अति तेथे माती

 

(ए) न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते.

उत्तर: नावडतीचे मीठ अळणी

नेहमी लक्षात ठेवा.

(१) संगणकाच्या स्क्रीनसमोर दीर्घकाळ बसू नये, त्यामुळे डोळ्यांवर ताण येतो.

(२) प्रत्येक वीस मिनिटांनंतर जागेवरून उठून दहा-बारा पावले फिरून यावे, त्यामुळे आपले स्नायू सुस्थितीत राहतात.

(३) संगणकावर काम करणारी व्यक्ती व संगणकाची स्क्रीन यांमध्ये योग्य अंतर असावे.

(४) स्वतःचा पासवर्ड नेहमी गोपनीय ठेवावा.

(५) सर्व इलेक्ट्रिक वायर सुस्थितीत असल्याची खात्री करावी, तसेच संगणक चालू असताना आतील भागास हात लावू नये.

आपण समजून घेऊया.

खालील शब्द वाचा.

पाऊल, गरीब, बूल, माणूस, जमीन, पाटील, कठीण, फूल, सामाईक, संगीत, शरीर वरील शब्दांतील शेवटच्या दोन अक्षरांचे निरीक्षण करा. काय जाणवते? या शब्दांतील शेवटच्या अक्षराला काना, मात्रा, बेलांटी, उकार वा चिन्हांपैकी कोणतेच चिन्ह नाही; म्हणजेच या शब्दांतील शेवटचे अक्षर अकारान्त आहे आणि शेवटून दुसऱ्या अक्षराला दिलेली वेलांटी किंवा उकार दीर्घ आहे. 

 

लक्षात ठेवा : मराठी शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार दीर्घ लिहितात; परंतु तत्सम (संस्कृतमधून मराठीमध्ये जसेच्या तसे आलेले शब्द) शब्दांतील अकारान्तापूर्वीचे इकार व उकार संस्कृतमधील मूळ शब्दाप्रमाणे हस्य लिहितात.

उदा., चतुर, मंदिर, गुण, कुसुम, प्रिय, अनिल, स्थानिक.