Maharashtra Board Textbook Solutions for Standard Nine

पाठ ९ - उजाड उघडे माळरानही

The hills are ablaze with colour in all directions as they embrace the spring season. This abundance is provided to us by the dry, lifeless, and dreary land of nature.

 

Nimboni is timidly dancing while dressed in deep green attire. Red Nagfani blossoms, which resemble deep-red earrings, adorn the Nagafani (plant). While Ghaneri draped a two-colored scarf, a banyan tree was swaying its blossom and fragile foliage (two-coloured flowers).

 

The bristly leaves of the fig tree resemble glistening, vivid peacock feathers. The dark brown horned deer stands to greet via the small passage in the field, decorated with red blossoms. The crimson blooms of Palasa have sprouted (like a baby) on the lap of mother earth (the soil), making all the other flowers in the surrounding area envious.

 

Through the mango bloom, cuckoos are sweetly humming the seasonal anthem of spring. The song of spring is now vibrating across the dry, barren, and harsh land. 

(१) कवी / कवयित्री – 

कवयित्री ललिता गादगे. 

 

(२) संदर्भ –

वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत झालेले बदल टिपले आहेत.

 

(३) प्रस्तावना –  

प्रस्तुत कवयित्रींनी कविता, कथा व ललितगद्य हे वाङ्मयप्रकार हाताळले आहेत. 

 

४) वाङ्मयप्रकार – 

‘पादाकुलक’ या जातिवृत्तात लिहिलेली ही एक निसर्गकविता आहे.

 

(५) कवितेचा विषय – 

वसंतऋतूचे स्वागत सृष्टीतील घटक करीत आहेत.

 

(६) कवितेतील आवडलेली ओळ – 

दुरंगी चुनरीत उभी हो ‘घाणेरी ही नटुन थटुनी. 

 

(७) मध्यवर्ती कल्पना –

वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टी मोहरते. सृष्टीत बदल होतो. निसर्ग सौंदर्याने नटतो व वसंतऋतूचे गीत गाऊ लागतो. याचे मनोवेधक चित्रण कवितेत केले आहे.

 

(८) कवितेतून मिळणारा संदेश –

निसर्गातील सौंदर्य टिकवणे व पर्यावरण शुद्ध ठेवणे हे मानवाचे कर्तव्य आहे.

 

(९) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –

वसंतऋतूचे मनोहारी चित्रण सुंदर शब्दकळेत साकारले आहे. निसर्गातील प्रत्येक घटक नटून थटून वसंताचे स्वागत कसे करतो, याच्या सुरेख कल्पना केल्या आहेत. प्रस्तुत कविता एक सुंदर निसर्गकविता असल्यामुळे ही कविता मला आवडली. 

 

(१०) भाषिक वैशिष्ट्ये – 

‘पादाकुलक’ या मात्रावृत्तात ही कविता मांडली असल्यामुळे कवितेला एक ओघवता नाद आहे. शब्दकळेची लय साधल्यामुळे त्यात गेयता आली आहे. मनोवेधक कल्पनांना सजवून कवितेतील वातावरण विषयाला साजेसे वर्णिले आहे. प्रत्येकी दोन ओळींचे यथार्थ यमक साधल्यामुळे कविता मनात उसते. शिवाय निसर्गघटकांचे मानवीकरण केल्यामुळे ही कविता भावनाप्रधान झाली आहे; म्हणून ती मनाला भिडते.

स्वाध्याय

प्र. १. (अ) कारणे लिहा.

(अ) कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण …………

उत्तर: वसंत ऋतुचे आगमन झाले आहे.

 

(आ) जगातील सर्व फुले मनात झुरू लागली, कारण ………..

उत्तर: मातीच्या मांडीवर पळसफुले बहरून आली.

 

(आ) खालील आकृतिबंध पूर्ण करा.

Screenshot 20221221 150328 01 पाठ ९ – उजाड उघडे माळरानही

उत्तर:

20221221 145249 0000 01 पाठ ९ – उजाड उघडे माळरानही

(इ) निसर्गाचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.

Screenshot 20221221 150335 01 पाठ ९ – उजाड उघडे माळरानही

उत्तर:

20221221 150305 0000 01 पाठ ९ – उजाड उघडे माळरानही

प्र. २. सृष्टीतील खालील घटक वसंतऋतूच्या आगमनाने कसे सजले, ते स्पष्ट करा.

घटक त्यांचे सजणे
(१)
लिंबोणी
(२)
नागफणी
(३)
घाणेरी
(४)
पळसफुले

उत्तर:

घटक त्यांचे सजणे
(१)
लिंबोणी
गर्द पोपटी वस्त्रे ल्याली.
(२)
नागफणी
जर्द तांबडी कर्णफुले घातली.
(३)
घाणेरी
दुरंगी चुनरीत उभी राहिली.
(४)
पळसफुले
मातीच्या मांडीवर बहरून आली.

प्र. ३. खालील शब्दांसाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

(१) भेटवस्तू –

उत्तर: नजराणा

 

(२) सजली –

उत्तर: नाटुनी थटुनी

 

(३) अरुंद रस्ता –

उत्तर: पाणंद 

 

(४) फुले –

उत्तर: अंक

 

प्र. ४. भावार्थाधारित.

(१) ‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.

उत्तर: वसंतऋतूचे आगमन झाले आहे. त्याचे स्वागत करण्यासाठी दिशादिशांना रंग उधळले आहेत. बेरड कोरडी सृष्टी वसंतामुळे मोहरली आहे. सृष्टीतला प्रत्येक घटक बहरून आला आहे. वसंतऋतूचे स्वागत करण्यासाठी पाणंदही उत्सुक आहे. वसंतऋतू म्हणजे फुलांचा उत्सव ! एरव्ही निमूट असलेल्या पाणंदीवर लाल कळ्यांचा सडा विखुरला आहे. ती लाल कळ्यांनी लगडून गेली आहे. या ओळीत कवयित्रींनी अशी कल्पना केली आहे की लाल कळ्यांचे जणू हरिण (सांबर) वसंत ऋतूच्या स्वागताला पाणंदीवर उभे आहे.

 

(२) ‘उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंतगान’ या ओळीतील तुम्हांला कळलेले अर्थसौंदर्य स्पष्ट करा.

उत्तर: शिशिरऋतूमध्ये झाडांची पानगळ होते. त्यामुळे माळरानावरची झाडे निष्पर्ण होतात. माळरान भकास दिसते. परंतु वसंतऋतूची चाहूल लागताच सर्व सृष्टी मोहरू लागते. झाडांना पालवी फुटते. झाडे जणू पोपटी वस्त्रे नव्याने लेवू लागतात. सृष्टीतील प्रत्येक घटक उत्साही व टवटवीत होतो. झाडे मोहरतात, बहरतात. वसंत-ऋतूच्या स्वागतासाठी दिशांतून रंग उधळले जातात. जणू सर्व सृष्टी वसंतऋतूचे गीत गात असते. एरवी उजाड बोडके असलेले माळरानही वसंतऋतूचे गाणे गात आहे, असा या ओळीचा अर्थ आहे.

 

प्र. ५. अभिव्यक्ती.

(अ) वसंतऋतूच्या आगमनाने सृष्टीत होणारे बदल तुमच्या निरीक्षणाने लिहा.

उत्तर: वसंतऋतूच्या आधी सृष्टी भकास शिशिरऋतूमध्ये झाडे निष्पर्ण होतात. ओकीबोकी भासतात. कोकिळेच्या मधुर कुजनातून कळते की वसंतऋतूचे आगमन होत आहे. वसंतऋतू आला की झाडांना पालवी फुटते. झाडे मोहरतात, फुलांनी बहरतात. वेगवेगळी फुलझाडे विविध रंगांच्या फुलांनी सजतात. फुलांचा सुंदर दरवळ आसमंतात पसरतो. काही झाडांच्या पायथ्यांशी फुलांची पखरण होते. डोंगर, पठार व नदीकाठ गवतफुलांनी बहरतात. जंगलात वेगवेगळी फुले फुलतात. आंब्याच्या झाडांना मोहर येतो. अशा प्रकारे सर्व सृष्टी नववधूसारखी नखशिखान्त सजते. म्हणून वसंतऋतू म्हणजे फुलांचा उत्सव! वसंतऋतू म्हणजे सौंदर्याचा राजा !!

 

(आ) सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.

उत्तर: सृष्टी हा मानवाला मिळालेला अनमोल नजराणा आहे. धरतीला माता म्हटले आहे. धरणीमाता मानवाचे पालन व पोषण करते. म्हणून पर्यावरणाचे रक्षण करणे व सृष्टीचे सौंदर्य कायम राखणे, हे आपले आद्य कर्तव्य आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तीन मुख्य ऋतूंमध्ये सृष्टी वेगवेगळी रूपे धारण करते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी जंगलतोड न करणे व पाण्याचे प्रवाह साठवणे, हे उपाय आपण करायला हवेत. निसर्गाला ओरबाडणे हे कधीही हानिकारक आहे. झाडे लावली पाहिजेत, त्यांना जगवले पाहिजे. आपल्या वाईट सवयी सोडून दयायला हव्यात. आपला परिसर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवायला हवा. निसर्गमित्र असलेल्या संस्थांना शक्यतो आपण मदत करायला हवी. अशा प्रकारे सृष्टीचे सौंदर्य कायम राखले, तरच मानवजात टिकून राहील.