पाठ ७ – दिव्याच्या शोधामागचे दिव्य
स्वाध्याय
प्र. १. (अ) आकृतिबंध पूर्ण करा.
(१)
उत्तर:
(२)
उत्तर:
(आ) रिकाम्या जागा भरा.
(१) ______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
उत्तर: २१ ऑक्टोबर, १८७९
(२) ______ दिव्याच्या शोधाची बातमी जगभर पसरली.
उत्तर: वर्तमानपत्राच्या माध्यमातून
प्र. २. (अ) योग्य पर्या शोधून वाक्य पूर्ण करा.
(१) प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.
(स्वस्त, फायदेशीर, महागडा, व्यवहार्य)
उत्तर: महागडा
(२) फसलेल्या प्रयोगातूनही नंतर प्रयोग करणाऱ्यांचे ______ वाचतात.
(पैसे, श्रम, कागद, प्रयत्न)
उत्तर: श्रम
(आ) आकृती पूर्ण करा.
उत्तर:
प्र. ३. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दाचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
(१) घराभोवती दिव्यांचा झगमगाट पाहायला सारे गाव लोटले.
उत्तर: घराभोवती दिव्याचा झगमगाट पहायला सारे गाव लोटले.
(२) कार्बनचा तुकडा जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चीक होते.
उत्तर: कार्बनचा तुकडे जोडून प्रकाश तयार करण्याचे काम खर्चिक होते.
(३) अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारी तिकिटेही प्रसिद्ध केली.
उत्तर: अमेरिकेच्या पोस्टखात्याने दिव्याचे चित्र असणारे तिकीटही प्रसिद्ध केले.
(४) फसलेल्या प्रयोगांची पद्धतशीर नोंद एडिसनने वहीमध्ये ठेवली.
उत्तर: फसलेल्या प्रयोगाची पद्धतशीर नोंद एडिसनने वयांमध्ये ठेवली.
प्र. ४. स्वमत.
(१) संशोधक होण्यासाठी तुम्ही स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात कसे बदल कराल ते ८-१० वाक्यांत लिहा.
उत्तर: मला विज्ञानाची आधीपासूनच खूप गोडी आहे. त्यातून मला संशोधक होण्याची खूप इच्छा आहे. त्यासाठी मला स्वतःमध्ये खूप बदल करावे लागतील. प्रत्येक गोष्टीचे बारीक निरीक्षण करून ती समजून घेण्याचा मी प्रयत्न करेन. कुणाच्याही बोलण्यावर सहज विश्वास न ठेवता विज्ञानाच्या कसोटीवर ती गोष्ट मी तपासून पाहीन. समाजाच्या आणि सर्वसामान्य लोकांच्या उपयोगी पडेल, त्यांना फायदा होईल असा शोध लावण्याचा प्रयत्न करेन. अपेक्षित यश मिळेपर्यंत सतत त्याचा पाठपुरावा करेन. एखाद्या प्रयोगात अपयश जरी आले तरी हार न मानता जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत मी पुन्हा पुन्हा नव्या जोमाने प्रयत्न करत राहीन.
I am already very fond of science. It makes me want to become a researcher. I have to make a lot of changes in myself for that. I will try to understand everything by observing it closely. I will put it to the test of science without taking anyone’s word for granted. I will try to make inventions that will be useful to society and common people. I will continue to pursue it till I get the desired success. Even if I fail in an experiment, without giving up, I will keep trying again and again until I succeed.
(२) विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही या मताशी आपण सहमत आहात का? असल्यास अथवा नसल्यास तुमचे मत सकारण स्पष्ट करा.
उत्तर: विज्ञानात नवे शोध लावण्यासाठी फक्त बुद्धिमत्ता असून चालत नाही. त्यासाठी आपल्याकडे जिद्द, चिकाटी सुद्धा असावी लागते. नवा शोध लावण्यासाठी, ज्याचा संपूर्ण जगाला फायदा होईल त्यासाठी येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची मानसिकता असावी लागते. असंख्य प्रकारचे प्रयोग करून पाहण्याची व हजारो वेळा अपयश आले तरी पुन्हा तितक्याच उत्साहाने नवे प्रयोग करून पाहण्याची जिद्द असावी लागते. जोपर्यंत मनासारखे यश मिळत नाही तोपर्यंत हार न मानण्याची मानसिकता हवी. छोट्या-छोट्या गोष्टींचे बारीक निरीक्षण, त्याचे अनुमान, पुन्हा पुन्हा प्रयोग करणे हे चक्र सतत चालू ठेवावे लागते. त्यासाठी प्रचंड धीर आणि सहनशक्ती असणे गरजेचे आहे. शिवाय लोकांनी कितीही हिणवले, चिडवले तरी आपल्या ध्येयापासून विचलीत होऊ नये हे महत्त्वाचे आहे.
Science has only intelligence to make new discoveries and not work. For that, you have to have determination and perseverance. In order to make a new invention, which will benefit the whole world, one has to have the mindset to face the challenges ahead. One has to have the courage to try countless types of experiments and even if they fail thousands of times, to try new experiments again with equal enthusiasm. You need to have a mindset of not giving up until you get success. The cycle of close observation of small things, guesswork, experimenting again and again has to continue. It requires a lot of patience and endurance. Moreover, it is important not to be distracted from your goal no matter how much people tease and annoy you.
(३) तुमच्या मनात येणारा नवीन विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही कोणकोणते प्रयत्न कराल?
उत्तर: माझ्या मनात जर एखादा नवीन विचार आला तर तो दुसऱ्या कोणाला सांगण्याआधी मी त्याचा सारासार विचार करेन. त्याचा सर्वसामान्य लोकांना होणारा फायदा, समाजाला होणारा फायदा मी विचारात घेईन. मला ते सारे पटले, योग्य वाटले तर मनात आलेल्या तो विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मी त्याचा सतत पाठपुरावा करेन. इतरांनी त्या विचारावरून माझी थट्टा, मस्करी केली, मला वेडा ठरवले तरी मी त्याकडे दुर्लक्ष करीन. माझ्या मनातला विचार प्रत्यक्षात आणण्यासाठी मार्गात येणाऱ्या अडचणींचा, संकटांचा मी सामना करेन. जोपर्यंत आपल्या मनासारखे अपेक्षित यश मिळत नाही तोपर्यंत मी विविध प्रयोग करीत राहीन. कितीही वेळा अपयश आले तरी मी मागे हटणार नाही. पुन्हा पुन्हा नव्या उमेदीने मी प्रयोग करेन. मनापासून मदत करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना मी माझ्या कार्यामध्ये सहभागी करून घेईन आणि माझे ध्येय मी गाठीन.
If a new idea comes to my mind, I will think it through before I share it with anyone else. I will consider its benefit to common people, benefit to society. If I understand all that, if it feels right, I will continue to pursue it to make the thought come into reality. Even if others mock me, make fun of me, call me crazy for that thought, I will ignore it. I will face the difficulties and crises that come in the way to make the thought in my mind a reality. I will continue to experiment until I get the desired success. No matter how many times I fail, I will not back down. Again and again I will experiment with new hope. I will involve my colleagues who are willing to help me in my work and I will achieve my goals.
अपठित गद्य आकलन
आपण पाठ्यपुस्तकात गद्य व पद्य पाठांचा अभ्यास करतो. विविध साहित्यप्रकारांच्या अभ्यासाबरोबर भाषिक अंगाने प्रत्येक पाठाचा अभ्यास आपणांस करायचा असतो. विद्यार्थ्यांची भाषासमृद्धी, भाषिक विकास ही मराठी भाषा अध्ययन-अध्यापनाची प्रमुख उद्दिष्टे आहेत, म्हणूनच पाठ्यपुस्तकातील पाठांच्या सूक्ष्म अभ्यासाने आपल्याला कोणतेही साहित्य वाचल्यानंतर त्याचे आकलन होणे, आस्वाद घेता येणे व त्या भाषेचे सुयोग्य व्यावहारिक उपयोजन करता येणे ही उद्दिष्टे साध्य करता येतात. अशा पाठ्येतर भाषेच्या आकलनाचे, मूल्यमापन करण्याचे कौशल्य प्राप्त होण्याच्या दृष्टीने पाठ्यपुस्तकात अपठित गद्यउतारा हा घटक समाविष्ट केला आहे. गद्य उतारा वाचून त्याचे आकलन होणे व त्यावरील स्वाध्याय तुम्ही स्वयंअध्ययनाने करणे येथे अपेक्षित आहे.
खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखालील कृती करा.
प्र.१. खालील आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
१. चांगल्या साहित्य वाचा
२. योग्य क्षेत्रात यश
३. इतरांच्या मदतीसाठी तत्पर
४. स्वप्रयत्नाची आवश्यकता नाही
५. वेगळी ओळख निर्माण
विद्यार्थिजीवनात चांगल्या सवयींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. चांगले साहित्य वाचणारा, योग्य त्याच बाबी लक्षात ठेवणारा, योग्य ठिकाणी खर्च करणारा, आवश्यक असेल तेवढेच बोलणारा, नेहमीच इतरांच्या मदतीसाठी तत्पर असणारा विद्यार्थी भावी आयुष्यात समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करतो. त्याने निवडलेल्या क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी त्याला विशेष मेहनतीची आवश्यकता पडत नाही.
तुम्ही जोपर्यंत मार्गदर्शन मिळवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेणार नाहीत, तोपर्यंत तुम्हांला कोणाचेही
मार्गदर्शन मिळणार नाही. आपल्याला काय करायचे याची दिशादुसरा ठरवणार नाही. तुम्हांलाच दिशा ठरवायची आहे आणि तुम्हांलाच त्या दिशेने चालायचेही आहे. हे स्वप्रयत्नानेच शक्य आहे. चांगल्या सवयी केवळ स्वप्रयत्नाला चालना देत नाहीत, त्या केवळ ध्येय गाठून थांबत नाहीत, तर त्या संपूर्ण मानवी गुण वृद्धिंगत करण्यास मदत करतात.
प्र.२. ‘चांगल्या सवयी आणि स्वप्रयत्न यामुळे व्यक्तिमत्त्व घडते’ हे उदाहरणासह स्पष्ट करा.
उत्तर: आपले पालक, शिक्षक आणि चांगले लोक आपल्याला चांगल्या सवयी शिकवतात. परंतु जर आपण आयुष्यभर या चांगल्या सवयींचा अवलंब केला तर आपले व्यक्तिमत्व सुधारली जाते. उदाहरणार्थ, आपले आईवडील आपल्याला खोटे बोलण्यास, चोरण्यास नकार देतात, या गोष्टींचा नेहमी त्याग करा असे सांगतात आणि जर आपण अशाच सवयी स्वीकारला, तर आपण मोठे झाल्यावरही या वाईट गोष्टींपासून दूर राहतो आणि आपल्याला या चांगल्या सवयीमुळे समाजात चांगला आदर मिळतो.
भाषाभ्यास
(१) अव्ययीभाव समास
अव्ययीभाव समास वैशिष्ट्ये –
(१) पहिले पद महत्त्वाचे असून ते बहुधा अव्यय असते.
(२) संपूर्ण सामासिक शब्द क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे काम करतो.
(आ, यथा, प्रति वगैरे उपसर्गांना संस्कृतात अव्यय म्हणतात.)
उदा.,
(१) गरजूंना यथाशक्ती मदत करावी.
(२) त्या गावात जागोजागी वाचनालये आहेत.
(३) क्रांतिकारकांनी आमरण कष्ट सोसले.
जागोजागी, घरोघरी यांसारख्या शब्दांत अव्यय दिसत नसले, तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो, म्हणून अशा शब्दांचा समावेश अव्ययीभाव समासात केला जातो.
खालील शब्दसमूहांपासून सामासिक शब्द बनवा.
(१) विधीप्रमाणे
उत्तर: विधिवत
(२) प्रत्येक गल्लीत
उत्तर: गल्लोगल्ली
(३) चुकीची शिस्त
उत्तर: बेशिस्त
(४) धोक्याशिवाय
उत्तर: बिनधोक
(५) प्रत्येक दारी
उत्तर: दारोदारी