पाठ ५ – व्यायामाचे महत्त्व
व्यायाम आरोग्यदायी मित्र । हे ध्यानी ठेवावे सूत्र ।
आळस वैरी मानिला सर्वत्र सर्वतोपरी ।।
अर्थ: ‘राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी आपल्यासारख्या सामान्य माणसांना आपल्या जीवनातील व्यायामाचे महत्त्व साध्या, सरळ भाषेत समजावून सांगितले आहे. ते म्हणतात की, व्यायाम हा आपल्याला सुखाचे आयुष्य देणारा आरोग्यदायी मित्र आहे. हे सूत्र आपण कायम लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण आळस हा आपल्या जीवनाचा खरा शत्रू आहे, हे सगळ्या जगाने मान्य केलेले आहे.. व्यायामामुळेच आळस दूर होऊन शरीर आरोग्यपूर्ण होते.
English Translation:
Rashtrasant Shri Tukdoji Maharaj has explained the importance of exercise in our life to ordinary people like us in simple, straightforward language. He says that exercise is a healthy friend that gives us a happy life. We must always remember this formula. Because laziness is the real enemy of our life, it is accepted by the whole world.
व्यायामाविण सात्त्विक भोजन । तेहि मारी विकारी होऊन ।
व्यायामे होय अग्निदीपन अन्नपचन सहजचि ।।
अर्थ: आरोग्य व्यवस्थित राहावे म्हणून आपण सात्त्विक आहार घेत असतो. या सात्त्विक भोजनाने आपले शरीर व मन छान स्वस्थ राहते. पण तुकडोजी महाराज म्हणतात की, अशा भोजनासोबतच व्यायामही केला पाहिजे. नाहीतर अशा भोजनामुळेही आपणास विविध विकार, विविध आजार होऊ शकतात. सात्त्विक भोजनासोबतच चांगला, योग्य व्यायाम केला तर पोटातील जठाराग्नी चांगला प्रदिप्त होतो. म्हणजे पोटातील अग्नी चांगला पेटून आपल्या अन्नाचे सहज पचनही होते. अन्नाचे अपचन होऊन होणारे विकार व्यायामामुळे टाळता येतात.
English Translation:
We take sattvic diet to maintain good health. This sattvic food keeps our body and mind healthy. But Tukdoji Maharaj says that exercise should be done along with such food. Otherwise you can get various disorders, various diseases due to such food. Good, proper exercise along with sattvic food will light up the gastritis in the stomach. It means that the fire in the stomach burns well and our food is easily digested. Indigestion can be prevented by exercise.
व्यायामे जडत्व जाई दूरी । व्यायामे अंगी राहे तरतरी ।
रक्तव्यवस्था उत्तम शरीरी वाढे विचारी सजीवपण ।।
अर्थ: आपण व्यायाम नियमीतपणे करायला हवा. योग्य व पुरेसा व्यायाम आपण केला नाही तर शरीरामध्ये जडत्व म्हणजेच स्थूलपणा वाढत जातो. नियमीत व्यायामामुळे स्थूलपणा कमी होऊन शरीर सुडौल होते. तसेच आळस दूर होऊन अंगामध्ये तरतरी म्हणजेच उत्साह भरतो. तुकडोजी महाराज पुढे म्हणतात की, व्यायामामुळे शरीरातील रक्तव्यवस्था व्यवस्थित होते. रक्तप्रवाह सुरळीत होऊन रक्ताशी संबंधित विकार दूर होतात आणि आपले आयुष्य वाढते.
English Translation:
We should exercise regularly. If we do not do proper and sufficient exercise, then the inertia or obesity increases in the body. Regular exercise reduces obesity and makes the body shapely. Also, the laziness is removed and the body is filled with enthusiasm. Tukdoji Maharaj further says that due to exercise, the blood system in the body is regular. By improving blood flow, blood related disorders are removed and our life span is increased.
व्यायामाने सशक्त स्नायु । व्यायामे मानव होय दीर्घायु ।
व्यायामहीना पित्त, कफ, वायु । जर्जर करिती अत्यंत ।।
अर्थ: नियमित व योग्य व्यायामामुळे आपल्या शरीरातील स्नायूंना बळकटी प्राप्त होते. सगळे स्नायू सशक्त होत जातात. माणसाला आजारपण येत नाही. याच व्यायामामुळे मानवाला दीर्घायुष्य प्राप्त होते, असे तुकडोजी महाराज म्हणतात. आपण जर व्यायाम करीत नसू तर आपल्या शरीरात पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण कमी-जास्त होऊ लागते. पित्त, कफ, वायू यांच्या असंतुलित प्रमाणामुळे रोग होतात आणि आपण आजारी पडतो. त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. व्यायामामुळे पित्त, कफ, वायू यांचे शरीरातील प्रमाण योग्य व संतुलित राहण्यास मदत होते.
English Translation:
Regular and proper exercise strengthens the muscles in our body. All muscles become stronger. Man does not get sick. Tukdoji Maharaj says that it is due to this exercise that a human gets a long life. If we do not exercise, the amount of pitta, kapha, gas in our body starts decreasing. Imbalance of pitta, kapha, vayu causes diseases and makes us sick. It causes us a lot of trouble. Exercising helps to maintain proper balance of Pitta, Kapha, Vayu in the body.
व्यायामे वाढे प्रतिकार शक्ति स्वावलंबनाची प्रवृत्ति ।
व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति । कार्य करण्याची ।।
अर्थ: तुकडोजी महाराज म्हणतात की, व्यायामामुळे आपल्या शरीराला बळकटी प्राप्त होऊन रोग प्रतिकारक शक्ती वाढते. येणाऱ्या आजारांचा, संकटांचा आपण सहज सामना करू शकतो. त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबीसुद्धा बनतो. आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही. या नियमीत व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होऊन शरीर ताजेतवाने बनते.. शिवाय कोणत्याही कामामध्ये उत्साह जाणवतो. म्हणजेच कोणतेही काम करण्याची शरीरातील जोश, स्फूर्ति वाढते.
English Translation:
Tukdoji Maharaj says that exercise strengthens your body and increases your immunity. We can easily face the coming diseases and crises. At the same time, as the body becomes stronger, we also become self-reliant. You don’t need to depend on anyone else for your personal work. This regular exercise removes laziness and boredom from the body and makes the body fresh. That is, the body’s enthusiasm and energy to do any work increases.
स्वाध्याय
प्र. १. व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
प्र. २. चूक की बरोबर ते लिहा.
(अ) व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो.
उत्तर: बरोबर
(आ) व्यायामाने जडत्व वाढते.
उत्तर: चूक
(इ) व्यायामाने स्नायू अशक्त होतात.
उत्तर: चूक
(ई) व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
उत्तर: बरोबर
प्र. ३. शब्दसमूहांबद्दल एक शब्द चौकटींत लिहा.
(अ) आरोग्य देणारी –
उत्तर: आरोग्यदायी
(आ) विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती –
उत्तर: प्रतिकारशक्ती
(इ) स्वतःची कामे स्वतः करणारा –
उत्तर: स्वावलंबी
प्र. ४. व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा.
उत्तर:
प्र. ५. भावार्थाधारित.
(अ) व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: मानवी जीवनात व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. व्यायामाचे महत्त्व संपूर्ण जगाने मान्य केले आहे. व्यायामामुळे शरीरातील आळस, कंटाळा दूर होतो. शरीरामध्ये तरतरी, उत्साह येतो. व्यायामामुळे अन्नपचन सहजपणे होते. शरीरात स्थूलपणा वाढत नाही. रक्तव्यवस्था सुरळीत होते. शरीरातील स्नायू बळकट मजबूत होऊन आपले आयुष्य वाढते. शिवाय शरीरातील पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि काम करण्याचा उत्साह वाढतो. त्यामुळे दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे.
Exercise has a unique importance in human life. The importance of exercise is recognized worldwide. Exercise removes laziness and boredom from the body. Somehow, excitement comes into the body. Exercise makes digestion easier. Obesity does not increase in the body. The blood system is smooth. By strengthening the muscles in the body, our life span increases. Moreover, it helps to balance the amount of pitta, kapha, vayu in the body. It increases the immunity of the body and increases the enthusiasm to work. So it is necessary to exercise daily.
(आ) ‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची ।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
उत्तर: तुकडोजी महाराज म्हणतात की, व्यायामामुळे आपल्या शरीराला बळकटी प्राप्त होऊन रोग प्रतिकारकशक्ती वाढते. येणाऱ्या आजारांचा, संकटांचा आपण सहज सामना करू शकतो. त्याचबरोबर शरीर सुदृढ झाल्यामुळे आपण स्वावलंबीसुद्धा बनतो. आपल्या व्यक्तिगत कामासाठी आपल्याला दुसऱ्या कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता राहत नाही. या नियमित व्यायामामुळे शरीरातील आळस कंटाळा दूर होऊन शरीर ताजेतवाने बनते. शिवाय कोणत्याही कामामध्ये उत्साह जाणवतो. म्हणजेच कोणतेही काम करण्याची शरीरातील जोश, स्फूर्ति वाढते.
Tukdoji Maharaj says that exercise strengthens our body and increases immunity. We can easily face the coming diseases and crises. At the same time, as the body becomes stronger, we also become self-reliant. You don’t need to depend on anyone else for your personal work. Due to this regular exercise, the body gets refreshed and gets rid of the laziness. Moreover, enthusiasm is felt in any work. That is, the body’s enthusiasm and energy to do any work increases.
(इ) ‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
उत्तर: संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी देवाजवळ बसून घराघरात ‘शुभं करोति कल्याणम्’ ही दिव्याची प्रार्थना म्हटली जाते. ‘आरोग्यम् धनसंपदा’ ही त्यातीलच एक पंक्ती आहे. प्रार्थना करताना जणू आपण परमेश्वराकडून आरोग्यरूपी धनसंपदेची अपेक्षा करत असतो. पण अवघ्या जगाने मान्य केले आहे की उत्तम आरोग्य प्राप्त करणे हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी नियमितपणे योग्य व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामामुळे अन्नपचन व्यवस्थित होते. रक्तव्यवस्था सुरळीत होते. शरीरातील स्नायू बळकट होऊन शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. शिवाय शरीरातील पित्त, कफ, वायू यांचे प्रमाण संतुलित राहते. शरीरामध्ये तरतरी, उत्साह वाढतो. या व्यायामामुळेच उत्तम आरोग्याची प्राप्ती आपणाला होते. आपल्याला लाभलेले उत्तम आरोग्य ही खऱ्या अर्थाने आपली धनसंपदाच असते.
At the time of lighting the lamp in the evening, ‘Shubham Karoti Kalyanam’ is said as a prayer to the lamp in the house. ‘Arogyam Dhansampada’ is one of them. While praying, it is as if we are expecting wealth in the form of health from the Lord. But the whole world has agreed that achieving good health is in our own hands. For that, it is necessary to do proper exercise regularly. Exercise improves digestion. The blood system is smooth. By strengthening the muscles in the body, the immunity of the body increases. Moreover, the amount of pitta, kapha, gas in the body remains balanced. Somehow in the body, excitement rises. It is because of this exercise that we get better health. The good health we enjoy is truly our wealth.
भाषाभ्यास
समासात कमीत कमी दोन शब्द असावे लागतात. त्याला ‘पद’ असे म्हणतात. त्या दोन पदांपैकी कोणत्या पदाला प्राधान्य आहे यावरून समासाचे प्रकार ठरतात.
पद प्रधान / गौण समासाचे नाव
(कमी महत्त्वाची)
(१) पहिले पद प्रधान अव्ययीभाव
(२) दुसरे पद प्रधान तत्पुरुष
(३) दोन्ही पदे प्रधान द्वंद्व
(४) दोन्ही पद गौण बहुव्रीही
यावर्षी आपल्याला ‘अव्ययीभाव’ आणि ‘द्वंद्व’ हे दोन समास समजून घ्यायचे आहेत.