पाठ ४ – जी. आय. पी. रेल्वे
स्वाध्याय
प्र. १. रिकाम्या जागी योग्य पर्या लिहून वाक्य पूर्ण करा.
(१) भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
(ठाणे / मुंबई / कर्जत / पुणे)
उत्तर: मुंबई
(२) रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
(तिकीट / बक्षीस / इनाम / प्रलोभन)
उत्तर: इनाम
प्र. २. आकृतिबंध पूर्ण करा.
उत्तर:
प्र. ३. आकृती पूर्ण करा.
(अ) रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे
उत्तर:
> सर जमशेटजी जिजीभाई
> जगन्नाथ नाना शंकरशेट
(आ) इंडियन पेनिनशुला रेल्वे धावलेली ठिकाणे ते
उत्तर:
> मुंबई
ते
> ठाणे
(इ) रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल
उत्तर:
> १८ एप्रिल
> १८५३
(ई) घाट उतरणीची सुखसोय नि सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे
उत्तर:
> करशेटजी जमशेटजी
प्र. ४. खालील शब्दांसाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
मुनीम
उत्तर: गुमास्ते
आश्चर्य
उत्तर: नवल, अचंबा
फुकट
उत्तर: मोफत
सरळमार्गी
उत्तर: सपाटी
नावाजलेले
उत्तर: नामांकित
गंमत
उत्तर: मौज
प्र. ५. कारणे लिहा.
(अ) रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
उत्तर: स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय लोकांवर अंधश्रद्धांचा प्रभाव खूप जास्त होता. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे अशी धावली, तेव्हा ही गाडी म्हणजे इंग्रजांची विलायती भुताटकी आहे. मुंबईला नव्या इमारती आणि पूल बांधताहेत. त्यांच्या पायांत जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा डाव आहे. अशा अफवा त्यावेळी पसरल्या होत्या. म्हणूनच रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. अशावेळी रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांना खूप आटापिटा करावा लागला.
(आ) इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वेप्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
उत्तर: रेल्वे प्रवासाबाबत लोकांमध्ये अनेक चित्रविचित्र अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे रेल्वे प्रवासासाठी लोक तयार होत नव्हते. कितीही समजावले तरी लोकांचे समाधान काही होत नव्हते. शेवटी दर माणशी एक रूपया इनाम आणि मोफत प्रवासाची योजना सुरू केली. पैशाच्या लालुचीने ठाण्याचे आणि मुंबईचे लोक आगगाडीने जाऊ लागले की, त्यांच्या घरचे लोक आजूबाजूला उभे राहून खूप रडायचे. त्यांची समजूत काढणे खूप त्रासाचे असायचे. एकदा ते प्रवासी ठाणे-मुंबईची सफर करून सुखरूप परत आले की चौकशी करणाऱ्यांचे घोळके त्यांच्याभोवती जमायचे. रूपयांचे इनाम पुढे आठ आण्यांवर आले. नंतर चार आणे झाले. आणि नंतर रेल्वे प्रवासाची लोकांची भीती निघून गेल्याचे पाहून इनामे बंद करण्यात आली.
प्र. ६. स्वमत.
(अ) ‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
उत्तर: आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी मुंबई ही होय. याच मुंबईहून पहिली रेल्वे १८ एप्रिल १८५३ या दिवशी मुंबई ते ठाणे अशी रेल्वे धावली होती. या रेल्वेमुळेच ठाणे ते मुंबई हा दिवसभराचा प्रवास अवघा सव्वा तासावर आला. याच रेल्वेने मुंबई – पुणे ही दोन शहरे जोडून टाकली. कारखानदारी, व्यापार, नोकरीधंदा यांमध्ये प्रचंड वाढ झाली. व्यापारी मंडळी, नोकरदार मंडळी यांचे कामधंदयाचा निमित्ताने येणे-जाणे वाढले, वेळेची बचत झाली, कामाचा पसारा वाढला. कच्च्या व पक्क्या मालाची वाहतूक या रेल्वेमुळे सहजपणे होऊ लागली. त्यामुळेच या शहरांची प्रगती वेगाने होऊ लागली. एकूणच देशाच्या प्रगतीमध्ये भरच पडत गेली. नंतरच्या काळामध्ये रेल्वेचे जाळेच संपूर्ण देशभर विणले गेले. त्याचाच परिणाम म्हणून देशाचा आर्थिक विकास झपाट्याने होऊ लागला. देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यामध्ये रेल्वेचे योगदान फार मोलाचे आहे.
(आ) स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावांसंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा.
उत्तर: स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीय जनमानसांवर अंधश्रद्धांचा फार मोठा पगडा होता. कोणताही आधुनिक बदल सहजासहजी स्वीकारला जात नव्हता. पांरपरिक गोष्टींवर लोकांचा जास्त विश्वास होता. जमशेटजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकरशेट यांच्या प्रयत्नाने सुरू झालेल्या रेल्वेला, भारतीयांनी सुरुवातीला इंग्रजांनी सुरू केलेजी वाफेची गाडी म्हणजे विलायती भुताटकी आहे, असे म्हटले. लोकांना ठाणे-मुंबई रेल्वे प्रवासाची सवय व्हावी, गोडी लागावी म्हणून मोफत प्रवास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला होता. त्यावेळी मुंबईला नव्या इमारती नि पूल बांधताहेत, त्यांच्या पायांत जिवंत गाडायला फूस लावून माणसे नेण्याचा हा साळसूद डाव आहे, असा विचार केला जात होता. याचाच अर्थ नवी इमारत किंवा नवा पूल बांधायचा असला तर त्याच्या मजबुतीसाठी त्याच्या पायामध्ये माणसांना जिवंत गाडावे लागते किंवा त्यांचा बळी दयावा लागतो, अशी विचित्र अंधश्रद्धा स्वातंत्र्यपूर्वकाळात भारतीयांमध्ये होती.
(इ) तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
उत्तर: रेल्वेमुळे प्रवास लवकर आणि सुखाचा होतो. बाकी गाड्यांच्या तुलनेत रेल्वेचा प्रवास जास्त सुरक्षित असतो. हा प्रवास स्वस्त आणि कमी खर्चिक असतो. एकाच वेळी अनेक शेकडो प्रवासी एकत्रितपणे प्रवास करू शकतात. शिवाय हलक्या तसेच वजनाने जड अशा वस्तू प्रवासात सुरक्षितपणे नेता येतात. रेल्वे फक्त शहराशहरांशी जोडलेली असल्याने गाव-खेड्यांपर्यंत प्रवास करता येत नाही. लांबच्या प्रवासासाठी तिकिट आधीच आरक्षित करावे लागते. अचानक प्रवास करायचा झाल्यास आपल्याला त्रास सहन करावा लागतो. लांबच्या प्रवासासाठी मर्यादीत गाड्या असतात. दुर्घटना झाल्यास एकाच वेळी शेकडो प्रवाशांच्या जीवाला धोका असतो. पावसात रेल्वे यंत्रणा विस्कळीत होते व प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतो.
उपक्रम :
टेलिफोन, स्वयंपाकासाठीचा गॅस, संगणक यांसारख्या आधुनिक साधनांपैकी कोणत्याही एका साधनाचा पूर्व इतिहास जाणून घ्या व तो रंजक पद्धतीने लिहा.
उत्तर:
संगणक
एकेकाळी, गणित आणि कल्पनेच्या गूढ क्षेत्रात, “संगणक” म्हणून ओळखला जाणारा एक गूढ प्राणी राहत होता. त्याची सुरुवातीची उत्पत्ती गूढतेने झाकलेली होती, त्याच्या अस्तित्वाचे संकेत बॅबिलोनियन आणि ग्रीक यांसारख्या प्राचीन संस्कृतींशी संबंधित आहेत ज्यांनी ॲबॅक्युसेस आणि ॲस्ट्रोलेब्सचा वापर केला होता.
परंतु या आर्केन प्राण्याचे खरे प्रबोधन २० व्या शतकाच्या मध्यात झाले. मानवी मनाच्या अतृप्त कुतूहलाने प्रेरित, ॲलन ट्युरिंग, जॉन फॉन न्यूमन आणि ग्रेस हॉपर सारख्या द्रष्ट्यांनी या आश्चर्यकारक यंत्रांमध्ये प्राण फुंकले. त्यांनी व्हॅक्यूम ट्यूब आणि पंच कार्ड्सच्या खोलीतून पहिले इलेक्ट्रॉनिक चमत्कार बोलावले.
जगाने ही नवीन शक्ती पाहिल्यावर, संगणकाचे युग उजाडले, आधुनिक जीवनाच्या प्रत्येक पैलूवर आपली जादू विणली. खोलीच्या आकाराच्या बेहेमथ्सपासून ते आजच्या गोंडस, खिशाच्या आकाराच्या साथीदारांपर्यंत, संगणकाचा प्रवास चालूच आहे, पिढ्यांना मंत्रमुग्ध करतो आणि आपल्या डिजिटल विश्वाचे नशीब आकार देतो.