Maharashtra Board Textbook Solutions for Standard Nine

पाठ ३ – ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

स्वाध्याय

प्र. १. योग्य पर्याय ओळखून वाक्य पूर्ण करा.

(अ) लेखकांना शिरीषला कार्यक्रम द्यायचा नव्हता, कारण…..

(१) तो नुकताच शिकायला आला होता.

(२) त्याला वाद्य वाजवता येत नव्हते.

(३) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदनाम होण्याची शक्यता होती. 

(४) तो कलेच्या प्रांतातला नवखा मुसाफिर होता.

 

उत्तर: (३) नुकताच शिकायला आल्याने विद्यालयाचे नाव बदमान होण्याची शक्यता होती.

 

(आ) लेखकांना आजपर्यंत बसला नव्हता तेवढा धक्का बसला, कारण….

(१) बारा वर्षांचा मुलगा शांतपणे वाजवत होता.

(२) ऐनवेळी कार्यक्रमाला हजर राहूनही शिरीष एवढे सुंदर वाजवत होता.

(३) शिरीषचा चेहरा पूर्वीच्या आत्मविश्वासाने न्हाऊन निघाला.

(४) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.

 

उत्तर: (४) मात्रेचाही फरक न करता शिरीष गात होता.

प्र. २. आकृतिबंध पूर्ण करा.

IMG 20230726 160548 पाठ ३ – ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

उत्तर: 

IMG 20230726 160958 पाठ ३ – ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्र. ३. जोड्या जुळवा.
पुढील दोन चौकटीतील शब्दांचा सहसंबंध ओळखून जोड्या लावा.

IMG 20230726 161037 पाठ ३ – ‘बेटा, मी ऐकतो आहे!’
IMG 20230726 161217 पाठ ३ – ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

उत्तर: 

IMG 20230726 161158 पाठ ३ – ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्र. ४. खालील परिणामाबाबतच्या घटना लिहा.

IMG 20230726 161324 पाठ ३ – ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

उत्तर: 

IMG 20230727 002349 पाठ ३ – ‘बेटा, मी ऐकतो आहे!’

प्र. ५. खालील वाक्यांत अधोरेखित शब्दांऐवजी पाठात आलेले योग्य वाक्प्रचार शोधून वाक्य पुन्हा लिहा.

(१) वर्गातील विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे शिकवणे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे.
उत्तर: वर्गातील विद्यार्थ्यांनी जिवाचे कान करून शिक्षकांचे शिकवणे ऐकले पाहिजे.

 

(२) आपल्या शाळेचे नाव वाईट होऊ नये, म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने काळजी घ्यायला हवी.
उत्तर: आपल्या शाळेचे नाव खराब होऊ नये, म्हणून प्रत्येक विदयार्थ्याने काळजी घ्यायला हवी.

 

(३) उत्तम वादनाने लेखकाचे शिरीषबाबतचे मत चांगले झाले.
उत्तर: उत्तम वादनाने लेखकाचा शिरीषबाबतचा चांगला ग्रह झाला.

प्र. ६. खालील शब्द व त्यांचे अर्थयांच्या जोड्या लावा.

‘अ’ गट 

(१) कोलाहल

(२) तऱ्हेवाईक

(३) मुसाफिर

(४) उद्युक्त

‘ब’ गट

(अ) प्रवासी

(आ) विचित्र

(इ) प्रेरित

(ई) गोंधळ

उत्तर: 

‘अ’ गट 

(१) कोलाहल

(२) तऱ्हेवाईक

(३) मुसाफिर

(४) उद्युक्त

‘ब’ गट

(ई) गोंधळ

(आ) विचित्र

(अ) प्रवासी

(इ) प्रेरित

प्र. ७. स्वमत.

(अ) शिरीषमधील तुम्हांला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा.

उत्तर: शिरीषमध्ये संगीत कलेवर जिवापाड प्रेम करणारे वडील व त्यांच्या अपघातामुळे संगीतसेवेपासून अंतरलेल्या वडिलांच्या सुखासाठी धडपडणारा भावुक मुलगा दिसून येतो. वडिलांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यासोबत राहून त्याने त्यांची सेवा केली. वडिलांच्या निधनानंतर ताबडतोब शिकवणीचे पैसे पाठवून दिले. या प्रसंगावरून त्याचा प्रामाणिकपणा दिसून येतो. शिरीषने नानांना स्मरून अखंडपणे संगीताचा ध्यास घेतला, अहोरात्र सराव केला. यातून त्याची मेहनत व ध्येयपूर्तीची धडपड दिसून येते.

 

(आ) शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.

उत्तर: शिरीष हा दहा – बारा वर्षांचा मुलगा. त्याचे वडील एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. पण एका जबर अपघातामुळे ते पूर्णपणे बहिरे झाले. बहिरेपणामुळे त्यांची संगीतसेवा अंतरली. शिरीषने संगीत शिकून त्यात प्रावीण्य मिळवावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. वडिलांच्या सौख्यासाठी शिरीषने अखंडपणे संगीत कलेची साधना केली. वडिलांच्या निधनानंतरही लोकनिंदेची पर्वा न करता, त्या कठीण परिस्थितीतही त्याने आपले ध्येय गाठले. शिरीषच्या या खंबीर भूमिकेतून आपल्याला असा संदेश मिळतो की, आपणही आपल्या जीवनात कितीही मोठी संकटे आली तरी न डगमगता धैर्याने परिस्थितीशी सामना केला पाहिजे. कष्टाने सातत्याने आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला पाहिजे, ध्येयपूर्तीसाठी धडपड केली पाहिजे.

प्र. ८. अभिव्यक्ती.

(अ) पाठातील तुम्हांला सर्वांत आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा.

उत्तर: ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी शिरीषने ठरवले, की संगीत बंद! पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला, की त्याचे नाना तेव्हा त्याचे वादन ऐकू शकत नव्हते; पण आता त्याच्याच शेजारी बसून नक्की ते ऐकत आहेत. या विचारासरशी, लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता शिरीषने त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. चोवीस तास एकच उद्योग, एकच ध्यास ! शिरीष सराव करू लागला, म्हणजे त्याला भास व्हायचा, की पुढच्या ताना व सूर त्याला नानाच सांगत आहेत, तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. यावरून शिरीषची नानांबद्दलची निष्ठा दिसून येते.

 

(आ) प्रस्तुत कथेचे संवादरूपाने लेखन करा.

उत्तर: 

(शिरीष व त्याचे वडिल संगीत शिक्षकाच्या भेटीला जातात) 

 

शिरीष : नमस्कार ! मी शिरीष भागवत. मला गाण्याची फार आवड आहे. मला संगीत शिकायचे आहे.

 

संगीत शिक्षक : बरं, तुला गाण्याची फार आवड आहे तर! 

 

शिरीष : माझ्यापेक्षा माझ्या वडिलांना मी संगीत शिकलेले फार आवडेल. मी आपल्याकडे शिकायला येईन; पण माझ्याबरोबर रोज माझे वडील पण शिकवणी चालू असताना वर्गात बसतील. अशी माझी अट आहे.

 

संगीत शिक्षक : मान्य! तुझ्या अटी एकदम मान्य; पण तुला त्यासाठी महिना पन्नास रुपये फी द्यावी लागेल! 

 

शिरीष : कबूल ! मी उद्यापासून शिकवणीला येतो.

 

(तीन महिने शिरीष नियमितपणे वडिलांसोबत शिकवणीला जातो. काही दिवसांनी शिरीषच्या वडिलांचे निधन होते. कार्यक्रमाच्या दिवशी शिरीष शिक्षकांना भेटायला जातो.)

 

शिरीष : माझ्या वडिलांचे निधन झाले, त्यामुळे मी शिकवणीला येऊ शकलो नाही, परंतु मला कार्यक्रमात सहभाग घेण्याची परवानगी दयावी, ही विनंती.

 

संगीत शिक्षक : शिरीष तुझी मनःस्थिती ठीक नाही. शिवाय गैरहजेरीमुळे तुझा सरावही नाही. त्यामुळे तुला परवानगी देता येणार नाही.

 

शिरीष : मला परवानगी दिली, तर माझी मनःस्थिती आपोआप सुधारेल.

 

संगीत शिक्षक : ठीक आहे. दिली तुला परवानगी. पण नीट वाजव 

 

शिरीष : होय सर, धन्यवाद.

 

(शिरीष उत्कृष्टपणे वादन करतो. श्रोते व शिक्षक सगळेच त्याचे वादन ऐकून प्रभावित होतात. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षक शिरीषला भेटतात व त्याचे कौतुक करतात.)

 

संगीत शिक्षक : अरे वा ! शिरीष. तू तर आज कमालच केली. अशा मनःस्थितीत तुला कसे शक्य झाले?

 

शिरीष : सर, माझे नाना मोठे गवई होते, परंतु एका अपघातामुळे ते ठार बहिरे झाले. त्यांच्या सुखासाठी मी ही धडपड करत होतो. पण ज्या दिवाशी नाना गेले त्या दिवशी मी संगीत बंद केले; पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा वादन ऐकू शकत नव्हते; पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारा सरशी मी त्याच दिवासापासून व्हायोलिन वाजावाला सुरुवात केली. आज सकाळपासून कुठे बाहेर पडलो नाही. चोवीस तास एकच उद्योग, एकच ध्यास ! त्याचा हा परिणाम.

 

संगीत शिक्षक : शाब्बास ! शिरीष तू फार मोठी कामगिरी केली. आज माझे बाबा नाहीत. आज जर ते असते तर म्हणाले असते, ‘बेटा, मी ऐकत आहे!’ 

 

(शिक्षकांनी शिरीषच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली, त्यावेळी शिरीषच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले.)