पाठ २ – संतवाणी
(आ) संतकृपा झाली
(१) कवी / कवयित्री :
संत बहिणाबाई.
(२) संदर्भ :
वारकरी संप्रदायरूपी मंदिराची उभारणी कशी व कोणी केली या संदर्भात हा अभंग लिहिलेला आहे.
(३) प्रस्तावना :
वारकरी संप्रदायातील संत कवयित्री बहिणाबाई या संत तुकाराम यांच्या शिष्या होत. भक्तिभावनेचा उत्कट आविष्कार त्यांच्या अभंगातून आढळतो.
(४) वाङ्मयप्रकार :
‘अभंग’ या छंदात प्रस्तुत कविता आहे.
(५) कवितेचा विषय :
वारकरी संप्रदायाची इमारत उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचे वर्णन केले आहे.
(६) कवितेतील आवडलेली ओळ :
तुका झालासे कळस ।
भजन करा सावकाश ।।
(७) मध्यवर्ती कल्पना :
वारकरी संप्रदायरूपी मंदिराच्या उभारणीमध्ये संतांनी कोणकोणते कार्य केले यांचे रूपकात्मक वर्णन या अभंगात बहारदार शब्दांत केले आहे.
(८) कवितेतून मिळणारा संदेश :
वारकरी संप्रदायाच्या उभारणीमध्ये संतांचा मोलाचा वाटा आहे, या इमारतीची जपणूक करण्याची जबाबदारी मराठी रयतेवर आहे.
(९) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :
प्रस्तुत अभंगाची रचना साधी, सुलभ आहे. इमारताचे रूपक योजलेले आहे. वारकरी संप्रदायाची थोर परंपरा विशद केली आहे. संतकृपेचे महत्त्व सांगून संप्रदायाची ध्वजा फडकत ठेवण्याचे आवाहन संत बहिणाबाईनी आत्मीयतेने केले आहे. म्हणून ही अभंगरचना मला आवडते.
(१०) भाषिक वैशिष्ट्ये :
सर्वसामान्य माणसाला उमजेल असा ‘अभंग’ हा लोकछंद वापरला आहे. यातील इमारतीचे रूपक, पाया, आवार, खांब व कळस या क्रमाने मांडले आहे. प्रत्येक संताचीकामगिरी एकेका चरणात सांगितली आहे. संतकृपेची महती सोप्या शब्दकळेत लोकमानसात बिंबवली आहे.
संतकृपा झाली ।
इमारत फळा आली ।।१।।
अर्थ : महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या संतांनी आपल्या अलौकिक विचारांनी महाराष्ट्रात विठ्ठल भक्तीच्या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला संतांनी आपल्या विचारांनी, भक्तीच्या जोरावर मूर्तिमंत रूप दिले. जणूकाही संतांनी त्यावर कृपाच केली.
English Translation: Maharashtra is famous as the land of saints. These saints created the Varkari sect of Vitthal Bhakti in Maharashtra with their supernatural thoughts. Saints gave this Varkari Sampradaya form of edifice an idolatrous form with their thoughts and devotion. It was as if the saints had blessed it.
ज्ञानदेवें रचिला पाया ।
उभारिलें देवालया ।।२।।
अर्थ : या वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला. आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरांनी या इमारतीचा पाया उभा केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे.
English Translation: Dnyaneshwar laid the foundation of this Varkari sectarian building. With the strength of his knowledge and devotion, Dnyaneshwar laid the foundation of this building. Varkari Sect established. That is why even after hundreds of years, this Varkari sect continues to grow day by day.
नामा तयाचा किंकर ।
तेणें रचिलें तें आवार ।।३।।
अर्थ : संत बहिणाबाई सांगतात, या वारकरी संप्रदायाचा दास बनण्याचे महान कार्य संत नामदेव यांनी केले. त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार संपूर्ण भारतभर केला. वारकरी संप्रदायाचा दास बनून जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत वारकरी संप्रदायाचे संवर्धन व संगोपन केले. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले.
English Translation: Sant Bahinabai says, Sant Namdev did the great work of becoming a slave of this Varkari sect. He spread the Varkari sect all over India. Being a servant of the Varkari sect, he nurtured and nurtured the Varkari sect till the last moment of his life. The Varkari sect became widespread.
जनार्दन एकनाथ ।
खांब दिधला भागवत ।।४।।
अर्थ : संत जनार्दन व संत एकनाथ यांनी भागवत संप्रदायाची निर्मिती करून वारकरी संप्रदायाला त्याची जोड दिली. वारकरी संप्रदायाला व्यापक स्वरूप देण्याचा आटोकाट प्रयत्न या दोन्ही संतांनी केला. संप्रदायाला गुरूकृपेने बळकट केले.
English Translation: Sant Janardhan and Sant Eknath created the Bhagavata sect and added it to the Varkari sect. Both these saints tried hard to make the Varkari sect wider. The sect was strengthened by Guru’s grace.
तुका झालासे कळस ।
भजन करा सावकाश ।।५।।
अर्थ : भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम महाराज होत. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या या वारकरी संप्रदायरूपी इमारतीवर तुकारामांनी आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायरूपी इमारतीला परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत ही इमारत त्यांनी पोहोचवली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग तुकाराम महाराजांनी सर्वांना सांगितला.
English Translation: The final stage of devotion is becoming Sant Tukaram Maharaj. On this Varkari sectarian edifice created by Dnyaneshwar with the help of knowledge, Tukaram raised the culmination of his transcendental devotion and truly perfected the Varkari sectarian edifice. He brought this building to the full splendor of devotion. Also, Tukaram Maharaj told everyone that Bhajan is an easy way of devotion without falling into rituals and rituals.
बहिणी म्हणे फडकती ध्वजा ।
निरूपणा केलें बोजा ।।६।।
अर्थ : संत बहिणाबाई सांगतात, अशा या वारकरी संप्रदायरूपी इमारतीची ध्वजा सतत फडकत ठेवण्याचे कार्य, त्याची धुरा सांभाळण्याचे काम मी माझ्या खांदयावर घेतले आहे. ती एकप्रकारची जबाबदारी माझ्यावर आहे. निरूपणाच्या माध्यमातून मी वारकरी धर्माचा प्रचार व प्रसार करत आहे. निरूपणातून ती जबाबदारी मी पार पाडत आहे.
English Translation: Sant Bahinabai says, I have taken on my shoulders the task of keeping the flag of this Varkari sectarian building constantly flying, taking care of its axis. It is a kind of responsibility on me. I am propagating and propagating Varkari Dharma through Nirupana. I am carrying out that responsibility through representation.
स्वाध्याय
प्र. १. चौकटी पूर्ण करा.
उत्तर:
प्र. २. कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले)
उत्तर:
प्र. ३. भावार्थाधारित.
(१) ‘तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
उत्तर: भक्तीची अंतिम अवस्था म्हणजेच संत तुकाराम. ज्ञानेश्वरांनी ज्ञानाच्या साहाय्याने निर्मिती केलेल्या वारकरी संप्रदायरूपी इमारतीला आपल्या अलौकिक भक्तीचा कळस चढवून खऱ्या अर्थाने तुकारामांनी परिपूर्णता प्राप्त करून दिली. भक्तीच्या परिपूर्ण वैभवापर्यंत पोहोचवली. तसेच पूजाअर्चा, कर्मकांड यांमध्ये न पडता नामस्मरण (भजन) हा भक्तीचा सोपा मार्ग सर्वांना सांगितला.
(२) ‘ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
उत्तर: वारकरी संप्रदायरूपी इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी रचिला. आपल्या ज्ञान व भक्ती यांच्या जोरावर ‘ज्ञानेश्वरी’ या इमारतीचा पाया निर्माण केला. वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यामुळेच आज शेकडो वर्षे झाली तरी हा वारकरी संप्रदाय दिवसेंदिवस वाढतच आहे.
प्र. ४. अभिव्यक्ती.
(१) संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
उत्तर: संतांनी नेहमीच दया, क्षमा, शांती यांची शिकवण समाजाला दिली. आपल्या ज्ञानाच्या व भक्तीच्या जोरावरच त्यांनी समाजातील अज्ञान, अत्याचार, जातीभेद दूर करण्याचा प्रयत्न केला. मुक्या प्राणीमात्रांवर प्रेम करा, भूतदया हा सर्वांत मोलाचा संदेश संतांनी समाजाला दिला. म्हणूनच की काय संत एकनाथांनी चंद्रभागेच्या त्या कडक उन्हाच्या वाळवंटात तहानेने तडफडत असलेल्या गाढवाला पाणी पाजले. त्याच वाळवंटात उन्हाने चटके बसल्यामुळे धाय मोकलून रडणाऱ्या मुलाला उचलून घेतले. म्हणजे नुसता उपदेश न देता आपल्या कृतीतून देखील पटवून दिले.
उपक्रम :
डॉ. हे. वि. इनामदार यांच्या ‘भक्तिगंगेच्या वाटेवर’ या पुस्तकाचे वर्गात सामूहिक वाचन करा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.