पाठ २ – संतवाणी
(अ) भेटीलागी जीवा
(१) कवी / कवयित्री :
संत तुकाराम.
(२) संदर्भ :
संत तुकारामांची श्रीविठ्ठलावर असीम भक्ती आहे. त्यामुळे विठ्ठलदर्शनाची ओढ व्यक्त करताना हा अभंग लिहिला आहे.
(३) प्रस्तावना :
संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संतकवी आहेत. त्यांनी आपल्या अभंगांतून अहंकार, दुराचार, दांभिकता यांवर परखड टीका केली आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व भक्ती ही त्यांच्या अभंगरचनेची वैशिष्ट्ये आहेत. ‘अभंगगाथा’ हे त्यांच्या अभंगांचे संकलन आहे.
(४) वाङ्मयप्रकार :
अभंग हा छंदप्रकार.
(५) कवितेचा विषय :
विठ्ठलदर्शनाची असीम ओढ.
(६) कवितेतील आवडलेली ओळ :
भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे उरि माउलीची ।
(७) मध्यवर्ती कल्पना :
श्रीविठ्ठलदर्शनाची तीव्र ओढ संत तुकाराम महाराजांनी या अभंगात वेगवेगळ्या समर्पक दृष्टान्तांतून व्यक्त केली आहे.
(८) कवितेतून मिळणारा संदेश :
जी व्यक्ती आपल्याला प्रिय असते, त्याविषयी आपल्या मनात अतीव ओढ असेल, तर ती आपल्याला दर्शन देतेच.
(९) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे :
संत तुकारामांना विठ्ठलदर्शनाची आस लागली आहे. ती त्यांनी चकोर – चंद्रमा, लेक – माहेर, भुकेले बाळ – आई या दृष्टान्तांतून समर्पकरीत्या व्यक्त केली आहे. त्यामुळे हा अभंग काळजाला भिडतो. श्रीविठ्ठल माउली व आपण तिचे बाळ आहोत, ही कल्पना मला भावल्यामुळे हा अभंग मला आवडला.
(१०) भाषिक वैशिष्ट्ये :
मनातील भाव सहज व्यक्त होईल असा अभंग हा मराठीचा जुना छंद या कवितेसाठी योजला आहे. यातील दृष्टान्त समर्पक आहेत. संपूर्ण कवितेत विठ्ठलदर्शनाची ओढ पहिल्या चरणापासून शेवटच्या चरणापर्यंत आतं होत जाते. तसेच विठ्ठलदर्शनाची आस म्हणजे माझी भूक आहे, हा मथितार्थ भुकेले बाळ व आई या रूपकातून तंतोतंत आला आहे. शिवाय अंतर्गत यमकांची मांडणी सहज केली आहे.
भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।।१।।
अर्थ : संत तुकाराम विठ्ठलाला उद्देशून सांगतात की, हे विठ्ठला मला तुझ्या भेटीची आस लागली आहे. मी रात्रंदिवस तुझ्या भेटीची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.
English translation: Saint Tukaram addresses Vitthal and says, “O Vitthal, I am longing for your visit. I am eagerly waiting for your visit day and night.”
पूर्णिमेचा चंद्रमा चकोराजीवन ।
तैसें माझें मन वाट पाहे ।।२।।
अर्थ : आपल्याला लागलेली विठ्ठल भेटीची ओढ पटवून देताना संत तुकाराम चकोराचे उदाहरण देत आहेत. ते सांगतात, ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते त्याचप्रमाणे विठ्ठल हे माझे जीवन आहे. त्यामुळे माझे मन त्या चकोर पक्ष्यासारखे विठ्ठल दर्शनाची अतिशय मनापासून वाट पाहत आहे.
English translation: Saint Tukaram is giving the example of Chakora while convincing us about the attraction of visiting Vitthal. He says, just as the full moon is Chakora’s life, Vitthal is my life. So my heart is waiting for Vitthal darshan like that sweet bird.
दिवाळीच्या मुळा लेंकीं आसावली ।
पाहातसे वाटुली पंढरीची ।।३।।
अर्थ : संत तुकाराम सांगतात, ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुली दिवाळीच्या सणाला माहेरपणाहून कोणीतरी मुऱ्हाळी आपल्याला न्यायला येईल याची अतिशय मनापासून वाट पाहत असतात. त्याचप्रमाणे हे विठ्ठला मी देखील पंढरपुराहून कोणीतरी मला भेटीसाठी न्यायला येईल, याची आतुरतेने वाट पाहत आहे.
English translation: Saint Tukaram says, Just as the daughters-in-law who have lost their mother-in-law wait with all their heart for the arrival of some Murhali on the festival of Diwali. Similarly, this Vitthal, I am also eagerly waiting for someone from Pandharpur to visit me.
भुकेलिवा बाळ अति शोक करी ।
वाट पाहे उरि माउलीची ।।४।।
अर्थ : विठ्ठल भेटीची तीव्र आस व्यक्त करताना संत तुकाराम सांगतात, लहान बाळ भुकेपोटी अतिशय व्याकुळतेने शोक करते म्हणजे रडत, तळमळत असते व आपली भूक मिटावी म्हणून आपल्या आईची अतिशय आतुरतेने वाट पाहत असते. तशीच मी देखील तुझी वाट पाहत आहे.
English translation: Saint Tukaram, while expressing his intense desire to meet Vitthal, says, the little baby mourns with great anxiety, i.e. cries, yearns and waits very eagerly for his mother to satisfy his hunger. I am also waiting for you.
तुका म्हणे मज लागलीसे भूक ।
धांवूनि श्रीमुख दांवी देवा ।।५।।
अर्थ :अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज सांगतात, लहान बाळाप्रमाणे मलादेखील विठ्ठल दर्शनाची तीव्र भूक लागली आहे. अशावेळी ते विठ्ठलाला विनंती करतात की, हे देवा, तुझे श्रीमुख म्हणजे तुझे दर्शन मला व्हावे म्हणून तू माझ्यासाठी धावून ये.
English translation: At the end of Abhanga, Tukaram Maharaj says, Like a small baby, I am also very hungry for Vitthal Darshan. At that time, they requested Vitthal to run for me so that I may see Your Shrimukh, O God.
स्वाध्याय
प्र. १. तक्ता पूर्ण करा.

उत्तर:

प्र. २. योग्य अर्थ शोधा.
(अ) आस लागणे म्हणजे ______
(१) ध्यास लागणे
(२) उत्कंठा वाढणे
(३) घाई होणे
(४) तहान लागणे
उत्तर: (१) ध्यास लागणे
(आ) वाटुली म्हणजे ______
(१) धाटुली
(२) वाट
(३) वळण
(४) वाट पाहणे
उत्तर: (२) वाट
प्र. ३. भावार्थाधारित.
(अ) संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीबाबत दिलेल्या दृष्टान्तातील तुम्हांला आवडलेला दृष्टान्त स्पष्ट करा.
उत्तर: संत तुकारामांनी पांडुरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या आपल्या मन:स्थितीचे वर्णन करताना दिलेले लहान बाळाचे उदाहरण अतिशय समर्पक वाटते. ज्याप्रमाणे लहान बाळाचे विश्व हे त्याची आईच असते त्याचप्रमाणे तुकारामांचे विश्व म्हणजे फक्त विठ्ठलच आहे. बाळाला भूक लागल्यावर तो अतिशय आतुरतेने आपल्या आईची वाट पाहतो. तिच्या भेटीसाठी तो आतुर झालेला असतो. तिची भेट होणे हे त्याचे ध्येय असते. त्याचप्रमाणे विठ्ठलाची भेट हे संत तुकारामांच्या जीवनाचे ध्येय आहे.
परिणामी हा दृष्टान्त अतिशय समर्पक वाटतो.
(आ) चकोराच्या दृष्टान्तातून संत तुकाराम काय सिद्ध करू इच्छितात, ते तुमच्या शब्दांत लिहा.
उत्तर: संत तुकारामांना विठ्ठल भेटीची आस लागली आहे. ज्याप्रमाणे पौर्णिमेचा चंद्रमा हेच चकोराचे जीवन असते. पौर्णिमेच्या चंद्राची तो आतुरतेने वाट पाहत असतो. त्याचप्रमाणे पंढरपुरच्या विठ्ठलाच्या भेटीची संत तुकारामांना आस लागली आहे. विठ्ठलाचे दर्शन हेव जणू त्याच्या जीवनाचे अंतिम ध्येय आहे.
उपक्रम :
(१) संत बहिणाबाईंचा ‘जलाविण मासा’ हा अभंग मिळवून वर्गात त्याचे वाचन करा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.
(२) संत कान्होपात्रा यांचा ‘नको देवराया अंत आता पाहू’ हा अभंग मिळवून वाचा.
उत्तर: विद्यार्थ्यांनी हे स्वतः केले पाहिजे.