पाठ १ – सर्वात्मका शिवसुंदरा
सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना।
तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्या ने जीवना।।
अर्थ : हे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असलेल्या शिवसुंदरा परमेश्वरा, तू आमचे वंदन स्वीकार कर. हे परमेश्वरा, तू आमच्या जीवनाला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा. आमच्या जीवनाला योग्य मार्ग दाखव.
English translation: Lord Shiva, who is in the place of all living beings, accept our obeisances. O Lord, lead our lives from darkness to light. Show our life the right path.
सुमनांत तू गगनात तू
ताऱ्यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामधे
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना।।
अर्थ : हे परमेश्वरा, सुमनांत म्हणजेच प्रत्येक फुलांत, गगनात तूच सामावलेला आहे. ताऱ्यांमध्ये देखील तू फुललेला म्हणजेच भरलेला, व्यापलेला आहेस. या जगामध्ये जे जे सद्धर्माने वागतात त्या सर्वांमध्ये तू राहतोस. या सृष्टीमध्ये चोहीकडे तुझीच रूपे आहेत, याची मला जाणीव आहे.
English translation: O Lord, You are contained in Sumananta, that is, in every flower, in the sky. Even in the stars you are full of flowers. You live among all who do good in this world. I am aware that all of this creation has forms of you.
श्रमतोस तू शेतामधे
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले वा गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना।।
अर्थ : हे परमेश्वरा, शेतामध्ये त्या कष्ट करणाऱ्या लोकांबरोबर तू स्वतः मेहनत करतोस. या जगामध्ये जे जे दुःखी, कष्टी जीवनाने त्रासलेले आहेत, त्या लोकांची आसवे तू पुसतोस. म्हणजेच या सर्वांचे दुःख, त्रास तू दूर करतोस. जिथे कोणत्याही स्वार्थाशिवाय तुझी सेवा केली जाते, तिथे तुझे पावन चरण पाहायला मिळतात. तिथे तुझे अस्तित्व जाणवते.
English translation: O Lord, you yourself toil with those laborers in the field. You wipe away the desires of those who are afflicted with a miserable, toilsome life in this world. That is, you remove all their sorrows and troubles. Wherever you are served without any selfishness, your holy feet are seen. Your presence is felt there.
न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमि चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना।।
अर्थ : पुढे कवी सांगतात की, जे लोक अन्यायाविरुद्ध लढतात, न्यायासाठी तलवार हातात घेऊन रणांगणावर लढण्यासाठी जातात, त्यांच्या हातातल्या तलवारीमध्ये परमेश्वरा तू राहतोस. तसेच जे लोक ध्येयवेडे असतात. जे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी अंधारातून (संकटातून) ही मार्ग काढतात तू त्यांच्यामध्ये दीप बनून राहतोस. त्यांच्यात आत्मविश्वास, हिंमत निर्माण करतोस. म्हणजेच ध्येय प्राप्तीचा योग्य मार्ग तू त्यांना दाखवतोस. तसेच जे ज्ञानाची लालसा मनामध्ये धरून त्याची कास धरतात, त्यासाठी तप करतात, त्यांची ज्ञानसाधना तू होतोस.
English translation: The poet further says that those who fight against injustice, take the sword in hand for justice and go to the battlefield to fight, with the sword in their hands, Lord, you reside. Also people who are ambitious. You remain a lamp among those who take this path through darkness (distress) to achieve their goal. You create confidence and courage in them. That is, you show them the right way to achieve the goal. Also, those who hold the desire for knowledge in their heart and hold it, do penance for it, you are their pursuit of knowledge.
करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्येनित जागवी भीतीविना।।
अर्थ : कवी परमेश्वराला सांगतो, हे करुणाकरा तुझा आशीर्वाद पाठीशी असताना मला कुठलीही भीती नाही. त्यामुळे आयुष्याच्या वाटेवर चालताना माझ्या प्रत्येक पावलाबरोबर तुझे पाऊल असेल, याची मला पक्की खात्री आहे. त्यामुळे माझ्याकडून नेहमीच सृजनत्व म्हणजेच नवनिर्मिती होईल. माझ्या मनात त्याविषयी कोणतीच भीती असणार नाही.
English translation: The poet says to the Lord, I have no fear when Your blessings are by my side O Karunakara. So I am sure that your step will be with my every step while walking on the path of life. Therefore, I will always be creative, i.e. innovative. I will have no fear of that.