पाठ ७ – खेळत, खेळत, वाचूया !
सेंगटी टाका – पुढे चाला.

वाचू आणि हसू
पेशंट : डॉक्टर, माझं वजन खूप वाढतंय. त्यामुळे माझी तब्येत ठीक राहत नाही.
डॉक्टर : तब्येत चांगली राहण्यासाठी रोज व्यायाम करा. मैदानी खेळ खेळा.
पेशंट : मैदानी खेळ तर मी रोज खेळतो. फुटबॉल, टेनिस, क्रिकेटदेखील खेळतो.
डॉक्टर : किती वेळ खेळता?
पेशंट : मोबाइलची बॅटरी संपेपर्यंत.
