Maharashtra Board Textbook Solutions for Standard Five

पाठ २२ – वाचूया. लिहूया.

IMG 20230920 192959 पाठ २२ – वाचूया. लिहूया.

उत्तर: गुलाबाला ‘फुलांचा राजा’ म्हणतात. गुलाब अनेक रंगांचे असतात. गुलाबी, पिवळे, सफेद अशा अनेक रंगांचे गुलाब आपल्याला पाहायला मिळतात. ‘काश्मिरी गुलाब’ सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. गुलाबाचे फूल सुगंधी असते. म्हणूनच गुलाबाच्या पाकळ्यांचा उपयोग करून सुंगधी असे अत्तर बनवितात. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये गुलाबाच्या फुलांचा उपयोग करून सजावट करतात. गुलाबाचे फूल स्त्रिया आपल्या केसात माळतात त्यामुळे स्त्रियांच्या केसांची शोभा वाढते. पुष्पगुच्छ बनविण्यासाठी गुलाबाच्या फुलांचा उपयोग करतात. अनेक लोक गुलाबाच्या फुलांची शेती करून आपली उपजीविका करतात. काही लोक फक्त गुलाबाची फुले विकण्याचा व्यवसाय करतात. खरोखरच काटेरी रोपावर फुलणारे हे फूल म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच आहे.

IMG 20230920 193007 पाठ २२ – वाचूया. लिहूया.

उत्तर: मला मोर खूप आवडतो, तो खूप सुंदर दिसतो. त्याचा रंगीबेरंगी पिसारा पाहत राहवेसे वाटते. मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोराचा | रंग खूप सुंदर असतो. पाऊस पडण्याअगोदर मोर आपला सुंदर पिसारा फुलवून नाचू लागतो व के-के असा आवाज करत ओरडतो. मोराच्या या ओरडण्यास केका असे म्हणतात. मोराची पिसे खूप सुंदर असतात. मुकुट वगैरे तयार करताना या पिसांचा उपयोग करतात. मोर छान असे नृत्य करतो. मोर, किडे, कीटक, खाऊन आपले पोट भरतो.

IMG 20230920 193855 पाठ २२ – वाचूया. लिहूया.

उत्तर:

सण, फराळ, दिव्यांची रोषणाई, फटाके, नवीन कपडे, रांगोळी, नातेवाईक एकत्र, उत्साहाचे वातावरण.

 

भारतात अनेक सण साजरे केले जातात. माझा आवडता सण दिवाळी आहे. दिवाळीत घरी करंजी, चकल्या, चिवडा असे फराळ बनविले जातात. फराळाची नातेवाईकांमध्ये, शेजाऱ्यांमध्ये देवाणघेवाण करतात. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. दारात कंदील लावला जातो. सगळीकडे दिव्यांची रोषणाई असते. रात्रीच्या वेळी। फटाके फोडले जातात. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वजण फटाके फोडण्यात उत्साहाने सहभागी होतात. घरातील सगळ्यांसाठी नवीन कपड्यांची खरेदी केली जाते. दारात छान अशी रांगोळी काढली जाते. दिवाळीच्या एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व नातेवाईक एका ठिकाणी गोळा होतात. सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते म्हणून मला दिवाळी हा सण सर्वात जास्त आवडतो.

IMG 20230920 193906 पाठ २२ – वाचूया. लिहूया.

उत्तर:

उद्यान, घसरगुंडी, झोपाळे, हिरवीगार झाडे, फुले, हिरवळ.

लोकांना विरंगुळा मिळावा म्हणून उदयाने तयार केलेली असतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आपला वेळ घालवण्यासाठी उद्यानात येतात. लहान मुलांना खेळण्यासाठी झोपाळे, घसरगुंडी अशी खेळांची साधने असतात. उद्यानात चोहोकडे हिरवीगार झाडे असतात. वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडेही असतात. फुलांचा सुगंध येणाऱ्या प्रत्येकाचे मन प्रसन्न करतो. उद्यानात छान अशी हिरवळ तयार केलेली असते. या हिरवळीवर बसून लोक गप्पा मारतात. बसण्यासाठी बाकांचीही व्यवस्था केलेली असते. शहरात अशा सुंदर उद्यानांची संख्या जास्त आहे.