पाठ २ – हत्तीचे चातुर्य
स्वाध्याय
प्र.१. सुरुवातीला दिलेल्या चित्रांखालील नावे सांगा.
उत्तर:
मुले
फुटबॉल
ससे
खड्डा
फळी
हत्ती
प्र. २. प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा.
उत्तर:
(१) पहिल्या चित्रात दोन मुलगे व एक मुलगी फुटबॉल खेळताना दिसत आहेत. तेथेच थोड्या अंतरावरून ३ ससे खेळ पाहताना दिसत आहेत.
(२) दुसऱ्या चित्रात मुले खेळून परत जाताना दिसत आहेत व त्यानंतर फुटबॉलचा ताबा सशांनी घेतला असून ते फुटबॉल खेळत आहेत.
(३) तिसऱ्या चित्रात खेळणाऱ्या सशांचा फुटबॉल खड्ड्यात पडल्यावर ससे त्या खड्ड्यात वाकून बघत आहेत.
(४) चौथ्या चित्रात खड्ड्यात पडलेला फुटबॉल ससे फळीच्या साहाय्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
(५) तेवढ्यात तेथे एक हत्ती येतो व आपल्या सोंडेतून पाणी आणून ते खड्ड्यात टाकून फुटबॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ससे हे सर्व पाहत आहेत.
(६) सहावी चौकट पूर्णपणे कोरी आहे.
प्र. ३. चित्रे पाहा. कोण ते सांगा।
(अ) खड्ड्यातील फुटबॉल काढण्यासाठी प्रयत्न करणारे.
उत्तर: ससे
(आ) सशांना मदत करणारा.
उत्तर: हत्ती
प्र. ४. गोष्टीत शेवटी काय झाले असेल ते कल्पना करून सांगा व रिकाम्या चौकटीत चित्र काढा.
उत्तर: खड्डा पाण्याने भरला. फुटबॉल पाण्यावर तरंगायला लागला. सशांना फुटबॉल मिळाला. त्यांना आनंद झाला. त्यांनी हत्तीचे आभार मानले.

प्र. ५. सर्व चित्रे पाहा व गोष्ट सांगा.
उत्तर: मैदानात मुले फुटबॉल खेळत आहेत. दोन ससे लांबून त्यांचा खेळ पाहत आहेत. मुले निघून गेलो. आता ससे फुटबॉल खेळू लागले. खेळता खेळता फुटबॉल एका खड्ड्यात पडला. आता काय करावे, ते सशांना कळेना! संशांना एक लाकडाची फळी मिळाली. त्यांनी ती खड्डयात घालून बॉल काढण्याचा प्रयत्न केला. तिथे एक हत्ती आला. त्याने सोंडेतले पाणी खड्ड्यात ओतले. ससे आश्चर्याने बघत होते. तिथे एक हत्ती आला. त्याने सोंडेतले पाणी खड्ड्यात ओतले. ससे आश्चर्याने बघत होते. खड्डा पाण्याने भरला. फुटबॉल पाण्यावर तरंगायला लागला. सशांना फुटबॉल मिळाला. त्यांना आनंद झाला. त्यांनी हत्तीचे आभार मानले.
प्र. ६. घ, ठ, थ, प या अक्षरांपासून चित्रे तयार केली आहेत. त्यांचे निरीक्षण करा. यांसारख्या इतर अक्षरांप तुम्हांलाही वेगळी चित्रे काढता येतील. कल्पना करा आणि चित्रे काढा.
उत्तर:

शब्द ओळखा व कार्डांवर लिहा.

उत्तर:
(१) वेगळा
(२) बगळा

उत्तर:
(१) मांजर
(२) गाजर

उत्तर:
(१) मगर
(२) तगर

उत्तर:
(१) कडक
(२) भडक

उत्तर:
(१) सामान
(२) कमान

उत्तर:
(१) वाटाणा
(२) फुटाणा

उत्तर:
(१) आकाश
(२) प्रकाश

उत्तर:
(१) फाटके
(२) तुटके