पाठ १८ - पैशांचे व्यवहार
स्वाध्याय
प्र. १. वरील दिलेल्या ठिकाणांना पालकांसोबत भेट दया. तेथे का काम पाहिले ते सांगा.
उत्तर: बँक, मंडई, (भाजी मार्केट) दूरध्वनी केंद्र, वीज देयक केंद्र, पोस्ट ऑफीस, कपड्यांचे दुकान, किरणा मालाचे दुकान, चपलांचे दुकान, सोनाराचे दुकान.
प्र. २. बँकेत चालणारे कोणतेही व्यवहार सांगा.
उत्तर:
(१) कर्ज देणे.
(२) चेक वटवणे.
प्र. ३. जोड्या जुळवा.
‘अ’ गट
(१) विजेचे बिल भरणे
(२) मनिऑर्डर करणे
(३) फोनचे बिल
‘ब’ गट
(अ) पोस्ट ऑफिस
(आ) दूरध्वनी केंद्र
(इ) बीज देयक केंद्र
उत्तर:
(१) विजेचे बिल भरणे – बीज देयक केंद्र
(२) मनिऑर्डर करणे – पोस्ट ऑफिस
(३) फोनचे बिल – दूरध्वनी केंद्र
प्र. ४. दुकानात जा. खालील वस्तूंचे भाव माहीत करून प्या. किंमत लिहा.
उत्तर:
प्र. ५. बँकेत चालणाऱ्या व्यवहारांपुढे अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारांपुढे x अशी खूण करा.
१. पैसे भरणे.
उत्तर: ✓
२. पैसे काढणे.
उत्तर: ✓
३. पत्र टाकणे.
उत्तर: ✘
४. चेक देणे.
उत्तर: ✓
५. मनिऑर्डर करणे.
उत्तर: ✘
६. विम्याची रक्कम भरणे.
उत्तर: ✓
७. दागिने सुरक्षित ठेवणे.
उत्तर: ✓
८. चेक वटवणे.
उत्तर: ✓
९. वीज बिल भरणे.
उत्तर: ✘
१०. कर्ज घेणे.
उत्तर: ✓
११. दागिने गहाण ठेवणे.
उत्तर: ✓
१२. मुदत ठेवीच्या योजना.
उत्तर: ✓
उपक्रम : भाजी मंडईला भेट दया. तेथे विकल्या जाणाऱ्या भाज्यांची यादी करा. भाज्यांचे प्रतिकिलो दर विचारा. ‘भाजी मंडई’ यावर पाच ते सात वाक्ये माहिती लिहा.
उत्तर:
भाज्यांची यादी –
गवार, हिरवा वाटाणा, कांदे, बटाटे, टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी, लाल भोपळा, सुरण, शिराळे, भेंडी, सिमला मिरची, आले, मिरची-कोथिंबीर, घेवडा, पालेभाज्यांमध्ये अळू, चुका, मेथी, पालक, चवळी, लाल माठ, मका, शेवग्याच्या शेंगा, दुधी, पडवळ, तोंडली, काकडी, गाजर, मुळा, विविध फळे भाजी मंडईत विक्रीसाठी असतात.
भाजी मंडई –
भाजी मंडईमध्ये वेगवेगळ्या भाज्या घेऊन भाजीवाले विकायला बसलेले असतात. भाज्यांचे विविध रंग व आकार पाहून मन तृप्त होते. भाजीवाले आपल्या भाज्यांचा दर ओरडून सांगत असतात आणि लोकांना भाजी घेण्यासाठी बोलावत असतात. भाजी मंडईत ताज्या आणि अनेक रंगांच्या भाज्या पाहून कोणती घ्यावी कोणती नको असे होते. अनेक लोक भाज्यांचा दर कमी करून भाजी घेण्यासाठी भाजीवाल्याबरोबर घासाघीस करत असतात. लोकांची खूप गर्दी असते. अनेक ओळखीची माणसे भेटतात. गप्पा मारणारेसुद्धा बरेच असतात.
वाचू आणि हसू
सोनू : मिनू, माझ्या बाबांनी कालच ‘इनोव्हा कार घेतली. आता आमच्याकडे तीन गाड्या झाल्या.
मिनू : अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमानसुद्धा आहे.
सोनू : अरे वा! मग तर तू सगळ्याच वाहनांतून फिरली असशील!
मिनू : नाही रे! माझ्या बाबांचं खेळण्यांचं दुकान आहे ना!
लिहा.
दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा.
उत्तर:
उत्तर:
उत्तर:
उत्तर:
उत्तर:
उत्तर:
उत्तर:
उत्तर: