पाठ १६ – मी नदी बोलते…
शब्दार्थ
अडवणे – थांबवणे
सागर – समुद्र
स्वाध्याय
प्र. १. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
(अ) नदीचा जन्म कोठे होतो?
उत्तर: नदीचा जन्म पर्वतावर होतो.
(आ) नदी मोठी कशी होते?
उत्तर: पर्वतावरून वाहत येताना अनेक ओढे नदीला येऊन भेटतात व नदी मोठी होते.
(इ) नदीच्या पाण्याचा उपयोग लोक कशाकशासाठी करतात?
उत्तर: नदीच्या पाण्याचा उपयोग लोक वीज निर्मितीसाठी, शेतीसाठी तसेच पिण्यासाठी करतात.
(ई) नदीचा वेग कधी कमी होतो?
उत्तर: पर्वतउतारावरून सपाट मैदानी भागात वाहत येताच नदीचा वेग कमी होतो.
(उ) नदी आपल्याला कोणता संदेश देते?
उत्तर: जीवनप्रवासात अडथळे आले तरी न थांबता सतत पुढे-पुढे जात राहावे, हा संदेश नदी आपल्याला देते.
(ऊ) तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नदया आहेत?
उत्तर: कृष्णा, कोयना, गोदावरी, यमुना, तापी, भीमा, तुंगभद्रा, मांजरा, नर्मदा, इत्यादी नदया आहेत.
प्र. २. पहिल्या दोन उदाहरणांचे निरीक्षण करा. त्यानुसार रिकाम्या जागा भरा.
(अ) चालणे चालतात चालवतात
(आ) पळणे पळतात पळवतात
(इ) भेटणे ______ ______
उत्तर: भेटतात, भेटवतात
(ई) ______ करतात ______
उत्तर: करणे, करवतात
(उ) मिळणे ______ ______
उत्तर: मिळतात, मिळवतात
(ऊ) थांबणे ______ ______
उत्तर: थांबतात, थांबवतात
प्र. ३. ‘हिरवेगार’ पासारखे रंगछटा दाखवणारे शब्द सांगा.
उत्तर:
(१) काळेकुट्ट/ काळेभोर
(२) निळेशार
(३) पिवळेजर्द / पिवळेधम्मक
(४) लालबुंद / लालचुटूक
(५) पांढराशुभ्र
प्र. ४. ‘थांबला तो संपला’ यासारखी सुवचने सांगा. सुवचनांचा संग्रह करा.
उत्तर:
(१) वाचाल तर वाचाल
(२) प्रयत्नांती परमेश्वर
(३) मानवता श्रेष्ठ धर्म आणखी सुवचने विद्याथ्यांनी स्वतः जमवा.
प्र. ५. खालील शब्द याचा व तसेच लिहा.
पर्वत
सर्व
किर्र
पूर्व मर्कट
सूर्य
प्रवास
चक्र
चंद्र
क्रमांक
प्रकार
ग्रह
उपक्रम :
१. परिसर अभ्यासाची पुस्तके, वर्तमानपत्रे, नकाशे यातून वेगवेगळ्या नद्यांची नावे शोधा. यादी करा.
उत्तर: मुळा, मुठा, इंद्रायणी, भामा, चंद्रभागा, काटेपूर्णा, सोना, मांजरा, प्रवरा, पंचगंगा, पूर्णा, गोमती, मांडवी, पवना, पैनगंगा, बोर्डी, वान, शिवना, भोगावती, गिरणा, कोलार इत्यादी.
२. नदीचे प्रदूषण कमी कसे करता येईल ते चर्चा करून सांगा.
उत्तर: नदीमध्ये कपडे, भांडी, गुरे घुणे टाळावे. नदीमध्ये शौचास जाऊ नये. कचरा नदीच्या पाण्यात न टाकता कचराकुंडीत टाकावा. घरातील, कारखान्यातील सांडपाणी नदीच्या पाण्यात न सोडता त्याची योग्य विल्हेवाट लावावी. वेळोवळी नदीच्या पाण्याचे शुद्धीकरण करावे.
३. खालील घोषवाक्ये पाहा. ‘पाणी वाचवणे’ या संदर्भातील आणखी घोषवाक्ये मिळवा व संग्रह करा.
उत्तर:
(अ) पाणी अडवा, तयार करा तळे, त्यातून फुलवा हिरवेगार मळे.
(आ) प्रत्येकाचा एकच नारा पाण्याची काटकसर करा.
(इ) बचत पाण्याची गरज काळाची !
(ई) पाणी वाचवा, जीवन वाचवा!