पाठ १४ – चित्रसंदेश
स्वाध्याय
प्र. १. यसमधील सूचना व संदेशांचे वाचन करा.
उत्तर:
(अ) धूम्रपान करू नये.
(ब) चालत्या गाडीतून उतरू नये.
(क) स्फोटक वस्तूंची ने-आण करू नये.
(ड) बसच्या दरवाजातून अगर खिडकीमधून शरीराचा कोणताही भाग बाहेर काढू नये.
(इ) बेवारस वस्तू आढळल्यास त्वरित वाहक / स्थानक प्रमुखांच्या निदर्शनास आणावी. अशा वस्तूंना स्पर्श करू नये.
(फ) तिकीट मागून घ्या. विनातिकीट प्रवास करणे गुन्हा आहे.
प्र. २. सार्वजनिक ठिकाणी लिहिलेल्या सूचना वाचा. त्या वहीत लिहा. वर्गात वाचून दाखवा.
उत्तर:
(अ) शांतता राखणे.
(ब) येथे पार्किंग करण्यास मनाई आहे.
(क) कोणत्याही अनोळखी वस्तूला हात लावू नये.
(ड) कचरा कचराकुंडीत टाका, परिसर स्वच्छ ठेवा.
(इ) परिसरात थुंकू नये.
प्र. ३. वर्गात भितीवर लिहिता येतील, अशा सूचना तयार करा.
उत्तर:
(१) कचरा कचरापेटीतच टाकावा.
(२) शाळा हे आपले दुसरे घर. ते स्वच्छ ठेवणे आपली जबाबदारी आहे.
(३) स्वच्छ शाळा, सुंदर शाळा.
(४) भिंतींवर, बसण्याच्या बाकावर पेनाने लिहू नये.
(५) शिक्षकांशी आदराने वागा.
(६) वर्गात शांतता ठेवा.
प्र. ४. काही लोक सूचनांप्रमाणे वागत नाहीत. ते तसे का वागत नसावेत? आपसात चर्चा करा.
उत्तर: सार्वजनिक ठिकाणी लिहिलेले सूचना फलक सार्वजनिक हिताच्या दृष्टीने नागरिकांसाठी लिहिलेले असतात. लोकांनी त्या सूचनांचे पालन करून सामाजिक आरोग्य सुरक्षित ठेवावे अशी अपेक्षा असते. परंतु काही लोक या सूचनांप्रमाणे वागत नाहीत कारण त्यांना नैतिक जबाबदारीची जाणीव नसते. आपण केलेल्या चुकीच्या गोष्टींमुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचेल याचा विचार ते करत नाहीत. होणाऱ्या वाईट परिणामांकडे ते दुर्लक्ष करत असतात. स्वत:बरोबरच इतर लोकांनाही त्यांच्या या चुकीच्या वर्तनाने अनेक समस्यांना तोंड दयावे लागणार आहे याविषयी त्यांना सामाजिक बांधिलकी नसते.
प्र. ५. तुमच्या शाळेत कोणकोणत्या ठिकाणी सूचना लिहाव्या लागतील, ती ठिकाणे ठरवा. तेथे लिहा सूचना मित्रांशी चर्चा करून तयार करा.
उत्तर:
(१) स्वच्छतागृह : जसे स्वच्छता राखा.
(२) प्रयोगशाळा: जसे उपकरणे सांभाळून हाताळावीत.
(३) ग्रंथालय : जसे: शांतता राखावी, पुस्तके जागेवर ठेवावीत.
(४) पाण्याची व्यवस्था असलेल्या ठिकाणी (वॉश बेसिन) : नळ चालू ठेवू नये.
(५) वर्गखोली : शांतता राखा.
(६) शाळेचे कार्यालय : शिस्त ठेवणे, आपले म्हणणे शांतपणे सांगा.
(७) संगणक कक्ष : कृपया शांतता राखा, शिस्तीचे पालन करा, संगणक कक्षाबाहेर जाताना संगणक बंद करा.