पाठ १ – नाच रे मोरा
ऐका म्हणा.
नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !
दर्गाशी धारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिंजला रे
आता तुझी पाळी
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच ॥ १ ॥
झर झर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात न्हाऊ
काहीतरी माऊ
करून पुकारा नाच ॥ २ ॥
थेंब थेंब तळात नाचती रे
टप्टप् पानात वाजती रे
पावसाच्या रेघात
खेळ खेळू दोघांत
निळ्या सौंगड्या नाच ।। ३ ।।
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आभाळात छान छान
सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच ॥ ४ ॥
– ग. दि. माडगूळकर