पाठ १३ - संतवाणी
(अ)
शब्दार्थ :
आजि – आज.
देखिलें – पाहिले.
अवघा – संपूर्ण.
शीण – थकवा.
निरसणे – दूर होणे, नाहीसा होणे.
भावार्थ –
संत सेना महाराज संतभेटीने झालेल्या आनंदाचे वर्णन करताना म्हणतात, ‘‘संतांच्या दर्शनाने आजचा दिवस सोनियाचा झाला असून ज्याप्रमाणे सासरी गेलेल्या मुलीला माहेरी आल्याने आनंद होतो तसा आनंद मला झाला आहे. या आनंदाचे वर्णन करताना पुढे ते म्हणतात, संतचरण दृष्टीला पडल्याने माझा सगळा शीण नाहीसा झाला असून घरी दिवाळी, दसरा या सणांसारखा उत्साह ओसंडून वाहू लागला आहे.’’
(आ)
शब्दार्थ :
संगे – सोबत.
दर्शनें – दर्शनाने.
हेकळी – वाकडी.
टाकळी – लहान झुडूप.
अभाविक – भाविक नसलेले
खर – गाढव.
भावार्थ –
संत चोखामेळा म्हणतात, ‘‘ज्याप्रमाणे चंदनाच्या सहवासात बोरी, बाभळी, अन्य झाडे व झुडपे आली तर ती चंदनाप्रमाणे सुगंधी होतात त्याप्रमाणे संतांच्या सहवासातही आलेले सर्वजण भाविक बनतात. मनुष्य जन्माला येऊन परमार्थ साधावा नाहीतर आपले जीवन भूमीला भारभूत ठरेल.’’