Maharashtra Board Textbook Solutions for Standard Eight

पाठ १ – आम्ही चालवू हा पुढे वारसा

गुरुने दिला ज्ञानरूपी वसा

आम्ही चालवू हा पुढे वारसा!

 

अर्थ : मुलाने शाळेत शिकण्यास सुरुवात केल्यापासून ते शिक्षण प्रवास पूर्ण होईपर्यंत कितीतरी शिक्षक त्याला प्रत्येक वळणावर भेटतात. ते सतत आपणास वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान, मूल्य, आदर्शाची शिकवण देतात. त्यामुळे आपण माणूस म्हणून आकारास येतो. गुरूच्या शिकवणीतून आपल्या अंगी सद्गुण येतात. याच सद्गुणांची शिदोरी घेऊन, तोच ज्ञानरूपी वसा घेऊन आम्ही हा वारसा पुढे दुसऱ्या पिढीपर्यंत चालवू (घेऊन जाऊ) असे कवी सांगतात.

 

English Translation:

Many teachers meet a child at every turn from the time he starts school to the completion of his education journey. They constantly teach you different types of knowledge, values, ideals. That is how we shape up as human beings. Virtues come to us from the Guru’s teachings. The poet says that we will continue this legacy to the next generation with the same wealth of knowledge.

 

 

पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली

तुम्ही कल्पवृक्षातळी सावली

तुम्ही सूर्य अम्हां दिला कवडसा!

 

अर्थ : तुम्हीच आमचे पिता (वडील), बंधु (भाऊ), स्नेही (मित्र) आहात. तुम्ही आमची माऊली (आई) आहात. तुम्हीच आमच्या जीवनातील कल्पवृक्षाखालील सावलीप्रमाणे आहात. तुम्हीच ज्ञानरूपी सूर्य बनून आम्हांस ज्ञानाचा कवडसा (झरोका) दिला आहे.

 

English Translation:

You are our father, brother, friend) You are our mother. You are like the shadow under the Kalpa tree in our life. You have become the sun of knowledge and given us the window of knowledge.

 

 

जिथे काल अंकुर बीजातले

तिथे आज वेलीवरी ही फुले

फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा!

 

अर्थ : जिथे काल जमिनीतील बीजाला अंकुर फुटले तिथे आज अंकुराची वेल होऊन त्यावर फुले फुलेली आहेत. त्याचप्रमाणे ज्ञानरूपी वृक्षालासुद्धा ज्ञानाची फळे लागून तो फलद्रूप व्हावा.

 

English Translation:

Where yesterday the seed in the ground sprouted, today the sprout has become a vine and flowers have blossomed on it. Similarly, the tree of knowledge should bear the fruits of knowledge and it should become a fruit.

 

 

शिकू धीरता, शूरता, वीरता

धरू थोर विद्येसवे नम्रता

मनी ध्यास हा एक लागो असा!

 

अर्थ : गुरूने दिलेल्या ज्ञानाच्या शिकवणूकीतून आपण सारे संयम, धाडस, पराक्रम शिकूया. थोर ज्ञानमाप्तीने आपल्यामध्ये कशाप्रकारे नम्रता आणता येईल हा एकच ध्यास आपल्या मनाला लागला पाहिजे.

 

English Translation:

Let us learn all patience, courage and prowess from the teachings of knowledge given by Guru. Our only concern should be how great knowledge can bring humility in us.

 

 

जरी दुष्ट कोणी करू शासन 

गुणी सज्जनांचे करू पालन

मनी मानसी हाच आहे ठसा!

 

अर्थ : जरी कोणी दुष्ट असतील, त्यांना शासन (दंडीत) करू जे कोणी गुणी आहेत, सज्जन आहेत, त्यांचेच पालन (रक्षण) करू. हाच पक्का विचार आमच्या सर्वांच्या मनात आहे.

 

English Translation:

Even if there are some who are wicked, we will govern (punish) them, but we will protect (protect) those who are virtuous, noble. This is the firm thought in all of our minds.

 

 

तुझी त्याग-सेवा फळा ये अशी

तुझी कीर्ति राहील दाही दिशी

अगा पुण्यवंता भल्या माणसा!

 

अर्थ : हे पुण्यवंता, भल्या (ज्ञानी) माणसा, अशाप्रकारे तुम्ही केलेला त्याग, तुमची सेवा शेवटी आमच्या रूपाने फळाला येईल. तुमचा नावलौकिक, कीर्ति दाही दिशांना अबाधित राहिल.

 

English Translation:

O virtuous, good (wise) man, thus your sacrifice, your service will finally bear fruit in our form. Your reputation and fame will remain intact in all directions.