सुट्टीतील सहल
मे महिना उजाडला, आई-बाबांनी फिरायला जायची तयारी केली. आम्ही सारे महाबळेश्वरला फिरायला गेलो. पहिल्या दिवशी तिथे स्ट्रॉबेरीची शेती पाहिली. उंच डोंगर पाहिले. गुलाबाची रंगीबेरंगी फुले पाहिली. माझ्या भावाने आणि मी घोड्यावरून रपेट केली. टेबललॅण्ड पॉइंटवर रमत गमत फिरलो. संध्याकाळी बाजारात फेरफटका मारला. तेथे स्ट्रॉबेरी आइस्क्रीम खाल्ले.
दुसऱ्या दिवशी जुन्या महाबळेश्वरला गेलो. तिथे महादेवाचे जुने देवालय पाहिले. पंचगंगेचे थंडगार पाणी तर मला खूप आवडले. डोंगरातून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिला. ही सहल मला खूप आवडली.
अधिक निबंधांसाठी :