शाळेत साजरा झालेला स्वातंत्र्यदिन
आज पंधरा ऑगस्ट शाळेत त्या निमित्ताने स्वातंत्र्यदिन साजरा झाला. आम्ही सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापक या सोहळ्यासाठी सकाळपासून हजर होतो. सुप्रसिद्ध नेमबाज राही सरनोबत यांना निमंत्रित केले होते. त्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. आम्ही सर्वांनी समूहगीते गायली. मी स्वातंत्र्यदिनाची गोष्ट सांगितली. सगळ्यांना ती गोष्ट आवडली.
प्रमुख पाहुण्या राही सरनोबत यांनी देशासाठी बलिदान करणाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. त्या म्हणाल्या, “तुमचे ध्येय निश्चित करा. उत्तम अभ्यास करा, व्यायाम करा. आरोग्य सांभाळा. भारताचे जबाबदार नागरिक बना.” त्यांचे विचार मला खूप आवडले. स्वातंत्र्यदिन सोहळाही खूप आवडला.
समूहगीते गाताना माझे मन भरून आले. देशासाठी काहीतरी करावे, अशी इच्छा मनात दाटून आली.
अधिक निबंधांसाठी :