मी पुस्तक बोलतोय!
अग, हे काय करतेस? माझ्या पानावर रेघोट्या ओढतेस. मी तुझे मराठीचे पुस्तक आहे. तुला माझ्यातून कविता वाचायच्या आहेत, घडे वाचायचे आहेत. होय ना? मग, मला खराब का करतेस? मला अत्यंत निष्काळजीपणे वापरतेस. तुझ्या दप्तरात मला कधीही नीट ठेवत नाहीस. चक्क कोंबतेस! राग आला की, माझी पाने फटाफट पलटवतेस! मग मी फाटायला लागतो. मी फाटलो की, तू मला “जुने झाले पुस्तक!” असे म्हणतेस.
तुझी मित्र-मंडळीही असेच करतात. तेव्हा मला खूप वाईट वाटते. माझ्या आतल्या पानात छान-छान चित्रे आहेत. ती चित्रे सगळ्यांना आवडतात. तुलाही खूप आवडतात. तू माझ्याशी मैत्री कर! मग बघ; चित्रे, कथा, कविता यांचा खजिनाच तुझ्यासमोर उघडेल! करशीन ना माझ्याशी मैत्री?
अधिक निबंधांसाठी :