मी नदी झाले तर...
किती छान होईल, मी नदी झाले/झालो, तर! उंच डोंगरावरून मी डौलात वाहत येईन. माझे पाणी पांढरेशुभ्र असेल आणि खळाळत मी खाली येईन. वेगात आल्यामुळे मला लांबवर जाता येईल.
माझ्या दोन्ही तीरांवर लोक राहायला येतील. तेथे शेती करतील. फळझाडे, फुलझाडे फुलवतील. लोक माझे पाणी पिण्यासाठी वापरतील.
मी ठरवले आहे!, जेथे अजिबात पाणी नाही, त्या प्रदेशात मी जाईन. तिकडच्या लोकांना पाणी पुरवीन.
पावसाळ्यात खूप पाऊस पडतो. त्या वेळी मला पूर येतो. अशा वेळी लोकांचे नुकसान होऊ शकते. पूर ओसरल्यावर मी पुन्हा तुम्हांला मदत करीन.
अधिक निबंधांसाठी :