मी मासा बोलतोय

giant fish मी मासा बोलतोय

“काय रोहन, आईकडे रोज हट्ट करतोस, जेवणात मासे हवेत म्हणून! पण माझ्याबद्दल कधी काही जाणून तर घेना!”

 

“बर ऐक, मी मासा आहे. माझे सगळे बांधव समुद्रात राहतातः तसा मी तळ्यात, विहिरीत आणि नदीतही राहतो. मला एक शेपूट असते आणि लहान पर असतात. त्यांच्या साहाय्याने मी पोहतो. पोहताना मी खूप आनंदात असतो. त्याच वेळी अलगद जाळ्यात कधी अडकतो ते मलाच कळत नाही. त्या जाळ्यातून मी बोटीत जातो. बोटीतून बाजारात आणि बाजारातून तुझ्या ताटात येतो. मग तू माझ्यावर ताव मारतोस !”

 

“तू मला खातोस, तसे मी लहान कीटक, मासे, शेवाळे खातो. मोठे मासे आम्हांला खातात.”

 

“काही जण मला फिशटॅन्कमध्ये ठेवतात, तर काही जण मत्स्यालयात ठेवतात. काही जण बाजारात विक्रीला ठेवतात. पण, मला समुद्रातच राहायला खूप आवडते. तेथे सगळे माझे भाईबंद भेटतात.”