मी केलेले चांगले काम
एकदा माझी मैत्रीण खूप आजारी झाली. पंधरा दिवस ती शाळेत येऊ शकली नाही. मला तिच्याशिवाय शाळेत करमत नव्हते. मी रोज तिच्या घरी जात असे. तिला गोष्टींची पुस्तके वाचून दाखवत असे. तिच्याबरोबर बसून खाऊ खात असे. माझ्या येण्याची ती रोज वाट पाहत असे. मला शाळेतील गमती-जमती विचारत असे.
हळूहळू तिची तब्येत सुधारू लागली. माझ्यासोबत ती शाळेत येऊ लागली. शाळेत टीचरांनी माझे कौतुक केले. आजारी मैत्रिणीला सोबत केल्याबद्दल माझी प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, “सलोनीने खूप चांगले काम केले”. हे ऐकून मला खूप बरे वाटले.
अधिक निबंधांसाठी :