मी कचरा बोलतोय!
‘शी! किती घाण पसरलीय! मला दुर्गंधी अजिबात सहन होत नाही.’ मला पाहून तुम्ही सगळे असेच म्हणता, होय ना ?
रोज तुमच्या घरातील सगळा कचरा इथे कोपऱ्यात आणून टाकता. गेले तीन दिवस माझे थरावर थर साचले आहेत. मी वाट पाहतो आहे, माझे खत कधी होईल ते!
खरं तर सफाई कामगार रोज मला गोळा करून नेतात; पण त्यांनी एक दिवसाची रजा घेतली तरी इथे ढीग साचतो. मग माझ्यावर माश्या घोंघावतात. डास अळी घालतात. उंदीर, घुशी धुडगूस घालतात. त्यांच्या द्वारे रोगराई पसरते.
त्यापेक्षा तुम्ही मला घरी गोळा करा. वर माती टाका. माझे खत बनवा. झाडांना ते खत घाला. म्हणजे मीपण खूश! आणि तुम्हीपण खूश !
काय मग? कराल ना एवढे!
अधिक निबंधांसाठी :