मी झाड झाले तर...
कोणाला सैनिक व्हावेसे वाटते. कोणाला डॉक्टर व्हावेसे वाटते. मी मात्र तसले काहीही होणार नाही. मला झाड व्हावेसे वाटते. अनेकदा माझ्या मनात येते की मी झाड झाले तर? तर… … तर काय होईल ?
तर काय होईल, हे असे इतरांना का विचारायचे? मीच सांगते ना. मी झाड झाले, तर सगळ्यांना सावली देईन. सर्व पक्ष्यांना माझ्या अंगाखांदयावर खेळू देईन. त्यांना घरटी बांधण्यासाठी जागा देईन. पाने देईन, काटकी देईन. त्यांना खायला छान छान फळे देईन. माझ्या अंगावर वावरणाऱ्या मुंग्या, कीटक यांना पक्षी खातील. त्यांचे पोट भरेल.
मी माणसांना फळे देईन, फुले देईन. चुलीत जाळण्यासाठी लाकडे देईन. सगळ्यांना मी आनंद देईन, सुख देईन.
अधिक निबंधांसाठी :