मला पंख मिळाले तर...!
मला पंख मिळाले, तर मी रोज शाळेत उडत उडत जाईन. मला कधी उशीर होणार नाही. वर्गात कंटाळा आल्यावर खिडकीवर बसेन. झाडावर बसेन. आरामात फळे खाईन. पकडापकडी खेळायला खूप मजा येईल. कुठेही जाताना गर्दीचा त्रास होणार नाही.
मला पंख मिळाले, तर मी खूप ठिकाणी जाईन. परदेशात जाईन. हिमालयात बर्फाच्या शिखरांवर जाईन. समुद्रावर गिरक्या घेईन. मामाकडे जायची माझी खूप इच्छा असते. मामा मुंबईत राहतो. पंख मिळाले तर मी प्रत्येक रविवारी मुंबईला जाईन.
अधिक निबंधांसाठी :