माझे बाबा

bigstock Man Giving Young Boy Piggyback 4133443 dad 8 yr old boy माझे बाबा

माझे बाबा रोज सकाळी लवकर उठतात. त्यानंतर ते व्यायाम करतात. आईला घरकामात ते नेहमी मदत करतात.

 

माझे बाबा संगणक अभियंता आहेत. त्यांना कामानिमित्त अधूनमधून परदेशात जावे लागते. ते घरी असतात, तेव्हा आमच्यासोबत गप्पा मारतात. त्यांनी मला पोहायला शिकवले. सायकल चालवायला शिकवली.

 

बाबा कोणत्याही कार्यक्रमाला दिलेल्या वेळेत जातात. मी नेहमी सर्व कामे वेळेत करावीत, असा त्यांचा आग्रह असतो.

 

त्यांना विज्ञानाची खूप आवड आहे. त्यांनी मला वर्तमानपत्र वाचनाची सवय लावली आहे. असे माझे बाबा मला खूप आवडतात.

अधिक निबंधांसाठी :