माझा वाढदिवस
माझा वाढदिवस हा माझा आवडता दिवस आहे. काल माझा वाढदिवस झाला. काल सर्वांनी माझे खूप लाड केले. मला नवीन कपडे मिळाले. आई, बाबा व ताई यांनी घराची सजावट केली. आईने माझ्या आवडीचा फराळ तयार केला. बाबांनी छानसा केक आणला. त्यावर माझे नाव होते.
माझ्या वाढदिवशी आमच्या घरी नातेवाईक आले होते. माझे सर्व मित्र-मैत्रिणी आले होते. घर आनंदाने भरून गेले होते. या वर्षी बाबांनी मला कुंडीत रोप लावायला सांगितले. त्या वेळी सर्वांनी टाळ्या वाजवून मला शुभेच्छा दिल्या. आईने सर्वांना फराळ दिला. मी मित्र-मैत्रिणींना गोष्टींची पुस्तके वाटली. ताईने मोबाईलवर फोटो काढले. अशा त-हेने माझा वाढदिवस खूप आनंदात साजरा झाला.
अधिक निबंधांसाठी :