महात्मा गांधी
महात्मा गांधी हे विसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ भारतीय नेते होते. प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो.
महात्मा गांधींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. ते खूप शिकले; पण त्यांनी नोकरी केली नाही. त्यांनी वकिलीही केली नाही. ते आयुष्यभर देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटले. त्यांनी इंग्रजांना ‘ चले जाव” असे ठणकावले.
महात्मा गांधींची राहणी अगदी साधी होती. ते नेहमी सत्य बोलत. त्यांना अन्याय खपत नसे. ते अन्यायाविरुद्ध लढत.
गांधीजींना भारतीय लोक प्रेमाने ‘बापू’ म्हणत, संपूर्ण भारत त्यांना ‘राष्ट्रपिता’ मानतो.
अधिक निबंधांसाठी :