मधमाशीचे मनोगत
“मधमाशी आली! असे कोणी म्हणाले की तुम्ही मुले पळत सुटता. तुम्हांला मी डंख मारीन असे वाटते. पण आम्ही सगळ्याजणी डंख मारणाऱ्या माश्या नसतो. आम्हां सर्व मधमाश्यांना राणीमाशी जी कामे नेमून देते, ती कामे आम्ही करतो.”
“आमच्यातील बऱ्याचजणी कामकरी माश्या असतात. कामकरी माश्या सतत काम करीत असतात. आम्ही पोळे तयार करतो, मध गोळा करतो, फुलांवरचे परागकण गोळा करतो, गोळा केलेला मध पोळ्यात साठवून ठेवतो.”
“आमच्यातील राणीमाशी अंडी घालण्याचे काम करते.”
“आम्हांला माहिती आहे, आम्ही गोळा केलेला मध तुम्हांला हवा असतो. औषध, म्हणून त्याचा तुम्ही उपयोग करता. आम्हांला खूप बरे वाटते!”
अधिक निबंधांसाठी :