होळी
फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला देशभर होळी साजरी केली जाते. आमच्या परिसरात पण होळी साजरी केली जाते. गावातील लोक आपापल्या घरातील केरकचरा एकत्र करतात. होळीच्या खड्ड्यात तो कचरा टाकतात. होळीसाठी झाडांच्या ओल्या फांदया, पाने कोणीही तोडत नाहीत. सुकलेले गवत, काटक्या, शेणी गोळा करतात. त्याचीच होळी पेटवतात.
लहानथोर सारेजण होळीची पूजा करतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करतात. होळीभोवती सारेजण फेर धरतात, नाचतात आणि गातात. घराघरांतील लोक एकत्र येतात आणि हा सण साजरा करतात. त्यामुळे होळी हा सण सगळ्यांचा आवडता सण आहे.
अधिक निबंधांसाठी :