चिमणीचे मनोगत
“हल्ली तुम्हांला आमची चिव चिव ऐकू येत नाही. होय ना। कशी ऐकू येणार? कारण आमची संख्याच आता कमी झाली आहे.”
“पूर्वी घरटे बांधण्यासाठी घराघरांत जागा मिळत असे. आता मोठ्या इमारतींमुळे आमची घरटीच राहिली नाहीत. पूर्वी प्रत्येक घरातून दाणे मिळत असत. आता सगळ्यांची दारे-खिडक्या बंद असतात.”
“छोट्या झाडांवर आमचा थवा चिव चिव करायचा. आता झाडांची कत्तल होते. आम्ही कोठे बसणार? शेतात दाणे टिपायला जायचे, तर गोफणीतून दगड फेकतात. विजेच्या तारा, पतंगाचा मांजा, मोबाइलचे टॉवर यांच्यामुळे आम्हांला इजा होते, पंख कापले जातात. एवढासा आमचा जीव ! किती सहन करणार? आम्हांला तुमच्यासोबत राहायला आवडते. पण आता ते शक्य नाही, असे वाटते.”
“काही वर्षांनी तुम्ही आम्हांला फक्त चित्रातच पाहाल!”
अधिक निबंधांसाठी :