अचानक आलेला पाऊस
एके दिवशी बाबांच्या बरोबर बाजारात गेलो होतो. घरून निघताना कडक ऊन पडले होते. परंतु बाजारात पोहोचेपर्यंत गार वारा सुटला. वारा आल्यावर मला खूप बरे वाटले. काही वेळात वाऱ्याबरोबर काळे ढग आकाशात जमा झाले. वाऱ्याचा वेग अधिकच वाढला, मला खूप भीती वाटू लागली. तेवढ्यात विजेचा कडकडाट सुरू झाला. जोरदार पाऊस बरसू लागला. हवेतील या अचानक बदलामुळे सगळेच गोंधळले. सगळे जण आडोसा शोधू लागले. मी पावसात चिंब भिजलो. अचानक आलेल्या या पावसामुळे खूप मजा आली.
अधिक निबंधांसाठी :