आरसा नसता तर
आम्ही एकदा ‘नेहरू विज्ञान केंद्रा’ मध्ये गेलो होतो. तेथे एका दालनात वेगवेगळे आरसे होते. आम्ही एकेका आरशात पाहिले. प्रत्येक आरशात आम्हांला आमचे चित्रविचित्र आकार दिसत होते. ते पाहून आम्ही खूप हसलो. या आरशांनी आम्हांला खूप आनंद दिला. मनात विचार आला, हे आरसे नसते तर…?
कल्पना करा… घरात आरसा नसेल, तर काय होईल? मग केस कसे विंचरणार? आपण कसे दिसतो, हे आपल्याला कळणार नाही.
दुकानांमध्ये, हॉटेलांमध्ये किती छान छान आरसे असतात! आरशात पाहताना किती मजा वाटते. हा सगळा आनंद नाहीसा होईल. आपण केस कापायला जातो, तेव्हा आरशात आरसा दिसतो. आपली खूप प्रतिबिंबे दिसतात; मजा येते. आरसा नसेल तर हे सर्व नाहीसे होईल.
वाहनांमध्ये आरसा लावता येणार नाही. त्यामुळे अपघात होतील. प्रयोगशाळेत आरशांची गरज असते. तेथे अडचण होईल. मोठमोठ्या आरशांमुळे सौरऊर्जा मिळते. ती मिळणार नाही.
आरसा नसेल, तर खूप अडचणी येतील. आयुष्यातील फार मोठा आनंद नाहीसा होईल.
अधिक निबंधांसाठी :