मी
माझे नाव किमया आहे. मी सहावीत शिकत आहे. मी सकाळी शाळेत जाते.
माझी शाळा दुपारी सुटते. मी घरी येते आणि जेवते. मग मी थोडा वेळ गोष्टींची पुस्तके वाचते. कधी कधी चित्रे काढते. थोडा वेळ टीव्ही पाहते. मग गृहपाठ करते.
संध्याकाळी मी मैत्रिणींबरोबर खेळते. रात्री आम्ही घरातील सर्वजण एकत्र जेवतो. आम्ही जेवताना एकमेकांशी गप्पा मारतो. त्या वेळी मला खूप आनंद होतो. असा माझा दिवस हसत-खेळत जातो.