माझी आई
माझी आई माझ्यावर खूप प्रेम करते. ती माझी खूप काळजी घेते. मला तिने अनेक चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्यामुळे माझी शाळेत जाण्याची तयारी मी स्वतःच करतो. मी नेहमी नीटनेटका राहतो.
ती माझ्याबरोबर विविध विषयांवर गप्पा मारते. आम्ही दोघे कविता, गाणी गुणगुणतो. आई नेहमी माझ्या आवडीचे पदार्थ करते. कधी कधी मला पदार्थ बनवायला शिकवते.
मी अभ्यास कसा करावा, हे ती मला समजावून सांगते. त्यामुळे ती घरी नसली, तरी माझा अभ्यास मी स्वतः करतो.
माझा आहार योग्य असावा, मी मैदानावर खेळावे, मी नियमित व्यायाम करावा असा तिचा आग्रह असतो. अशी माझी आई मला खूप आवडते.