माझे घर
माझ्या घराचे नाव ‘आनंदसदन’ आहे. माझ्या घरात भरपूर प्रकाश येतो. आम्ही घरात काही रोपटी ठेवली आहेत. त्यामुळे घर प्रसन्न वाटते. आमच्या घराभोवती काही मोठी झाडे आहेत. त्यामुळे छान सावली मिळते.
माझ्या घरात आईबाबा, आजीआजोबा, ताई आणि मी राहतो. घरात आम्ही सगळेजण हसत- खेळत वावरतो. आम्ही सारे मिळून घर स्वच्छ ठेवतो. नेहमी पाणी, वीज काटकसरीने वापरतो.
माझ्या घरात खूप पुस्तके आहेत. मला घरात कधीच कंटाळा येत नाही. मी कधी बाहेरगावी गेलो, तर मला घराची खूप आठवण येते. माझे घर मला खूप आवडते.