माझे गाव, स्वच्छ गाव
माझे गाव ‘स्वच्छ गाव’ म्हणून ओळखले जाते. गावातील प्रत्येक जण आपले घर स्वच्छ ठेवतो. घराचा परिसर स्वच्छ ठेवतो.
गावातील रस्ते रोज झाडले जातात. जमा झालेला सुका कचरा कचरागाडीत टाकतात. ओल्या कचऱ्याचे खत तयार करतात. रस्त्याच्या कडेला वड, पिंपळ, कडुनिंब यांची झाडे आहेत.
घरांतील सांडपाणी बंद गटारांतून गावाबाहेर सोडले जाते. गुरांचे शेण-मूत्र कंपोस्ट खड्ड्यात साठवले जाते. त्यामुळे गावात रोगराई पसरत नाही. असे माझे हे स्वच्छ गाव मला खूप आवडते.