निबंध लेखन
Composition / Paragraph / Essay Writing

माझा आवडता प्राणी

Cow female black white माझा आवडता प्राणी

माझा आवडता प्राणी गाय आहे. आमच्या गाईचे नाव ‘तांबू’ आहे. तांबूचा रंग तांबूस-पांढरा आहे. तांबू आम्हांला गोड दूध देते. तिला एक छान वासरू आहे. ती वासराला मायेने चाटते. तांबू गोठ्यात बांधलेली असते. मी तांबूला आणि वासराला रोज पाणी देतो. तांबू कधीही मला मारत नाही. तांबू मला खूप आवडते.

 

गाय हा खूप उपयुक्त प्राणी आहे. गाय दूध देते. दुधापासून दही, ताक व लोणी मिळते. दुधापासून मिठाई बनवतात. गाईच्या दुधात सर्व जीवनसत्त्वे असतात. म्हणून गाईच्या दुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.

 

गाईला सर्वजण ‘गोमाता’ म्हणतात आणि तिची पूजा करतात.